नवीन लेखन...

येळावीचा म्हातारा शेकोटीला आला…….।

 

शाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत. वडिलांच्या नंतर आमचा संसार पूर्णपणे पडला होता खाण्या पिण्याची घरात टंचाई भासत होती. वडील पाच सहा महिन्यापूर्वी गेल्यामुळे जवळजवळ घर रिकामे झाले होते. आईच्या सौभाग्याचा दागिना आता कायमचाच कपाळावरून निघून गेला होता. आता जगायचं कुणासाठी हा आईला प्रश्न पडला होता पण आईच्या आईने माझ्या आईची फार मोडती घातली होती. आजी आईला म्हणत होती,, तुला ह्या लहान पाच मुलासाठी जगले पाहिजे,, वडील गेल्यापासून आजी सारखा हाच विषय आई पुढे ठेवत होती. आईच्या मनावर काय परिणाम होतो की नाही याची शंका व हुरहुर माझ्या मनाला लागली होती. वडील गेल्यापासून घरात वातावरण एकदम शांत होते मी शाळा सोडून घरी बसलो होतो घरातील सारे चित्र वडील आजारी पडल्यापासून मी डोळ्यांनी पाहत होतो. माझ्या मनाला सुद्धा फार वाईट वाटत होते पण काय करू मी अजून लहान आहे ना माझ्या मनाला पुष्कळ वाटायचे. मी कामाला लागलो तर या संसारामध्ये बक्कळ पैसे आईला आणून घेईन पण माझा ना इलाज होता. दिवस पळत होते रात्र पळत होती आणि टाईम सुद्धा पळत होते सहा महिन्याच्या नंतर आई मला म्हणत होती तुला शेती काम जमणार नाही. तू काय माझ्याबरोबर कामाला येऊ नको परंतु आजी म्हणाली जा घेऊन तुला मी सोबत होईल घरात बसून काय करतोय. दिवसभर काय आईच्या देवळात जाऊन बसतो चार पैसे मदत होईल. आजीने सांगितल्यामुळे आई मला दुसऱ्याच्या शेतावर कामाला घेऊन जाऊ लागली. मी आई बरोबर काम करू लाग लो बायका भराभर भांगलत पुढे पुढे जात होत्या आणि मी मागे राहत होतो. खरंतर मला बायकांमध्ये भांगलने याची लाज वाटत होती पण काय करू बायकांची भांगलनीची पात लागली म्हणजे माझी आई व एक बाई मला मदत करीत होत्या….।

…… मी शाळेत हुशार होतो माझे हस्ताक्षर फार सुंदर होते शिवाय निबंध स्पर्धेमध्ये मी एक नंबर काढत होतो. शाळेसमोर लाकडी फळ्यावर रंगीबेरंगी खडू नये रोज सुविचार लिहायचे काम मला कुलकर्णी गुरुजींनी दिले होते. सारा शिक्षक स्टाफ माझ्यावर खुश असायचा मी नाटकात जसे बोलतात तसा मी बोलत असे. शाळेतील विविध कर्मणुकीच्या कार्यक्रमांमध्ये गुरुजी मला आवर्जून घ्यायचे. मग शाळेतील नाटक असो अथवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी चा कार्यक्रम असो. त्यात मला नेहमी संधी मिळायची आणि या संधीचे मी सोने करायचा त्यामुळे मी शाळेतील सर्व शिक्षकांचा लाडका झालो होतो. गुरुजी मला म्हणायचे शाळा सोडू नको पण घरातील वातावरण अभ्यास करण्यासारखे पोषक नव्हते म्हणून मी नाराज होतो आणि अशाच शाळा सोडून दिली. आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद सांगली मार्फत स्काऊट गाईड हा विषय टाकला होता. या कार्यक्रमांमध्ये मला आवर्जून घ्यायचे म्हणून शाळेतील बजरंग मगदूम विद्यार्थी याला. कुलकर्णी गुरुजींनी घरी पाठवून दिले होते त्याचे ऐकून मी शाळेत गेलो माळावरच्या शाळेसमोर. स्काऊट मधील बारा मुले बारा मुली शाळेच्या भव्यदिव्य पटांगणामध्ये ओळी करून उभ्या होत्या. स्काऊट मास्टर कुलकर्णी गुरुजी व धनगाव चे तावदर हे काम पाहत होते मला पाहताच गुरुजींनी टाळ्या वाजवल्या त्याचबरोबर मुला-मुलींनी सुद्धा टाळ्या वाजवल्या. व गुरुजी म्हणाले,,

