तयारी एन.डी.ए ची !
देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. […]
