नवीन लेखन...

डोक्याचे संरक्षण कवच

… बाहेर पाऊस वाढला होता हस्त नक्षत्राला सुरुवात झाली होती शिवाय दोन दिवसा मध्ये नवरात्राला सुरुवात होणार होती. या पावसाचे नक्षत्र मुळे शेतामध्ये भयंकर दलदल झाली होती. सफरातून बाहेर पडायची शिष्ट नव्हती इतका पाऊस वाढला होता त्यावेळी आम्ही सर्वजण आमच्या शेतामध्ये राहायला होतो. या पावसा मध्ये अधूनमधून वाऱ्याची झुळूक आली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या डाळ्या एकमेकावर आदळत होत्या. सुनबाई च्या ओढ्याला भरपूर पाणी आले होते पूर्वेकडून वाहणारा सुनबाईचा ओढा पाण्याने भरभरून वहातहोता. आकाश मार्गाने भ्रमंती करणारे पशुपक्षी झाडावरच्या त्यांच्या कोट्यामध्ये निपचिप झाली होती व पशुपक्ष्यांची लहान केले आईच्या उभी मध्ये विसावली होती.शिरटेकर दादांच्या फुल बागेतील फुले आनंदाने नाचत होती झाडावरचे हिरवेगार पोपट अधून मधून ओरडत होते व पावसाला आव्हान करत होते असे माझ्या मनाला वाटत होते. हिरवागार निसर्ग ऐन पावसाळ्यात एकसारखा डूलत होता वातावरण सर्वानाच आनंद देत होते. आमच्या शाळेमध्ये कालपासून हादगा बसवला होता हा हादगा ज्यावेळी हस्त नक्षत्र येते त्यावेळी हा कार्यक्रम शाळेमध्ये नेहमी असायचा. शाळेतील मुली रोज सायंकाळी शाळेसमोर फेर धरून गाणी म्हणाय च्या या गाण्यामुळे शाळे भोवतालचा परिसर आनंदून जायचा. वर्गात एका भिताडावरती हत्तीचे मोठे चित्र काढून टांगलेले असायचे त्या हत्तीच्या समोर फूटाणे, भाजलेले शेंगदाणे, पेरूच्या फोडी, तर कोणाचे चिरमुरे असा प्रसाद ठेवलेला असायचा. हादग्याची गाणी व फेर संपला कि या मुली प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला द्याय च्या. या नक्षत्रा मुळे आनंद होतो खरा परंतु या गावातील हातावर पोट भरणारी माणसे बरीच आहेत. पाऊस चालू झाल्यापासून ती घरी बसून आहेत त्यांच्या पोटाला खायला अन्न नाही असा विचार सुद्धा माझ्या डोक्यात येत होता. शाळा चालू झाल्यापासून मी रानातूनच गावाकडे शाळेला जात असे निसर्गातील तीन ऋतूशना तोंड देण्याची सवय हळूहळू लागली होती. शाळेला जाताना या पावसामध्ये मी भिऊन जात होतो अंगभर कपडे होती परंतु काही ठिकाणी फाटली होती डोकीवर पावसाळ्यात छत्री नव्हती. डोक्यावर पोत्याचीखोळ करून मी डोकीवर घेत असे एका काखेत शाळेचे दप्तर भिजू नये म्हणून मी दक्षता घेत होतो…।
… आज सकाळी उठायला उशीर झाला बाहेर पाऊस मी म्हणत होता रात्री थोडा अभ्यास करून. मी झोपी गेलो होतो या पावसाच्या वातावरणामध्ये मला कधी झोप लागली समजले नाही. मला एक स्वप्न पडले होते अर्थात स्वप्नातील गोष्टी खऱ्या असतात की नाही याचा अभ्यास मला नाही. परंतु काही माणसे म्हणतात स्वप्नातील गोष्टी खर्‍या होतात तर काहीजण म्हणतात स्वप्नातील गोष्टी खोट्या असतात. आता कुणावर विश्वास ठेवायचा या संभ्रमात मी होतो तर मला त्यादिवशी रात्री एक स्वप्न पडले होते. माझ्या वडिलांनी मला शाळेचा ड्रेस आणला आहे शाळेतील पुस्तके वही व पाटी ठेवण्यासाठी नवीन पिशवी आणली आहे. शिवाय पायामध्ये बूट पाय मोजे व नवीन छत्री सुद्धा आणली आहे हे पाहून मला फार आनंद झाला आणि माझे मन म्हणू लागले. आईचे वडीलांनी ऐकले आई अधून मधून वडिलांना म्हणायची माझा मुलगा शेतातून रोज गावाकडे शाळेला जातो याची तुम्हाला काहीच नाही. त्यात हा मोठा पावसाळा रोज पोत्याची खोळ करून शाळेला जातो त्याच्या अंगावर अंगभर कपडा नाही. तुम्ही या मुलांचे बाप आहात त्याचे काही तुम्हाला नाही कशाला म्हणता माझी मुले. बहुतेक वडिलांना राग आलेला असावा म्हणून त्यांनी मला ह्या साऱ्या वस्तू आणल्या असाव्यात. आता मला डोक्यावरचे संरक्षण कवच वडिलांनी आणले आहे मला आता सर्दी थंड ताप येणार नाही. या पावसामुळे मी आजारी पडेल याची भीती आईला फार वाटत होतं माझ्यासारख्या प्रत्येक मुलाच्या आई वडिलानी मुला-मुलींची काळजी घेतली तर निसर्गात येणारा रोग जवळ सुद्धा येणार नाही. परंतु माझे आई-वडील मला मदत करतात तर काय मला शाळेचा फुल पोशाख पायात बूट छत्री आणली आहे. आई मध्येच वडिलांना म्हणाली..।
