भारतीय रेडिओ खगोलशास्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप
१९५२ मध्ये ऑस्ट्रेलियातील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. सिडनी जवळील पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (पॅराबोलीक) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९६१ मध्ये अमेरिकेतील स्टँनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली. […]