,, आत्ता आपल्या स्काऊटला फार मोठी किंमत आली एक चांगला माणूस आपणाला मिळाला..,,

,, पण गुरुजी आता मला हे सारे जमेल का मी म्हणालो..।

,, काय झालं जमायला मी आज ना तुझ्याबरोबर आता आपण या महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये आपले नेताजी बालवीर पथक व लक्ष्मीबाई बालवीर पथक. ब्राह्मणाच्या मेळाव्याला जायचे आहे. तुझे वडील वारले आहेत तेव्हा तुझ्या मनाला बरं वाटावे म्हणून मी तुला बोलवून घेतले. स्काऊटचे दहा नियम 10 विद्यार्थ्यांनी पाठांतर करून शेकोटीच्या कार्यक्रमा च्या ठिकाणी हातात पलीदे घेऊन हे दहा नियम म्हणायचे आहेत. गुरुजी म्हणाले…।

,, मी गुरुजींचे ऐकून घेतले आणि स्काऊटच्या कामाला सुरुवात केली कारण मी गुरुजींचा लाडका विद्यार्थी होतो. मनाला एकीकडून खेद वाटत होता मी शाळा सोडली आणि गुरुजींच्या अग्रस्थव परत या शाळेत आलो. दोन वर्षांपूर्वी माझ्याबरोबर असणारे विद्यार्थी त्यावेळी दिसले नाहीत ते पास होत होत पुढच्या वर्गात गेले आहेत. आता तर या विद्यार्थ्यातील काही विद्यार्थी ओळखीचे आहेत तरीपण गुरुजींचा शब्द मला पाळाय हवा. मला पुढे शिकता आले नाही हा माझ्या दैवाचा भाग आहे तरीपण या स्काऊट मध्ये आपण जायचं. आपल्या शाळेचे नाव मोठे करायचे हा विचार करून मी कामाला लागलो होतो. गुरुजी स्काऊट बद्दल सर्व माहिती मला दिली होती त्या पद्धतीने माझे काम चालू होते.,, ब्रम्हनाळचा मेळावा,,
या कथेचा काही भाग मी प्रकाशित केला आहे. सांगायचे एवढेच होते गुरुजींचं प्रेम माझ्यावर किती होते हा विषय महत्त्वाचा होता. थोड्याच दिवसांमध्ये स्काऊटच्या कार्यक्रमाची रूपरेषा फायनल झाली आणि आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी. ब्रम्हनाच्या मेळाव्याला पायी चालत जाऊ लागलो दुपारपर्यंत आम्ही ब्राह्मणाळ च्या चिंचेच्या बागेमध्ये पोचलो. कृष्णाकाठचा परिसर व चिंचेची झाडे पाहून माझ्या मनाला फार आनंद झाला. आणि कुलकर्णी गुरुजींना सुद्धा आनंद झाला एक जुना विद्यार्थी माझ्याबरोबर आहे याचा अभिमान त्यांना फार मोठा होता. या चिंचेच्या मनामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व स्काऊट पथके आपापली तंबू रोवण्यात दंग होते..।

.. या तीन दिवसाच्या मेळाव्यामध्ये मी दंग झालो होतो आम्ही सुद्धा आमच्या शाळेचा तंबू उभा केला होता. लक्ष्मीबाई बालवीर पथक हा तंबू सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी मिळून उभा केला होता. हा स्काऊट कार्यक्रम तीन दिवस चालणार होता रात्री दहाच्या शेकोटीच्या कार्यक्रमांमध्ये. जिल्ह्यातील विविध बालवीर आणि मुलींचे बालवीर पथक हा कार्यक्रम. शेकोटी पुढे सादर होत होता येळावी स्काऊट पथक शेकोटी पुढे आले आणि या विद्यार्थ्यांनी गाणे चालू केले,, येळावी चा म्हातारा, शेकोटीला आला,,
आले आजोबा ओटीत हे गाणे सुद्धा आमच्या स्काऊटमार्फत त्यावेळी फार गाजले. ती आठवण अजून माझ्या लक्षात आहे शेकोटी जवळ कंदील आहे हा कंदील तंबूतील आहे प्रकाश देण्यासाठी..।
… तीन दिवसाचा स्काऊट मेळावा झाला माझ्या मनाला आनंद मिळाला. हाच आनंद मी अजून विसरलो नाही जुन्या आठवणी किती अमर असतात याचे हे उदाहरण..।

–दत्तात्रय मानुगडे.

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 24 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..