नवीन लेखन...

जुळेवाडी तील ज्येष्ठ नागरिक

… गावाकडची गोष्ट…..।

मी परवा सहजच माझी जन्मभूमी जुळेवाडी गावी गेलो होतो. त्यादिवशी मी गावातून बराच वेळ फेरफटका मारला. सध्या गावामध्ये नवीन नवीन इमारती होत आहेत हा आनंद तर आहेच. परंतु गावांमध्ये अजून जुनी घ रे पाहायला मिळाली आणि माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गावातील मातीचा प्रत्येक कण माझ्या ओळखीचा आहे गावातील जुनी माणसे मला ओळखतात. परंतु नवीन पिढी मला ओळखू शकत नाही कारण वयाच्या 18 व्या वर्षापासून मी सर्विस निमित्त बाहेर आहे. नवीन पिढी मला कशी ओळखणार साहजिक आहे जुन्यातील काही माणसे या जगातून निघून गेली परंतु अजून काही जुनी माणसे मला चांगले ओळखतात. पूर्वीचा जिव्हाळा जुन्या माणसाजवळ अजून आहे अजून सुद्धा मला जुनी माणसे म्हणतात… या लेखक सध्या काय लेखन चालू आहे. आमच्या गावचे नाव तुम्ही व कवी संभाजी कोकाटे दोघांनी फार मोठे काम केले. खरंतर लेखन करणे इतके सोपे नाही तरीपण आमच्या गावचे नाव महाराष्ट्रभर झळकावून सोडले. हे ऐकून माझ्या मनाला फार समाधान वाटेल परंतु माझा मित्र कवी संभाजी कोकाटे याची आठवण मात्र कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे. 1965 पासून माझा व कवी संभाजी कोकाटे यांचा लेखन प्रवास चालू होता हे गावाला माहित होते त्यातील ही जुनी माणसे आहेत याची मला प्रखरतेने जाणीव झाली….।

…. जुन्यातील काही माणसे सर्विस मधून रिटायर झालेली दुपारी चार नंतर फिरायला आलेली मला दिसली. त्यातील काही माणसांनी मला ओळखले आणि आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गावांमधून रेल्वे लाईन जाते पलीकडे बुरुंगवाडी अलीकडे जुळेवाडी व काही अंतरावर हजारवाडी. या गावातील माणसे जुळेवाडी तील प्रत्येक घरटी माणूस ट्राफिक डिपारमेंट इंजिनीरिंग डिपारमेंट. व बुरुंग वाडीतील बहुता श लोक इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये काम करतात तर हजार वाडी येथील घरटी एक दोन माणूस टेलिफोन खात्यामध्ये काम करीत होते. हजारवाडी ची माणसे म्हणत जुळेवाडी बुरुंगवाडी यांनी रेल्वेला खरेदी केले आहे तर दोन गावची काही माणसे म्हणत हजार वाडी या गावाने टेलिफोन खाते विकत घेतले आहे. असा सूर मी ऐकूनच होतो नोकरी लागणे हा एक नशिबाचा भाग आहे. टेलिफोन रेल्वे या खात्यात काम करणारी मला ज्येष्ठ नागरिक दिसत होते. आयुष्यभर कष्टाने नोकरी करून ही मंडळी दुपारी चार पासून सायंकाळी पाचपर्यंत घोळक्याने फिरत असतात. आता ही मंडळी रिटायर होऊन ज्येष्ठ नागरिक म्हणून फिरत आहेत. वाटेने जाताना त्यांच्या गप्पागोष्टी नोकरीतील बारीक-सारीक माहिती कोणाला काय अनुभव आला साहेब कसे होते. ह्या चर्चेला एक प्रकारचे उधाण आले होते आमच्या गावापासून नरसोबाच्या मुळापर्यंत या ज्येष्ठ नागरिकांची रांग लागलेली असते हे चित्र दिसून आले. आयुष्यभर नोकरी केली खरे पण बोनस दिवसांमध्ये टाईम कसे जायचे म्हणून ही मंडळी आज रोजी फिरत आहे. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये बाबासाहेब पाटील येळावी विद्या मंदिराचे शिक्षक भगवान कोकाटे, रेल्वे मधील बबन घुले, भीमराव मानुगडे, एरीकेशन डिपारमेंट मधील लक्ष्मण फडतरे, व गावातील चार-पाच माणसे नरसोबाच्या मंदिरासमोर बसलेली दिसली. नरसोबा चे मंदिर व तेथील हिरवागार परिसर यातच या ज्येष्ठ नागरिकांची मन रमते हे मला प्रखरतेने जाणवले. हल्ली नरसोबा चे मंदिर फार सुंदर बनवले आहे आजूबाजूला भरपूर झाडी आहे शिवाय उत्तम प्रकारे फरशी बसवून शोभा वाढवली आहे. हे ज्येष्ठ नागरिक नुसते बसत नाहीत मंदिराच्या समोरील परिसर खराट्याने स्वच्छ करून देवाच्या आरत्या चांगल्या प्रकारे घासून. परिसराची शोभा वाढवित आहेत असे मला कळून चुकले. मी सुद्धा मंदिराच्या एका बाजूला बसलो होतो मला किती छान वाटले म्हणून सांगू. ज्येष्ठ नागरिक वयाने मोठे झाले आहेत पण त्यांचं मन किती लहान आहे हा आदर्श नव्या पिढीला देत असावेत असे सुद्धा माझ्या मनाला वाटत होते…।

