क्लिष्ट ईश्वरी मार्ग

संसारातील ऐहिक सुखे,  धडपडीने मिळवीत असे

प्रयत्नातील आनंद खरा,  भोगण्यांत तो दिसत नसे

उबग येई ह्याच सुखाची,  जीवन खर्चीले ज्या करितां

त्या सुखांत समाधान नव्हते,  जाणवले तेच मिळतां

प्रभू मिलनाचा आनंद तो,  चिरंतर ते समाधान देयी

ईश्वरी मार्ग खडतर असूनी,  क्लिष्टता येते मनाचे ठायीं

तसेच चाला उबग सोसूनी,  कठीण अशा त्या मार्गावरती

यश येईल कष्टाचे परि,  संपूर्ण समर्पण जेव्हां होती

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1763 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…