रक्तरंजीत अफगाणिस्तान

शीत युद्धाच्या काळात अमेरिका व सोविएत युनियन (आजचे रशिया) या दोन महासत्ता अस्तीत्वात होत्या या दोनही महासत्तानी आपापली विचारसरणी इतर राष्ट्रांमध्ये लादण्याचा प्रयत्न केला व एकमेकांच्या आर्थिक विचारसरणीला विरोध केला. क्म्युनीजम व भांडवलशाही या दोन विचारसरणींच्या वैचारिक वादामुळे जगात अनेक ठिकाणी युद्धे निर्माण झाली त्यापैकी काही महत्वाची युद्धे म्हणजे व्हिएतनाम युद्ध,कोरियन युद्ध,व अफगाणीस्तान युद्ध.

विशेषत: अफगाणिस्तानात सुरू झालेले युद्धं हे आजही सुरू आहे. जवळ जवळ मागील चार दशकापासून अफगाणिस्तान धुमसत आहे. या युद्धाची मुख्य ठिणगी पेटली ती 1978-1979 साली जेव्हा अफगाणिस्तानात नूर मोहम्मद तराकी यांचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार डाव्या विचारसरणीचे होते. व या नंतर ‘नूर मोहम्मद तराकी’ यांनी विविध कारणांसाठी रशिया कडे मदत मागण्याचे ठरविले व हे सरकार रशिया धार्जीणे झाले. या उलट शीतयुद्धाच्या काळात दोन्ही महासत्तांचे एकमेकांवर लक्ष रोखून होते अफगानिस्तान रशिया कडे झुकत असल्यामुळे कुठे ना कुठे अमेरिकेच्या मनात खदखद निर्माण झाली . अफगानिस्तान ला कम्यूनिजम च्या प्रचारापासून व क्म्युनिस्ट होण्यापासून वाचवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातील इस्लामिक मूलतत्व वाद्यांना मदत करण्यास सुरुवात केली व त्यांना सरकार विरोधात व रशिया विरोधात लढण्यास सक्षम बनवीले.

अफगाणिस्तानात ‘नूर मोहम्मद तराकी’ यांचे रशिया धार्जिणे सरकार आल्यापासून अफगाणी व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले. अफगाणिस्तान हा मुळता: एक कृषिप्रधान देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर जमिनी या काही ठराविक व मोजक्या लोकांकडे होत्या त्यात बदल करण्यात आला व जमिनी या सर्व सामान्य गरीब शेतकर्‍याकडे वाटण्यात आल्या व यामुळे एक विशिष्ट वर्ग हा सरकार पासून असंतुष्ट व नाराज झाला.

डाव्या सरकार ने अफगाणिस्तानातील सामाजिक परिस्थितीत व विशेषत; महिलांच्या परिस्थितीत बदल आणण्याचे ठरविले त्यांची प्राथमिक सुधारणा करण्यासाठी महिलांसाठी शिक्षण सुरू केले. तसेच बुरख्यावर बंदी घालण्यात आली. अफगाणिस्तान हा इस्लामिक देश असल्यामुळे स्त्रिया सहजता: बुरखा वापरीत असत. पुरुषांसोबतच स्त्रीयांचे शिक्षण होत असे व साक्षरतेस प्राधान्य देण्यात आले. परंतु अशा प्रकारच्या निर्णयामुळे इस्लामिक मूलतत्ववादी गट सरकार वर नाराज झाला व त्यांना सरकार ने केलेले बदल व अटी या ईस्लाम साठी धोकादायक आहेत व धर्मभ्रष्ट करणारे आहेत असे वाटू लागले. त्यामुळे या असंतोषतील उद्रेकामुळे ईस्लामवाद्यांनी अफगाणिस्तानातील शाळा-महाविद्यालये यांची तोडफोड केली व एका क्रांतीला सुरुवात झाली या क्रांतिचे पडसाद संपूर्ण अफगाणिस्तानात उमटले व यातून सुटण्यासाठी अनेक नागरिकांनी आपला प्रदेश सोडून इतर देशांत विस्थापन केले. इराण,सौदी अरेबिया,पाकिस्तान  या इस्लामिक राष्ट्रांतून सुद्धा ईस्लामवाद्यांना व आंदोलनकर्त्यांना रशिया विरोधात पाठिंबा मिळू लागला. ईस्लामिक राष्ट्रांनी जिहादच्या नावावर मदत करण्यास सुरुवात केली .

