नवीन लेखन...

शिवाला पडलेले स्वप्न…

…. ……… गावाकडची गोष्ट………..।
.. सकाळ झाली होती झाडावरील पक्षानी आपापली घरटी सोडली होती पक्षी पूर्व दिशेला आकाश मार्गाने भरारी घेऊन पोट कसे भरेल या तयारी त होते. प्रत्येक मानवाला स्वतःचे पोट कसे भरेल याची चिंता लागलेली असते त्याच प्रमाणे मुक्या पक्षाची सुद्धा अशीच गत असते. पोटासाठी मुखे पक्षी भ्रमंती करतात त्याचप्रमाणे मानव सुद्धा वीतभर पोटासाठी भ्रमंती करतो. असे हे उदाहरण सर्वांनाच लागू आहे असे म्हणायचे वावगे ठरणार नाही. माणूस म्हणून किंवा पक्षी म्हणून अशा साठी जगणे हे मला मान्य नाही माणसाने कष्ट करावे स्वतःचे पाय हलवावेत. किंवा मुक्या प्राण्यांची हलचाल करून पोट भरावे असे मला वाटते. गावामध्ये ऊस तोडीचे काम चालू होते लातूर जिल्ह्यातून गडीमाणसे शेतकऱ्याच्या शेतातील ऊस तोडत होते. ऊस तोडताना कंटाळा येऊ नये म्हणून सोलापूरची माणसे गाणे म्हणत होती..
,,, बाभूळ बाईचा, हिरवा हिरवा पाला.
,,,, कुण्या राजाने, वीणाला हाशेला.
……………. किंवा……………….।
,,, मायाक्का माझी,हाय सत्वाची खरी ग.
,,, मला बाई वाटते, असावी माझ्या घरी ग.
अशा गाण्यामध्ये परिसर निनादून गेला होता हवेमध्ये अधून मधून मला गारठा वाटत होता. गावामध्ये काम मिळत नाही म्हणून शिवा ऊस तोडी मध्ये घुसला होता. शिवा गावामध्ये अतिशय शांत स्वभावाचा होता तो प्रत्येकाशी तोंड भरून बोलत होता. परंतु त्याला एक फार मोठी सवय होती ती म्हणजे बिडी ओढण्याची शिवा गावात काम करत नाही गावभर मोकाट फिरतो घरातील ज्वारी विकून बिडीचा बंडल आणून. मारुतीच्या देवळापुढे बिडी ओढतबसतो हे त्याच्या घरातील लोकांना मान्य नव्हते. गेली आठवडाभर त्याला बिडी साठी पैसे मिळाले नाहीत म्हणून तो ऊस तोडी च्या कामाला लागला होता. शिवा दिवस वर उसाच्या मोळ्या टाकण्याचे काम करत होता आणि मुकादमाकडून बिडी साठी पैसे घेत होता. हा त्याचा उपक्रम चालू होता. शिवाजी शाळा अजिबात नाही तो अंगठेबहाद्दर माणूस परंतु हुशार परमेश्वराने कोणालातरी एक विद्या दिलेली असते. त्याप्रमाणे शिवाला सुद्धा परमेश्वराने विद्या दिली असावी असे माझ्या मनाला वाटत होते. गेली पाच दिवस शिवा ऊस तोडत होता आणि सातव्या दिवशी चीन पडली म्हणून कारखाना चार दिवसासाठी बंद पडला. आणि शिवा घरी आला त्याने आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली. आणि त्याच रात्री शिवाला एक स्वप्न पडले शिवा ज्यावेळी रात्री जेवण करून. बिडी ओढून पोत्यावर आडवा झाला रात्र रंगतरंगत जात होती आकाशातील चांदण्या त्याला दिसत होत्या. शिवा स्वप्नामध्ये इतका दंग झाला त्याचे वर्णन करणे कठीण तो रात्रभर बडबडत होता परंतु त्याची आई तारू मावशी गप्प होती. चुलीवर ठेवलेला रॉकेलचा दिवा मंद मंद प्रकाश त्यांच्या घरात टाकत होता. शिवाचा वडील झोपला होता आणि तो