नवीन लेखन...

छंद नाण्यांचा…

मी सर्वप्रथम ‘नाण्यांचा इतिहास’ अभ्यासला आणि मला नाण्याविषयी मौलिक माहिती मिळत गेली. प्राचीन भारतीय साहित्यात बृह्दारण्यक, उपनिषद, अग्निपुराण, मस्यपुराण, मनुस्मृती इत्यादी प्राचीन ग्रंथात सुवर्ण, द्रम, कार्षापण, निष्क, कृष्णल, रूप्य ही नाणीवाचक नावे आढळतात. […]

काव्य हा साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार

वाङ्गमय निर्मितीला प्राचीन परंपरा आहे. अनेक प्रकारचे वाङ्गमय सर्वश्रुत आहे..कुठल्याही राष्ट्राची आद्य ओळख म्हणजे तेथील संस्कारीत साहित्य . प्राचीन संस्कृत साहित्य म्हणजे भारतभूमिचा विशाल , अथांग सागर असलेला साहित्यसंस्कारीत वारसा आहे . या साहित्य संस्कारांची शास्रीय , प्रतिभावंत परंपरेची महनीयता ही आद्य कवी व्यासांच्या समर काव्यापासून मानली जाते . अशा सहित्यश्रुंखलेची व्याप्ती प्रचंड आहे . संस्कृत […]

‘दलाल पर्व’

गोव्यामधील मडगाव हे छोटंसं निसर्गसुंदर गाव. गावातील एकमेव शाळेतील पाचवीचा वर्ग. वर्गावरचे मास्तर रजेवर असल्याने मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या बाकावरील एक मुलगा गोष्ट ऐकता ऐकता मुख्याध्यापकांचे पेन्सिलीने वहीमध्ये चित्र रेखाटत होता. […]

हत्ती व सिंहाचा रेल्वेरुळांवरील वावर

भारताच्या अति-पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, या भागांत काही वर्षांपूर्वी रेलगाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आय.आय.टी.च्या इंजिनीअर्सनी ‘अनमॅन्ड एरिअल व्हीइकल’ (यु.ए.व्ही.) चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना (ते रेल्वेमार्गावर/पाशी आलेले असल्यास) शोधणारे संवेदक बसविले […]

बँकिंग विनोद

→ जर पैसे झाडाला लागत नाहीत तर बँकांच्या “शाखा” का असतात?? → बँकर्स कधीच कंटाळत नाहीत, त्यांचा फक्त ‘इंटरेस्ट’ कमी होतो. → नोटाबंदीचा एक फायदा झाला की आपल्याला विभागातील सर्व ATM चा व त्या निमित्ताने आजूबाजूच्या परिसराचा ठावठिकाणा मुखोद्गत झाला. → जेव्हा एखाद्या व्यक्तीवर बँकेचं ‘दहा लाख’ रुपये कर्ज असतं तेव्हा त्याची परतफेड हा त्या व्यक्तीचा […]

जनरेशन गॅप

ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व… हा विषय मोठा आहे. श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठांच्या रांगेत समाविष्ट होणे अत्यावश्यक असते असं नाही. तरूण वयातही श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकतं. जसं की ज्ञानेश्वर माऊलींनी तरुण वयात ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानदेवी’ ही गीताटीका लिहिली. सर्वसामान्यांपर्यंत तत्त्वज्ञान पोचवले. […]

विश्वरूप

कोमल वेलिवर कळीने उमलावे फुलुनी फुलावे गंधुनी गंधाळावे… प्रसन्न चराचरी मनमन दरवळावे नेत्री विठ्ठलविठ्ठलु भक्तितुनी पाझरावे… परब्रह्म ते सावळे गाभारी प्रकट व्हावे कृतार्थ आत्मरूप विठ्ठल चरणी रमावे… विश्वरूप ते गोजीरे टाळमृदंगात भजावे दिंडीपताका वैष्णवी शिरी धरूनी नाचावे… ****** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०० २१/११/२०२२

सफारी इन माबुला – भाग २

आल्या आल्याच सुग्रास पंगतीचा बेत होता. खास ‘बिग५’ च्या देखरेखीखाली! जेवणगृहाच्या भिंतीवरून ते पाहुण्यांकडे लक्ष ठेऊन होते. सजावट विविध प्राण्यांची मुंडकी, कातडी, शिंगे वापरून केलेली होती, उजेडही आवश्यकते इतकाच. आफ्रिकन पदार्थ जेवणात होतेच पण इतरही चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. पदार्थांच्या चवी थोड्याश्या परिचित वाटत होत्या म्हणून चौकशी केली तर मुख्य आचारी भारतीय असल्याचे समजले. नुसत्या वासानेच […]

राज कपूर – निळ्या डोळ्यांचा जादूगार !

त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते. […]

बीज अंकुरे अंकुरे

सकाळी सव्वा सातच्या सुमारास फलटणच्या दिशेने जाताना कात्रज गेल्यावर बोपदेव घाटातील नागमोडी वळणे घेत पुणे शहरातील काँक्रीटचे जंगल बघायला मिळाले. पश्चिमेकडील सहयाद्रीच्या पर्वतरांगा काहीशा पोपटी आणि काहीशा हिरव्या रंगाचा शालू नेसून नटल्या सारख्या दिसू लागल्या होत्या. वातावरण काहीसं ढगाळ असले तरी काही कोवळी सूर्यकिरणे ढगांची चादर पार करुन, रस्त्याच्या कडेला, खडकाळ पठारावर नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या लुसलुशीत […]

1 2 3 4 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..