ड्रॅगन फ्रूट फळाविषयी
मूळ मेक्सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते. ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. […]