… या ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर संसार केला मुलांची मुलींची लग्ने केली. संसारातील सुख-दुःख पेलीत थकल्याभागल्या जीवाला विश्रांती देण्यासाठी व टाईम निघून जाण्यासाठी ही मंडळी फिरत आहे. सध्या त्यांचे वय झाले आहे तरीपण नरसोबाच्या मंदिरासमोर काहीतरी काम करतात हा आनंद माझ्या मनाला वाटत होता. अंगावर फाटलेला शर्ट बदलता येतो परंतु वय झाल्यानंतर जिवाचा व मनाचा शर्ट कुठे बदलायचा हा प्रश्‍न त्यांच्या मनाला पडला असावा का. या साऱ्या आठवणी माझ्या मनामध्ये जाग्या होत होत्या माणूस म्हातारा होतो वयस्कर होतो पण त्याचं मन म्हातारे होत नाही. सतत त्याच्या मनामध्ये काहीना काही विचाराची घालमेल होत असते. ज्येष्ठ नागरिक मनाने तरुण आहेत आपण काहीतरी आदर्श करून दाखवावा ही त्यांच्या मनामध्ये कल्पना असावी असे मला वाटते. बोनस दिवसांमध्ये या ज्येष्ठ नागरिकाकडून फार मोठे काम होणार नाही तरीपण काहीतरी काम करावे व आपला वेळ जावा म्हणूनच नरसोबा मंदिराजवळील जागा स्वच्छ करण्यात यांचा पुढाकार असावा असे सुद्धा वाटते. आयुष्यभरात दुःख व सुख या दोन्ही ची बेरीज म्हणजे म्हातारपण होय. आपण या जगातून कधी निघून जातोय हे कुणाला सुद्धा माहित नाही तरीपण हे ज्येष्ठ नागरिक एकमेकाला नमस्कार करतात. उद्या नमस्कार करायला मी आहे का नाही हे माहीत नाही परंतु आजचा एक दिवस सुखा समान आला गेला याचा आनंद ज्येष्ठ नागरिकांना होत असावा हे मला जाणवले…।

… ज्येष्ठ नागरिकांचे वय 70 च्या पुढे आहे त्यांचे शरीर अतिशय बारीक झाले आहे. तरीपण माणसातून फिरण्याची त्यांची इच्छा फार मोठी आहे उद्या मी सुद्धा वयस्कर म्हातारा होणार आहे. मी सुद्धा यांच्याप्रमाणेच जेष्ठ नागरिक म्हणून फिरणार आहे त्यावेळी ही माणसे असतील का असा विचार सुद्धा माझ्या मनात येत होता. वयस्कर माणसांना शेवटी शेवटी दुखणे निर्माण होते त्यांचे शरीर सडत गेलेले असते. त्यांची हाडे आयुष्यभर काम करून सडून दिलेली असतात कोणाला ब्लड प्रेशर तर कुणाला साखर तर कुणाला पायाचा आजार हे सारे दुखणे घेऊन हे ज्येष्ठ नागरिक फिरत असतात. मनाला बरे वाटते परंतु त्यांच्या यातना या त्यांनाच माहीत हे सारे दुखणे घेऊन दुःख विसरण्यासाठी ही मंडळी समरस झालेली दिसून येते. आजचा दिवस चांगला गेला उद्याचा दिवस उजाडणार आहे की नाही हे माहीत नाही. तरीपण हे ज्येष्ठ नागरिक फिरतात हे काय कमी आहे…।
…… पूर्णविराम….।

–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे, (उर्फदतामा..।)

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..