अमेरिकेत सुद्धा अफगाणिस्तांनातील रशिया धार्जीणे सरकार ही एक धोकादायक बाब वाटु लागली. कम्यूनिजम हा अफगाणिस्तानात प्रवेश करेल नंतर तो इराण,सौदी अरेबिया या राष्ट्रांत फोफावेल व संपूर्ण क्षेत्रीय दृष्ट्या हा धोका असेल असे अमेरिकेस वाटू लागले अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘ब्रेझेंस्की’ राष्ट्राध्यक्ष ‘कार्टर’ यांना म्हणाले की, ”रशिया अफगानिस्तान चा वापर दक्षिणेकडे येण्यासाठी सुधा करू शकतो ज्याद्वारे तो पर्शिया च्या आखातापर्यंत पोहोचू शकतो.”

जुलै 1979 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातील मुजाहिद्दिंनांना प्रथमता: शस्त्रे पुरविली. त्याच प्रमाणे त्यांना कम्युनिकेशन ची साधने पुरवीली. या शस्त्रधारी माणसांना ‘मुजाहिदीन’ असे म्हणण्यात आले म्हणजे ’देवाचे सैनिक’ धर्माच्या नावाने केले जाणारे युद्धं धर्मयुद्ध ज्याला ईस्लाम मध्ये ‘जिहाद’ असे म्हणतात. व त्याचे सैनिक ‘जिहादी’ किंवा ‘मुजाहिद्दीन’. त्यामुळे या मुजाहिद्दिंनांमध्ये व रशियन सैन्यात युद्ध सुरू झाले.

‘जिहाद’ साठी इराण,पाकिस्तान या देशातील अनेक तरुण पाकीस्तानातून अफगाणिस्तानात जात असे. विस्थापित झालेले अनेक अफगाणी पाकिस्तानात होते व नंतर ते जिहाद साठी अफगाणिस्तानात आले. या तरुणांचे लष्करी प्रशिक्षण पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी लश्करा कडून होत असे. अफगाणिस्तानात सुरू झालेल्या युद्धाने मोठे रूप धारण केले; ज्यामुळे रशियाचे सुद्धा अनेक सैनिक मारले जाऊ लागले व अशा प्रकारे रशियाने अफगाणिस्तानात आपले सैन्य अधिकाधिक पाठवण्यास सुरुवात केली.

‘नूर मोहम्मद तराकी’ यांच्या नंतर ‘अफिजूल्ला आमिन’हे राष्ट्राध्यक्ष झाले हे सुद्धा रशिया धार्जीणे व मुख्य नेते होते. अफगणिस्तानातील असंतोष सुरू असताना सुद्धा त्यांनी आपली धोरणे कायम ठेवली. परंतु काही कालांतराने आमिन व रशिया यांच्यात तणाव निर्माण झाले राष्ट्राध्यक्ष अफिजूल्ला आमिन यांनी ऑक्टोबर 1979 मध्ये तराकी यांची हत्या करण्याचा आदेश दिला. त्यांची हत्या करण्यात आली. या नंतर केजीबी(रशियन गुप्तचर यंत्रणा)ने हफिजूलला आमिन यांची हत्या केली कारण आमिन हे अमेरिकेच्या बाजुने झुकत होते.

‘हफिजूल्ला आमिन’ यांच्या हत्येनंतर ‘बारबाक कारमाल’ हे सत्तेवर आले जे पूर्णता: रशिया धार्जिणे होते व या नंतर रशियाचा सैन्याने पूर्णता: अफगाणिस्तानात आक्रमण केले. व अमेरिकेने मुजाहिद्दिंनांना शस्त्र पाठविण्यास मदत केली. ही शस्त्रे पाकीस्तानातून अफगाणिस्तानात पोहोचत असत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘ब्रेझेंस्की’ यांनी मुजाहिद्दिंनांना पाकिस्तान व अफगाणिस्तान सीमा रेषेजवळ भेट सुद्धा दिली होती व युद्धासाठी आपला पाठिंबा दर्शविला.

