डीएनए (डीऑक्सिरायबो न्युक्लिक ॲसिड)
आपल्या पेशीतीलं सर्व जैविक, जैवरसायनिक आणि रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करणारा रेणू म्हणजे ‘डीएनए’ पेशीत असणाऱ्या केंद्रकात हा महारेणू सामावलेला असतो. खरे तर डीएनए एकच रेणू नसून अनेक रेणू एककांची एक भलीमोठी साखळी असते. आणि यातील प्रत्येक एकक (म्हणजे प्रत्येक मणी) चार वेगवेगळ्या रेणूंचा बनलेला असतो. […]
