Web
Analytics
जय शिवराय – Marathisrushti Articles

जय शिवराय

शिवाजी महाराज हे नाव समोर आले कि नकळत आपल्या मुखातून जय भवानी जय शिवाजी हे उद्गार बाहेर पडतात कारण त्यांनी हिंदुस्तानात स्वराज्य स्थापन केले होते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य.ते एक थोर युगपुरुष होते.

शिवजन्मापूर्वी म्हणजेच सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विजापूरचा आदिलशहा व अहमदनगरचा निजामशहा या दोन सुल्तानांचा कारभार होता.परंतु ते दोघेही एकमेकांचे हाडवैरी होते.त्यांच्यात नेहमीच लढाया होत त्यामुळे जनतेचे फार हाल होत. रयत सुखी नव्हती.माता जिजाऊंनी हे सर्व पहिले होते.त्यांना फार वाईट वाटे.रयतेला सुखी करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना सारखे वाटे.महाराष्ट्राच्या जनतेला सुखी करण्यासाठी मला एक शौर्यवान पुत्र दे असे त्यांनी आई तुळजाभवानीला साकडे घातले आणि म्हणूनच कि काय देवीने त्यांचे मागणे मान्य केले आणि १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर महाराष्ट्राचे दैवत शिवराय जन्माला आले.जन्म शिवनेरीवर झाला म्हणून  सनई चौघड्याच्या सुरात बाळाचे नाव ठेवले “शिवाजी”.

आई जिजाऊंनी बालपणी शिवरायांवर छान संस्कार केले.राम-कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या.महाराष्ट्राच्या जनतेला सुखी करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे पटवून दिले.शिवरायांनीजनतेवर होणारा पहिला होता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी मावळे जमविण्यास सुरवात केली.अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी  शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वाराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि तोरणा गड जिंकून आपल्या कार्यास सुरवात केली.

त्यानंतर त्यांनी अनेक लढाया ,किल्ले जिंकले.पोर्तुगीज ,मुघल,औरंगजेब,आदिलशहा,निजामशहा या सत्तांचा पाडाव करून  स्वराज्य स्थापन केले.त्यात त्यासाठी  तानाजी मालसुरे,बाजीप्रभू देशपांडे अश्या अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.सतत २० वर्षाच्या अविश्रांत श्रमातून शिवरायांनी  स्वतंत्र आणि सार्वभौम्य असे स्वराज्य स्थापन केले होते.

शिवराय फक्त महाराष्ट्राचेच नव्हते तर ते संपूर्ण राष्ट्राचे होते .त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले होते. म्हणूनच त्यांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेसे आणि ऐकावेसे वाटते.
आदर्श पुत्र,सावध नेते,सज्जनांचे कैवारी आणि एका नव्या युगाचे निर्माते असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत.हे सर्व पहिले कि पुन्हा पुन्हा वाटते ,

शिवरायांचे आठवावे ते रूप
शिवरायांचा आठवावा तो प्रताप
शिवरायांचा आठवावा तो प्रताप
धन्यवाद.

 

 

लेखकाचे नाव :
अपर्णा
लेखकाचा ई-मेल :
aparnakakde285@gmail.comAbout Guest Author 509 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

कोकणचा मेवा – ओळख

उन्हाळा लागला की समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणाकडे ...

पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला

शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना ...

Loading…