अफगाणिस्तान मध्ये युद्ध पेटले ,रशियन सैन्याची संख्या वाढली. त्यांना अफगाणिस्तानात अमेरिकेविरोधात लढायचे असे सांगून पाठविण्यात आलेले होते. परंतु अफगाणिस्तानातील परिस्थिति वेगळी होती इथे त्यांना मुजाहिदीनांन विरोधात लढावे लागत होते. केजीबी(रशियन गुप्तचर यंत्रणा) च्या अधिकार्‍यानी अफगाणी सेनेला कळविले की मुजाहिदिंनांना अमेरिकेचा पाठिंबा आहे त्यामुळे ही लढाई अमेरिकेविरोधात आहे. जी युक्ति रशियाने क्युबा मध्ये वापरली होती तीच युक्ति अमेरिकेने अफगाणिस्तान वापरली.

रशियन सैन्याला अफगाणिस्तान च्या भौगोलिक रचनेमुळे व डोंगर दर्‍यांमुळे युद्ध करणे अत्यंत कठीण गेले. अनेक लढाया ते जिंकत असे परंतु त्याचा काहीही उपयोग होत नसे कारण दुसर्‍या तिसर्‍या दिवशी मुजाहिद्दीन पुन्हा तो प्रदेश बळकाऊन घेत असे. हे युद्ध पूर्णत: गनिमी कावा पद्धतीचे युद्ध होते.

1981 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांत ‘रोनाल्ड रिगन’ यांची निवड झाली व ते राष्ट्राध्यक्ष झाले व या सरकारने अफगाणिस्तानात लष्करी पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढवला. नोव्हेंबर 1982 मध्ये ‘ब्रेझ्नेव’ यांचा मृत्यू झाला व ‘युरी एन्त्रेपो’ सत्तेवर आले॰

संयुक्त राष्ट्रसंघाने अफगानिस्तान प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यापैकी एक म्हणजे अन्डर सेक्रेटरी ‘दिएगो कोर्दोवज’ यांनी सोविएत युनियन सोबत सैन्य मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु ते तेव्हाच जेव्हा लष्करी मदत मुजाहिदिंनांना पोहोचणे थांबेल. युरी एन्त्रेपो यांनी हा प्रस्ताव मान्य केला होता परंतु अमेरिकेने हे मान्य केले नाही कारण त्यांना रशियावर कुठल्याही प्रकार चा विश्वास नव्हता. त्यामुळे अमेरिका व पाकिस्तान हे करारास मान्य नव्हते.

सोविएत युनियनने युद्धात लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर या हवाई शस्त्रांचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला. व अफगाणिस्तानातील गावा-गावांत हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात मुजाहिदिनांचे कंबरडे मोडले व  मोठे नुकसान झाले स्थानिक गावकर्‍यांचे सुद्धा यात प्राण गेले त्यांची घरे पूर्णता: मोडकळीस आली. सोविएत युनियन च्या सैन्याचे सुद्धा अनेक बळी जात होते. परंतु सोव्हिएत युनियनच्या जनतेला याची जाणीव होत नव्हती. रशियात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये याचा उल्लेख होत नव्हता. रशियन सैन्य अफगाणिस्तानात रस्ते,शाळा,महाविद्यालये बनवत आहेत शिक्षणातून प्रसार व प्रगति करीत आहेत असा प्रकार चा खोटा प्रचार,मजकुर रशियात छापत असत. परंतु हा खोटा प्रचार फार काळ टिकून राहिला नाही॰ तेथील नागरिकांनी या युद्धा विरोधात टीका करण्यास सुरुवात केली,क्रेम्लिन मधील नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव यांची भेट घेतली हजारो नागरिकांनी गोर्बाचेव यांच्या कार्यालयाभोवती घोळका केला व या नंतर युद्ध थांबवण्याचा विचार गोर्बाचेव यांनी सुरू केला.परंतु यातही काही वैचारिक अडचणी होत्या एखाद्या राष्ट्राने स्वता: सैन्य मागे घेतल्यास ती त्या राष्ट्राची हार मानली जाते जसे अमेरिकेला व्हिएतनाम मधून आपले सैन्य मागे घ्यावे लागले व ती अमेरिकेची हार मानली गेली त्याचप्रमाणे ही रशियाची सुद्धा अफगाणिस्तानातील हार मानली गेली असती म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाचे दिएगो कोर्दोवज यांनी गोर्बाचेव यांना रशियन सैन्य संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत मागे घेण्यास सांगितले व त्या प्रमाणे सैन्य 1989 साली मागे आले. या निर्णयाचे रशियात कौतुक झाले परंतु अमेरिकेत झाले नाही. अफगाणीस्तांनातील सर्व सूत्रे मोहम्मद नजीबूल्ला यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली. नजीबूल्ला हे 1986 पासून सत्तेवर होते.गोर्बाचेव यांनी मोहम्मद नजिबुल्लाह यांना अफगानिस्तान चे नवे नेते म्हणून निवड केली तसेच त्यांना मुजाहिद्दीन सोबत चर्चा करून अफगाणिस्तानात सत्ता व शासन निर्माण करुन शांतता प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला. अफगाणीस्तानातून रशियन सैन्य माघारी गेल्यावर काही ठराविक सल्लागार व उच्च अधिकारी अफगाणिस्तानात होते. सामान्यता: रशिया अफगाणिस्तानातून बाहेर निघाल्यावर तिथे शांतता नांदेल व युद्ध संपेल अशी शक्यता होती परंतु असे काही घडले नाही. नजीबूल्ला यांचे सरकार व मुजाहिद्दीन यांच्यात वाद सुरू झाला व हा संघर्ष 1992-1994 पर्यंत चालला. अफगाणिस्तानातील युद्धात लाखो स्थानिक नागरिकांचे प्राण गेले व लाखो-करोडोच्या संख्येने शेजारील राष्ट्रांत विस्थापित झाले. दोन महायुद्धातील विचारसरणीतील फरकामुळे जगात कशा पद्धतीने विध्वंस माजला याचे एक तंतोतंत उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान युद्ध.

