स्वर्गाचे सरकार
जगातल्या सर्वच देशांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेलीही. मात्र अनंत काळापासून सकल ब्रम्हांडावर राज्य करणारे, संपूर्ण बहुमत असलेले, अलौकिक, एकमेवाद्वितीय अढळ व स्थिर सरकार म्हणजेच “स्वर्गाचे सरकार”. या सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप एकदाच झालेय. त्यात पुन्हापुन्हा बदल होत नाही. कोणताही मंत्री दुसर्या मंत्र्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. सगळेच मंत्री कार्यक्षम असल्यामुळे एकमेकांच्या तक्रारीसुद्धा करत नाहीत. […]
