नवीन लेखन...

घोडे व्यापाऱ्याची मुलगी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ८)

हॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत “रद्दी” पासून “अत्त्युत्तम” पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे. […]

रत्नहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा ७)

स्त्री कोणत्या घरांत जन्मली आहे ह्यापेक्षा तिचं सौंदर्य, तिची कोमलता, तिचा कमनीय बांधा, तिची मोहकता, तिचा स्वाभाविक डौलदारपणा, तिचे उत्स्फूर्त विलोभनीय वागणे आणि तिचं चातुर्य ह्या गोष्टी स्त्रीचं योग्यता ठरवतात आणि एखाद्या झोपडीतील मुलीलाही एखाद्या राजकुमारीच्याच पातळीवर आणून ठेवतात. […]

गोमु आणि निवडणूक (गोमुच्या गोष्टी – भाग १५)

निवडणूक जवळ आलीय. निवडणूक, मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, एक वातावरण तयार करतेच. प्रत्येक निवडणुकीची आपली अशी खास वैशिष्ट्य असतात. लोकसभेच्या निवडणुकीचा पसारा खूप मोठा असतो. विशेषतः उमेदवाराच्या दृष्टीकोनांतून हा पसारा मोठा असतो. जेवढी मोठी निवडणूक तितका उमेदवाराचा खर्च जास्त. […]

माझी स्वतःची खरी भूतकथा (संक्षिप्त रूपांतरीत कथा ६)

यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली. आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो. आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू. ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही. त्याने लग्न करावं. तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता. भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या. तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता. वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता. माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं. […]

गुप्तहेर गोमु – भाग २ (गोमुच्या गोष्टी – भाग १४)

रूम उघडून ती अचानक वळली आणि तिने गोमुचा हात धरला. “आंत या, ना !” असे म्हणत तिने गोमुला रूममध्ये ओढला. भांबावलेल्या गोमुने कांहीच विरोध केला नाही. “मी आवडले कां तुम्हांला ? कालपासून माझ्या मागे मागे आहांत. मी पाह्यलेय. मग आतां कां लाजतां ?” गोमुला कांहीच उत्तर सुचेना. […]

गुप्तहेर गोमु – भाग १ (गोमुच्या गोष्टी – भाग १३)

गुप्तहेर (डीटेक्टीव्ह) ही कल्पना तशी जुनीच. गुप्तहेर हे ही कांही आपल्याला नवीन नाहीत. मध्ययुगापासून ते तहत दोन्ही महायुध्दांपर्यंत गुप्तहेर होतेच. पुराणांमध्येही कचाने देवांतर्फे हेरगिरी केलीच होती. आधुनिक युगांत खाजगी गुप्तहेरांची मराठी लोकांना, विशेषतः मराठी वाचकांना, ओळख करून दिली ती कै. लेखक बाबूराव अर्नाळकर यांनी. […]

ओढ्याच्या पल्याड (संक्षिप्त रूपांतरीत कथा ५)

ओढा जिथे चंद्रकोरीसारखा वळला होता, तिथूनच थोड्या अंतरावर खुळीचं खोपट होतं. खुळीचं खोपट आणि ओढा ह्यामध्ये मोठं मोकळं कुरण होतं. जेव्हां ओढा पाणी पुरवत असे तेव्हां कुरणात गुरं चरत. मागची झाडी आणि समोरचा ओढा ह्याभोवती खुळीने मनाने एक वर्तुळ आंखून घेतलं होतं. त्याबाहेर ती जात नसे.
हाच तिचा खुळेपणा होता. […]

गोमु गुप्तधनाच्या शोधांत (गोमुच्या गोष्टी – भाग १२)

एकदा गोमु माझ्या खोलीवर आला तेव्हां त्याच्या हातांत एक जुनाट गुंडाळी केलेला कागद होता. मी त्याला हे काय आहे म्हणून विचारणार होतो पण त्या आधीच तो म्हणाला, “इंग्रजीत चान्स ‘आॕफ लाईफ टाईम’ म्हणतात ना, तो आलाय माझ्या आयुष्यांत.”
मी त्याच्या तोंडाकडे पहातच राहिलो. […]

भिंतीच्या पलिकडे (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४)

मी अनेक वर्षांनी पुन्हा डेहराडूनला जाणार होतो. पाश्चात्य देशांत जाऊन मी नशीब काढलं होतं आणि मी डेहराडूनमधील मित्रांना विशेषतः माझा शाळासोबती मोहन इनामदारला भेटायला उत्सुक होतो. मी डेहराडून सोडल्यावरही अनेक वर्षे त्याचा आणि माझा पत्रव्यवहार चालू होता. सर्व पत्रव्यवहारांमध्ये होतं तेच आमच्या बाबतीत झालं. पत्रव्यवहार प्रथम कमी कमी झाला आणि मग तो कधी बंद पडला ते माझ्या लक्षांतच आलं नाही. […]

गोमु पैज घेतो (गोमुच्या गोष्टी – भाग ११)

विजापूरच्या बादशहाने शिवाजी राजांना धरण्याचा/मारण्याचा पैजेचा विडा दरबारांत ठेवला होता. तो अफजलखानाने उचलला. त्याचे पुढे काय झाले ते आपल्याला माहित आहेच. तेव्हां कुठलीही पैज घेणं ही गोष्ट सोपी नाही. मला वाटते पैज घेणे किंवा कठीण गोष्ट करायचे आव्हान देणे हे पुराणकालापासून चालत आलेलं असावं. महाभारतात असे बरेच प्रसंग आहेत. प्रतिज्ञा आणि पैज यांत अर्थातच फरक आहे. प्रतिज्ञा करणाऱ्याला कुणी आव्हानही देत नसत आणि नंतर बक्षिसही देत नाही. पैज घेतांना एक आव्हान देणारा असतो आणि दुसरा ते स्वीकारणारा असतो. पैज जिंकला तर जिंकणाराला काय मिळणार आणि तो हरला तर काय द्यावं लागणारं हे पैज घेतानाच ठरतं. त्यादृष्टीने महाभारतांतला द्यूत खेळण्याचा प्रसंग पैज ह्या सदरांत मोडतो. […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..