,,, काय आज पगार झाला वाटतं..।
,,, होय तुझी माझ्या मागं सारखी रखरख असते मुलांनाही आणा ते आणा. म्हणून मी विचार केला आणि या सार्‍या वस्तू मी घेऊन आलो वडील म्हणाले..।
,,,, चांगलं केलं सा तुमच्याशिवाय या मुलांना दुसरे आहे कोण आता बघा आपला मुलगा कसा खुलून दिसतोय. आई म्हणाली…।
,,,, माझ्या मुलांनी नटावे असं मला वाटत नाही का अग मी तीन मुलांचा व दोन मुलींचा बाप आहे. पण काय करू या सोसायटीच्या हा प त्या मुळे पैसा हातात राहत नाही माझ्या. तरीपण तुझी सारखीचरख माझ्यामागे लावल्यामुळे मी निर्णय घेतला आणि या वस्तू घेऊन आलो वडील म्हणाले…।
,,, खरंच आज तुम्ही चांगला निर्णय घेतला आई म्हणाली..।
हा सारा आनंद मला झाला होता माझे वर्गमित्र आता मला नावे ठेवणार नाही त. माझ्या अंगावरची नवीन कपडे पाहून आमच्या शाळेचे हेडमास्तर रामकृष्ण साधू गुरव यांना फार आनंद होईल. आणि गुरुजी म्हणतील बघा बघा आज मानुगडे नवीन कपडे घालून आला आहे. त्याचा वडील रेल्वे मध्ये कामाला आहे त्याच्या वडिलांप्रमाणेच तुमच्या वडिलांनी सुद्धा तुम्हाला शाळेचा पोशाख पाटी-पेन्सिल द्यायला सांगा. शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे तो डोळा उघडा ठेवायचा असेल तर. तुम्ही मुलांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे परंतु मंडळी मी या स्वप्नात इतका दंग झालो होतो. किबस कपड्यामुळे माझ्या शरीराला व पाटी-पेन्सिल मुळे माझ्या ज्ञानाला एक प्रकारचा उजाळा मिळाला होता हे सारे दृश्य मी स्वप्नात पाहत होतो. नवीन शाळेचा पोशाख पायात बूट आणि डोकीवर संरक्षण करणारे कवच म्हणजे छत्री घेऊन मी शाळेला चाललो आहे. आणि आईने मला हाक मारली अरे उठ कि शाळेला कधी जाणार आत्ता पाऊस कमी आला आहे असे म्हणून. माझ्या अंगावरची वाकड आईने ओढली आणि मी जागा झालो. मी जागा झाल्यामुळे स्वप्नातील नवीन पोशाख छत्री यापैकी काहीच दिसत नव्हते. मी आईला म्हणालो अण्णांनी मला शाळेचा पोशाख मी पावसामध्ये भिजेल म्हणून मला छत्री सुद्धा आणली आहे ती कुठे आहे…ः
,, काय छत्री तुला स्वप्नात दिसली की काय आपल्या गरिबांची छत्री म्हणजेखोळ केलेले पोते. बापासारखी तुलासुद्धा स्वप्ने पडायला लागली आहेत अरे स्वप्न खरे नसते. उठ गरम पाणी तापवून ठेवले आहे आंघोळ कर जेवण करून शाळेला जा आई म्हणाली. मी आंघोळ केली जेवण केली आणि रेल्वेलाईन धरून शाळेकडे गेलो वाटेने जाताना मी स्वप्नाबद्दलचा विचार मनात करू लागलो. फक्त आणि फक्त स्वप्नात माझी आशा पूर्ण झाली होती मी जागा झाल्यानंतर माझी आशा मातीमोल झाली होती हे मला कळून चुकले. आणि मन म्हणू लागली सपना तली गोष्ट खरी नसते तू भरपूर शाळा शिक पैसा-अडका तुझ्या जवळ येईल त्यावेळी तुला छत्री मिळेल. अशा विचारातच मी शाळेमध्ये पोचलो शाळे पुढे प्रार्थना चालू होती आणि शेवटच्या ओळी च्या पाठीमागे मी जाऊन उभा राहिलो….।
…………. पूर्णविराम……..।

–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे, (उर्फ दतामा..)
ग्रामीण कथा लेखक..।

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..