नवीन लेखन...

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती (आठवणींची मिसळ १२)

“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते. […]

लाघवी करस्पर्श (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४२)

मी तिचं नाव तेव्हा ऐकलंच नव्हतं पण माझ्या विचारांत ती मला लाघवी करस्पर्श म्हणूनच आठवते. किती जादू होती तिच्या हातांत! केवळ आश्चर्यकारक. कधी आणि कुठे, हे महत्त्वाच नाही पण केव्हा तरी एकदा मी माझ्या भ्रमंतीमधे एका विरळ लोकवस्तीच्या जिल्ह्यातून जात असतांना अचानक रात्र झाली. मी चालत जात होतो त्यामुळे आता ज्या गांवात मला पोहोचायचे होते, तिथे […]

घेई छंद! (आठवणींची मिसळ ११)

मध्यंतरी आपल्या गृपवर डॉ. हरि नरके यांचे सह्या जमवण्याच्या त्यांच्या छंदात आलेल्या अनुभवाबाबत एक पत्र पोस्ट केले होते. त्यांच्या छंदाच त्यानी छान वर्णन झालं होतं. ज्या ज्या कार्यक्रमाला ते हजर रहात त्या त्या कार्यक्रमांतील मंचावर असणा-या सर्व मान्यवरांच्या सह्या ते घेत असत. त्या सर्वाची तपशीलवार नोंद ते ठेवत. त्यानी खूप श्रमांनी हा छंद जोपासल्याचे जाणवले. असे छंद मनापासून केल्याशिवाय जोपासणे कठीण असते. त्यासाठी चिकाटी, वेळ आणि थोडा फार पैसाही खर्च करावा लागतोच. त्यांनी पत्र लिहिलं होतं ते त्यांना आलेल्या कटु अनुभवासंबंधी. एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने सही घेण्यासाठी भरपूर मोठी रक्कम मागितल्याचे त्यांनी लिहिले होते. सर्वानीच त्या कलाकाराचा धिक्कार केला. ते सर्व वाचताना माझ्या कांही छंदाबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. मग त्याही तुम्हाला सांगाव्यात असे वाटले. […]

दुस-यांच्या नजरेतून (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४१)

“आपला गालिचा फारचं खराब झालाय. जेव्हां जेव्हां एखादा पाहुणा येतो, तेव्हां मला या गालिचाची लाज वाटते.” सौ. मालिनी घाडगे म्हणाल्या. आपल्या बायकोला नेहमी खूष पाहू इच्छिणारे, तिच्याशी जमवून घेणारे श्रीयुत घाडगे गालिचाकडे पहात म्हणाले, “नव्या गालिचाची किंमत साधारण …..” त्यांच वाक्य पत्नीने पूर्ण करावं अशी अपेक्षा करत ते थांबले. सौ. घाडगेनी ते वाक्य पूर्ण केलं, “फक्त […]

रेल्वे पोलिस आणि मी – भाग २ (आठवणींची मिसळ – भाग १०)

आता मी जे दोन प्रसंग सांगणार आहे ते कदाचित पूर्वी कुठेतरी मी थोडक्यात लिहिलेही असतील.त्यातला पहिला प्रसंग माझ्यासाठी इतका गंभीरनव्हता पण मजेदार होता. तर दुसरा फारच गंभीर प्रसंग होता आणि त्याची परिणती वेगळी झाली असती तर मला ते प्रकरण महाग पडलं असतं. […]

छुपा देवदूत (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४०)

आळशीपणा, दुर्गुण आणि दारू पिण्याची सवय ह्यांचा व्हायचा तोच परिणाम होऊन त्या आईचा थंडगार मृत देह तिच्या दुर्दैवी मुलांच्या मधोमध पडला होता. ती दारूच्या नशेत स्वतःच्या घराच्या दारात येऊन पडली व भेदरलेल्या तिच्या मुलांच्या समोरच तिचा देह निष्प्राण झाला. एऱ्हवी त्या बाईवर रागाने डाफरणारा प्रत्येक गांवकरी आता हळहळत होता. मृत्यू माणसाच्या कोमल भावनांना आवाहन करतो. तिच्या […]

रेल्वे पोलिस आणि मी – भाग १ (आठवणींची मिसळ ०९)

तुम्ही सर्वांनीच अनेक वर्षे लोकलने किंवा अनेकवार दूर जाणाऱ्या गाड्यांनी प्रवास केला असेल आणि तरीही तुमचा कधीही रेल्वे पोलिसांशी संबंध आला नसेल. बहुतेकांनी रेल्वे पोलिसांना ओझरते कुठेतरी पाहिल्याच आठवत असेल. त्यामुळे तुम्हाला माझ्या आजच्या लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटलं असेल. लेख लिहिण्याएवढा यांचा रेल्वे पोलिसांशी काय संबंध? विचार योग्य आहे.पण माझ्या बाबतीत अशा मजेदार घटना घडल्या की रेल्वे पोलिसांनी नाकी दम आणला. […]

एकनिष्ठ मित्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३९)

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता. छोटी बदके बाजूच्या तळ्यांत आईबरोबर पोहत होती. ती त्यांना पाण्यात खेळ खेळायला शिकवत होती पण त्यांना कांही ते जमत नव्हतं. तीं इकडे तिकडे भरकटत होती. उंदीरमामा म्हणाला, “किती द्वाड मुलं आहेत ! त्यांना कडक शिक्षा कर.” बदकांची आई म्हणाली, “त्याची गरज नाही. पालकांनी संयम ठेवायला […]

दूर न पोहोचलेले सूर (आठवणींची मिसळ – भाग ८)

आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला. […]

उघडी खिडकी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३८)

“आपण बसा ना ! माझी मावशी थोड्याच वेळात खाली येईल. आपलं नांव नानासाहेब नाफडे म्हणालात ना !” मावशींची पंधरा वर्षांची नटखट भाची बंगल्यात नुकताच प्रवेश केलेल्या पाहुण्यांना म्हणाली. ती पुढे म्हणाली, “तोपर्यंत मी आहे ना तुमच्याशी बोलायला. चालेल ना !” थोड्याच वेळांत तिची मावशी खाली येणार आहे हे लक्षात घेऊन पण ह्या क्षणी त्या भाचीला खूष […]

1 4 5 6 7 8 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..