हिशोबातील शिल्लक
हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं । जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं ।। घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण । प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण ।। कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता । उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता ।। कधी काळचा निवांतपणा, घालविला […]
