नवीन लेखन...
Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

कुरडूची भाजी…

सन 1980 ची गोष्ट त्यावेळी माझी आई घरामध्ये जळण नाही म्हणून. रानातून कुर्डू च्या फुलांच्या झाडाचे जळण डोक्यावरून एक मोठा भारा रोज घेऊन येत असे. स्वयंपाकासाठी घरांमध्ये वेळ नव्हते मी रेल्वेमध्ये नुकताच रेल्वेमध्ये कामाला लागलो होतो. त्यावेळी पगार महिना दोनशे रुपये पर्यंत मिळत होता. […]

 सतीच वाण

या ग्रामीण भागामध्ये 1969सालि करमणुकीची साधने अतिशय कमी होती. आमच्या लक्ष्मीच्या देवळामध्ये प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी एकतारी भजन किर्तन पोवाडे भेदिक असे कार्यक्रम असायचे. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या बांधावर रोजंदारी करीत होती. […]

येळावीचा म्हातारा शेकोटीला आला…….।

शाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत. […]

गडबड-महागात-पडली……..।

भारतीय रेल्वे हे प्रवासाचे फार मोठे साधन आहे यामध्ये मालवाहतूक विशेष प्रमाणात केली जाते. भारतीय रेल्वे मध्ये अनेक लोकांना काम मिळाले आहे हे नाकारता येत नाही. रेल्वेतील लोकांचा प्रवास सुखमय होण्यासाठी रेल्वेने फार मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेने अनेक कामगारांचे संसार चालविली आहे त रेल्वे कर्मचाऱ्याला कमी भाड्यामध्ये खोली पाणी वर लाईट याची चांगली सुविद्या निर्माण करून दिलीआहे. […]

टेलर मामा

ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता. […]

डोक्याचे संरक्षण कवच

बाहेर पाऊस वाढला होता हस्त नक्षत्राला सुरुवात झाली होती शिवाय दोन दिवसा मध्ये नवरात्राला सुरुवात होणार होती. या पावसाचे नक्षत्र मुळे शेतामध्ये भयंकर दलदल झाली होती. सफरातून बाहेर पडायची शिष्ट नव्हती इतका पाऊस वाढला होता त्यावेळी आम्ही सर्वजण आमच्या शेतामध्ये राहायला होतो. या पावसा मध्ये अधूनमधून वाऱ्याची झुळूक आली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या डाळ्या एकमेकावर आदळत होत्या. सुनबाई च्या ओढ्याला भरपूर पाणी आले होते पूर्वेकडून वाहणारा सुनबाईचा ओढा पाण्याने भरभरून वहातहोता. […]

गरिबांचा संसार

संसार म्हटले की कटकटी या आल्याच या संसारामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटा संसार यामध्ये मुला मुलींची संख्या एक किंवा दोन असते. वडिलांच्या पासून काही ना श्रीमंती लाभलेली असते याला छोटा संस्था म्हणतात. मोठा संसार म्हणजे घरात दहा पंधरा माणसे त्यात मिळवणारे कमी लहान मुलांचा व मुलींचा कपडा लता. शाळेची फी पाटी पुस्तक या वस्तू आल्यास या वस्तू असल्याशिवाय शाळा शिकता येत नाही. माणूस जगायचा झाला तर त्याला अन्न, वस्त्र, व निवारा या तीन गोष्टी असल्या म्हणजे माणूस जगू शकतो. […]

शिवाला पडलेले स्वप्न…

…. ……… गावाकडची गोष्ट………..। .. सकाळ झाली होती झाडावरील पक्षानी आपापली घरटी सोडली होती पक्षी पूर्व दिशेला आकाश मार्गाने भरारी घेऊन पोट कसे भरेल या तयारी त होते. प्रत्येक मानवाला स्वतःचे पोट कसे भरेल याची चिंता लागलेली असते त्याच प्रमाणे मुक्या पक्षाची सुद्धा अशीच गत असते. पोटासाठी मुखे पक्षी भ्रमंती करतात त्याचप्रमाणे मानव सुद्धा वीतभर पोटासाठी […]

चंद्र वर गेला

…………. गावाकडची गोष्ट……….। …हि सृष्टी निर्माण झाल्यापासून आकाश वरच असावे असे मला वाटते. या सुट्टी बद्दल व निसर्गाबद्दल अनेक माणसे वेगवेगळे सांगतात. नक्की काय इतिहास आहे हे कुणालाच माहीत नाही निसर्गातील किंवा सृष्टीतील अनेक वस्तू झाडे वेली फळे-फुले आपण नेहमी पाहतो. काही झाडांना हिरवा रंग काही फुले रंगीबेरंगी हा जो कलर आहे. त्या पेंटर चे नाव […]

जुळेवाडी तील ज्येष्ठ नागरिक

जुन्यातील काही माणसे सर्विस मधून रिटायर झालेली दुपारी चार नंतर फिरायला आलेली मला दिसली. त्यातील काही माणसांनी मला ओळखले आणि आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गावांमधून रेल्वे लाईन जाते पलीकडे बुरुंगवाडी अलीकडे जुळेवाडी व काही अंतरावर हजारवाडी. या गावातील माणसे जुळेवाडी तील प्रत्येक घरटी माणूस ट्राफिक डिपारमेंट इंजिनीरिंग डिपारमेंट. व बुरुंग वाडीतील बहुता श लोक इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये काम करतात तर हजार वाडी येथील घरटी एक दोन माणूस टेलिफोन खात्यामध्ये काम करीत होते. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..