नवार्ण मंत्राचा गुढार्थ

माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे.
नवार्ण = नऊ अक्षराचा मंत्र.
या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.

भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत,
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.
या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते.

|| ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ||

नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे.

ऐं = महासरस्वती चा बीज मंत्र आहे,
ह्रीं = महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे.
क्लीं = महाकालीचा बीज मंत्र आहे.

याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे

प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारिणी |
तृतीयं चन्द्रघंटेती, कुश्मांडेती चतुर्थकम ||
पंचमं स्कन्दमातेती, षष्ठं कात्यायनितीच |
सप्तमं कालरात्रीति, महागौरीती चाष्टमम ||
नवमं सिधीदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता |
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हनैव महात्मना ||

ऐं = प्रथम =शैलपुत्री = सूर्य
ह्रीं = द्वितीय = ब्रम्हचारिणी = चंद्र
क्लीं = त्रितीय = चन्द्रघंटा = मंगळ
चा = चतुर्थ = कुश्मांडा = बुध
मुं = पंचम = स्कन्दमाता = बृहस्पती
डा = षष्ठं = कात्यायनि = शुक्र
यै = सप्तमं = कालरात्री = शनि
वि = अष्टमं = महागौरी = राहू
च्चै = नवमं = सिधीदात्री = केतू

+ नवार्ण मंत्राचे प्रथम बीज “ऐं” पासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती “माता शैलपुत्री” ची उपासना केली जाते, ज्यात “सुर्य ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे द्वितीय बीज “ह्रीं” पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती “माता ब्रह्मचारिणी” ची उपासना केली जाते, ज्यात “चंद्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे त्रितीय बीज “क्लीं” पासून दुर्गा देवीच्या त्रितीय शक्ती “माता चंद्रघंटा” ची उपासना केली जाते, ज्यात “मंगळ ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज “चा” पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती “माता कुश्माण्डा” ची उपासना केली जाते, ज्यात “बुध ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे पंचम बीज “मुं” पासून दुर्गा देवीच्या पंचम शक्ती “माता स्कंदमाता” ची उपासना केली जाते, ज्यात “बृहस्पती ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे षष्ठ बीज “डा” पासून दुर्गा देवीच्या षष्ठ शक्ती “माता कात्यायनी” ची उपासना केली जाते, ज्यात “शुक्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे सप्तम बीज “यै” पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती “माता कालरात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “शनि ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे अष्टम बीज “वि” पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती “माता महागौरी” ची उपासना केली जाते, ज्यात “राहू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

+ नवार्ण मंत्राचे नवम बीज “च्चै” पासून दुर्गा देवीच्या नवम शक्ती “माता सिद्धीदात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “केतू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

या त्रिशक्ती जगदम्बा सर्वार्थ सिद्धि मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समाहित आहे, ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही. या मंत्रात हजारों गायत्री मंत्राची ऊर्जा समाहित आहे. हा मंत्र मारण, मोहन, वशीकरण, स्तम्भन तथा उच्चाटन आदि क्षत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे.

१) मारण = क्रोध, मद, लोभ आदिचा नाश करणे. यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या जपणे शत्रुपक्षाची शक्ति क्षीण केली जाते.

२) मोहन = आपल्या इष्ट माता भगवती ला प्रसन्न करणे.

३) वशीकरण = या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते, आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो.

४) स्तम्भन = या मंत्राच्या के माध्यमाने आपल्या इन्द्रियांच्या विषय-विकारांना थांबवले जावू शकते.

५) उच्चाटन = या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदि त्याग करून साधक मोक्ष प्राप्ति साठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगता पासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते.

या महामंत्राच्या जपात उपर्युक्त भाव, साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्या पर्यंतच राहिली पाहिजे. त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी, या महामंत्राचा लाभ, पूर्ण पात्रताप्राप्त सद्गुरु च्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जावू शकतो.

या त्रिशक्ति जगदम्बा सर्वार्थ सिद्धि मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या उर्जेने एकाकार होत जातो, तेवढा तो प्रकृतिसत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो.⁠⁠

( संदर्भ आणि सौजन्य : लेखक – श्री. श्रीकृष्ण पुराणिक )About Guest Author 508 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

Loading…