नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

जीवनाचे धडे आणि स्वतःशी करार

इतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी. […]

कालसुसंगत (Relevant)

दिवसागणिक अशा प्रयॊग करणाऱ्यांची आणि काळाशी सुसंगत राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांची माझी यादी वाढत आहे. हा relevance खाद्य संस्कृती,करमणूक क्षेत्र, वाहन व्यवसाय आणि अशा सगळ्या दिशांनी पसरत चाललाय. […]

प्रतिबंध – भविष्याचा एकमेव मार्ग !

आजच्या छोट्या मोठ्या विजयांवरून नजर हटवून, भविष्यामध्ये गुंतवणूक केली तर यंदाचे शहरीकरणाचे सगळे तोटे सहज ओलांडून जाता येईल. फक्त नेतृत्व तसे हवे- उद्याच्या आव्हानांना आजच्या संधींमध्ये रुपांतरीत करू शकणारे ! […]

दिवे लागले रे “तमाच्या” तळाशी !

शंकर रामाणींच्या भाषेत “देहयात्रेत गुंतलेल्या ” आपणां सर्वांना कोरोना नावाच्या तमाने अस्तित्वाच्या तळाशी नेऊन ठेवले पण काल सरलेल्या दीपोत्सवाने सर्वदूर भान देणारे दिवे लावले आणि आपले तळ उजळून निघाले. […]

हेल्मेट (लघुकथा)

सर विमानात बसले. दिवस बराच हेक्टिक होता. उद्यापासून दिल्लीचे त्याहीपेक्षा हेक्टिक वेळापत्रक सुरु होणार होते. नव्यानेच सुरु झालेल्या बी -स्कूल ते संचालक म्हणून नुक्तेच रुजू झाले होते. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे आव्हान त्यांच्या नजरेसमोर होते. त्यावरच पुढील वर्षाचे प्रवेश आणि बी स्कूलची पायाभरणी होणार होती. […]

II समर्थांची प्रार्थना II

समर्थ रामदासा , प्रेरणेच्या स्रोता – तुला दंडवत ! मला शक्ती दे, सामर्थ्य दे ! मानवजातीवर तुझा कृपाप्रसाद अविरत असू दे ! हे गुरु समर्था, मला तुझ्या समीप ठेव ! उत्तम पुरुषांचे गुण आत्मसात करू दे ! सत्याच्या पथावर प्रकाश दाखव ! माझ्या अंतर्मनातील दिव्यत्व उजळू दे ! हे थोर समर्था, मला आणी सर्वांना मार्गदर्शन कर- […]

“भीमसेन” – आकाशाएवढा !

हिमालयाला गायला सांगितले की तो ज्या पहाडी स्वरांमध्ये गडगडाटी गाईल, तसं भीमसेनजींचं गाणं मला सतत वाटत आलं आहे. […]

“सहेला रे”- वपुंच्या “पार्टनर”पेक्षा, अमिताभच्या ” बेमिसाल “पेक्षा तरल !

“सहेला रे” प्रचंड तरल आहे. हा चित्रपटगृहातील पॉपकॉर्न गर्दीत किंवा घरच्या टीव्ही वर परिवारासमवेत पाहण्याचा अनुभव नाही. डोळसपणे निर्मात्यांनी तो “प्लॅनेट मराठी ” वर रिलीज केलाय,जो फक्त आपल्या एकांतातील संगणकावर/लॅपटॉप वर निगुतीने बघावा. […]

अर्धशतकी त्रिवेणी – तो, मी, पडदा !

” गहरी चाल ” अशा आकर्षक नावाच्या चित्रपटाने फसवणूक झालेला मी रिकाम्या हातांनी बाहेर पडल्यामुळे चिडलो होतो पण भुसावळच्या वसंत टॉकीज मध्ये “जंजीर” पाहताना दचकून ताठ बसलो – ” ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नहीं ! ” पडद्यावर प्राणही तितकाच दचकला असावा. आणि आज तो /जया सोडले तर त्या अंगारांचे साक्षीदार (प्राण, इफ्तेकार, ओम प्रकाश, अजीत, प्रकाश मेहरा) निघून गेले आहेत. […]

मनातलं….

अनुभवांना स्वतःचे रूप देऊन कोपऱ्यात उभी राहिलेली माझी शब्दकळा मला नेहेमीच कोसळण्यापासून वाचवत आलीय. कितीतरी प्रसंगांतून, रूपांनी, माणसांच्या माध्यमातून माझ्या भेटीला आलेले माझे शब्द ! […]

1 4 5 6 7 8 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..