नवीन लेखन...

एक तीळ नऊ जणात…

आमच्या वेळी, म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे शिक्षक होते. त्याच्याही आधी पु. लं. चे चितळे मास्तर होते. ज्यांनी ‘विद्यादान’ हेच आपलं ध्येय आयुष्यभरासाठी जपलं. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसंबसं भागवत आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं.
आज पन्नास वर्षांनंतर शिक्षणपद्धती पूर्ण बदलून गेली आहे. पूर्वी सत्तर टक्के म्हणजे डोक्यावरून पाणी होतं. आज ९९.९९ टक्के असूनही काॅलेजला प्रवेश मिळेल की नाही, याची पालकांना शंका असते. आत्ताच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पूर्वीसारखी मेहनत, पाठांतराची गरज राहिलेली नाही. साचेबद्ध उत्तरांनी त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात.
या परिस्थितीत जगातल्या पार्श्र्वभूमीवर, भारत देशातील महाराष्ट्रात, सोलापूरमधील एका वाडीतील ‘हिरा’ चमकून सर्व जगाला दिपवून टाकतो. तो म्हणजे ‘झेडपी गुरूजी’ रणजितसिंह डिसले!!
जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून भारताला हा मान पहिल्यांदाच मिळत आहे. सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजितसिंह डिसले हा एक ध्येयवादी शिक्षक आहे. त्याची शिक्षण क्षेत्रातील मुलखावेगळी कामगिरी लक्षात घेऊन युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या सात कोटी रुपयांच्या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. जगभरातील १४० देशांतील १२,००० हून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून रणजितसिंह डिसलेचे नाव जाहीर झालेले आहे.
रणजितसिंहने क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेली आहे. त्याचीच जागतिक पातळीवर दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत एकूण दहाजण होते. त्यातील एक भारतीय या पुरस्काराचा मानकरी ठरला. साहजिकच उरलेले नऊजणही थोड्याफार फरकाने त्याच पुरस्काराचे मानकरी होण्याइतकेच कार्यक्षम होते. त्यांची निराशा होणे स्वाभाविकच आहे. रणजितसिंहने या संदर्भात जी कृती केली आहे, त्या कृतीने भारताची मान जगभरात शतपटीने उंचावलेली आहे. त्याने मिळणाऱ्या सात कोटी रकमेतील निम्मा वाटा, म्हणजे साडेतीन कोटी रक्कम या अंतिम फेरीतील नऊ जणांना वाटून देण्याचे ठरविले आहे. याला म्हणतात दातृत्व!
पैशाची गरज कोणाला नसते? उरलेले साडेतीन कोटी देखील हा अवलिया टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार आहे… ज्यामुळे शिक्षकांमधील नवीन उपक्रमशीलतेला चालना मिळेल… रणजितसिंह डिसलेचे मनःपूर्वक अभिनंदन व शिक्षण क्षेत्रातील त्याच्या पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!!!
रहावत नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रातीलच एक उदाहरण द्यावसं वाटतं. एक मराठी चित्रपट निर्माता. चित्रपट तुफान चालला. उत्पन्नाचे विक्रम मोडीत काढले. जेव्हा रौप्यमहोत्सव साजरा करण्याची वेळ आली तेव्हा टाॅकीजच्या कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागेल म्हणून चित्रपट आधीच उतरवला. त्याच म्हणणं होतं की, हे यश माझ्या नशीबातच होतं, म्हणून ते मला मिळालं…
हा कुठे आणि एक तीळ नऊ जणांत वाटून खाणारा रणजितसिंह कुठे?

– सुरेश नावडकर

६-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..