सारखा घोरत होता. परंतु शिवा ची आई जागी होती तिच्या मनाला वाटत होते शिवा स्वप्नात आहे. खरंतर शिवा स्वप्नात होता. शिवा ब्रह्मदेवा बरोबर बोलत होता ब्रह्मदेवा तुम्ही आहात तुम्ही ब्रह्म जानता मग शिवाला का जाणतनाही. मी शिवाजी महाराज नाही फक्त माझे नाव माझ्या आई-वडिलांनी ठेवले ही त्यांची चुकी आहे. अशा पद्धतीमध्ये शिवा स्वप्नामध्ये बडबडत होता या त्याच्या बडबड णया मुळे त्याच्या आईला रात्रभर झोप लागली नव्हती. पहाटे पाच वाजले पहाटेची महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी निघून गेली होती अगदी थोड्याच वेळात सूर्य उगवण्याच्या तयारीत होता….।
… आणि काही वेळातच सकाळ झाली शिवा जागा झाला परंतु त्याचा वडील जागा झाला नव्हता. शिवा ची आई शिवाला म्हणाली..।
,, रात्री काय स्वप्नात होतास की काय..।
,, होय मी रात्रभर स्वर्गातील देवासी भांडत होतो शिवा म्हणाला..।
,, पण का देवाने तुझे काय वाईट केले तुला हात पाय डोळे दिले तुला कष्ट करायला नको यामध्ये माझा काय दोष आहे तारू मावशी म्हणाली..।
,, दोष तुझा नाही मी या घरांमध्ये जन्म घेतला हा माझा दोष आहे तुम्ही दोघे जण पुण्यवान आहात. पण तुमच्या पोटी माझ्यासारखा कमी बुद्धीचा कमी शिकलेला मुलगा मिळाला आई मी तुम्हा दोघांना अजिबात दोष देत नाही. मी माझ्या नशिबाला दोष देतो..।
,, असू दे तू माझा पोटचा गोळा आहेस मी तुझ्यावर राग राग करते कारण तू काम करत नाहीस उद्या तुझे लग्न कसे होणार. तुला मुलगी कोण देणार आणि तू संसार कसा उभा करणार याची काळजी मला लागली आहे..।
,, आई तुझे बरोबर आहे मी तुम्हा दोघांना दोष देत नाही मी देवाला दोष देतो अगं मी रात्रभर आकाशातून फिरतोय. आणि तेही रथातून मी रथात बसलो होतो माझ्या बाजूला आपला नरसोबा देव आपला कुळस्वामी हे सुद्धा होते. परंतु मी देवावर फार फिरकी घेतली आणि म्हणालो तुम्ही कसले देव त्यापेक्षा माझे आई-वडील मोठे. यावर देव म्हणाले
प्रथम वंदा माय पित्याचे पद कमळ.
हे मला समजले आणि मी स्वप्नातून जागा झालो तो रथ कुठे गेला मला माहित नाही परंतु आई तुझे व माझ्या वडीलाचे मी पाय सोडणार नाही. रथामध्ये बसून नरसोबा ने मला चांगली ज्ञान शिकवले आहे या जगामध्ये देवापेक्षा आई वडील श्रेष्ठ आहेत हे मला कळून चुकले आहे. आई इथून पुढे मी दिवसभर कष्ट करीन आणि तुम्हाला कष्टाचे पैसे आणून देईन. शिवा आईला स्वप्न सांगत होता आणि मी ऐकत होतो दिवसभर काबाडकष्ट करून कोणाकोणाला काय स्वप्ने पडतात हे सांगता येणे कठीण आहे. मंडळी सकाळ झाली म्हणजे मी माझ्या संपूर्ण गावातून फिरत होतो. आणि मला नवीन काय काय काय बोलते का याच्या साठी माझे कान आतुर झाले होते..।
….. पूर्णविराम…।

–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे, (उर्फ.दतामा)

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..