नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

फिर आँख नम हो गयी I फिर “दोनों” याद आ गए

काही चित्रपट यशासाठी, प्रसिद्धीसाठी, गल्ल्यासाठी नसतात पण तरीही ते रेंगाळत राहतात. “किनारा” (१९७७) दस्तुरखुद्द जितेंद्र/हेमा/धमेंद्र यांच्या आज खिजगणतीत असेल का, प्रश्न आहे. बाकीचे सहकलाकार- लागू, केश्तो, दीना पाठक, ओम शिवपुरी काळाच्या पडद्याआड गेलेत. यंदा लता (६ फेब्रुवारी) आणि पाठोपाठ भूपेंद्र (१८ जुलै – गंमत म्हणजे या सव्यसाची गायकाचा जन्म ६ फेब्रुवारीचा) काळाच्या प्रवाहात विलीन झाले. आम्ही मात्र “किनाऱ्यावर” थबकलोय- “मिलेगा किनारा यहीं ” असं स्वतःला बजावत ! […]

पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते. […]

समर्पितांच्या सहवासात….

मनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते. […]

स्नेहवन

फार पूर्वी चिरंजीवांवर “देण्याचा” संस्कार व्हावा या हेतूने मी आणि माझ्या पत्नीने त्याच्या व्रतबंधाच्यावेळी त्याच्या हस्ते काही सामाजिक कार्य केले होते. काल मी स्वतःवर संस्कार करून आलो. […]

‘चार’ असतात ‘पक्षिणी’ त्या ! रात असते ‘कायमची’ वादळी !!

कुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय. आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी ! […]

मिलते हैं फिर !

मिलते हैं फिर ! रात्री झोपताना स्वतःला हे आश्वासन देऊन झोपण्याची माझी सवय आहे. आणि सकाळी डोळे उघडले की चक्क स्वतःशी भेट होते. पण हे वाक्य दरवेळी इतकं सहजी सत्यात येत नाही. […]

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा “अबोल” हा पारिजात आहे!

भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?) लताच्या स्वरांचे वय काय? कानावर पडल्यापासून ते विरून जाईपर्यंत की मी जन्मल्यापासून आजतागायत जे मी आत साठवून ठेवलंय (आणि जे माझ्याबरोबरच संपेल) तेथपर्यंत? […]

पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

“काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले. पाश्चात्य देशांमध्ये निर्घृणपणे (मर्सिलेस्ली) त्यांना दूर केले जाते. कारण एकच -त्यांच्यासाठी काळ काही विशिष्ट क्षणांमध्ये गोठलेला […]

महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे !

स्पर्धा पारितोषिकांसाठी(करंडक, ढाल ,चषक वगैरे)असतात की बक्षिसाच्या रकमेसाठी की मिळालेल्या व्यासपीठावर स्वतःला पारखून घेण्यासाठी असतात कां मैत्र नको, शत्रू हवा याचा सर्वांनीच यानिमित्ताने (पुन्हा एकदा) विचार करण्याची पाळी आलीय. […]

1 5 6 7 8 9 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..