अफगाणिस्तान मध्ये ब्रिटन,सोविएत युनियन या तत्कालीन महासत्तांचे 19 व्या शतकपासून लक्ष्य होते.सोविएत युनियन व भारत यांमध्ये बाफर राज्य म्हणून अफगाणिस्तान होते. त्यामुळे भारतातील आपले राज्य टिकून राहावे म्हणून ब्रिटीशांनी रशियासोबत वाटाघाटी व करार केले होते. अफगाणीस्तानातील सीमे वरून दोन्ही राष्ट्रांत करार करण्यात आले होते. भौगोलिक दृष्ट्या अफगाणिस्तान ला विशेष महत्व लाभले आहे. तेथे तेलाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहे,हिर्‍याच्या खाणी,बदाम पिस्ता यांची शेती आहे. व भुराजनीतिक दृष्ट्या अफगाणिस्तान अरबी समुद्रापासून जवळ आहे तसेच इराण हा शेजारील देश आहे जो तेलाने समृद्ध आहे. पर्शियच्या आखातापासून अफगाणिस्तान जवळ असल्यामुळे अनेक महासत्तांचे हितसंबंध येथे गुंतले आहे.

द्वितीय महायुद्धा नंतर कम्युनिजम च्या उगमामुळे जगाची विभागणी दोन विचारांमध्ये झाली. भांडवलशाही अमेरिका व समाजवादी सोविएत युनियन या दोन वेगळ्या विचारांच्या महासत्तांमुळे जग शीतयुद्धाला मुकलं. व या विचारांच्या संघर्षामुळे युद्ध निर्माण झाले. आपापले विचार इतर राष्ट्रांत पसरविण्यासाठी किंवा लादण्यासाठी राष्ट्रांना विविध प्रकारची आमिशे दाखवण्यात आली त्यांचा विकास करण्याचा,त्यांना आर्थिक सहाय्य पुरवून आपआपल्या गटात शामिल करून घेण्याची स्पर्धा निर्माण झाली. ही स्पर्धा 1991 पर्यंत सोविएत संघांचे विभाजन होई पर्यंत जगभरात सुरू होते. परंतु तो पर्यंत जगत लाखोंच्या संख्येने युद्धामुळे मृत्यू झाले. विविध युद्धांमध्ये चळवळींमध्ये सर्व सामान्य जनता व सैनिक चिरडले गेले. स्वत:च्या स्वार्थाच्या लढाई साथी दहशतीचा वापर करण्यात आला व त्यातून व ‘ओसामा बिन लादेन’ सारखे ‘दहशतवादी’ निर्माण झाले. थोडक्यात हेच म्हणावे लागेल की, हे युद्ध स्वत:च्या फायद्यासाठी दुसर्‍याच्या रक्ताने खेळण्यात आलेली होती.

— निहार कोदंडपाणि कुळकर्णी

सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे
संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग
मो.नं-9930254519

तारीख-4 ऑक्टोबर 2018

Cold war: soldiers of god 1975-1988.

Avatar
About निहार कोदंडपाणि कुळकर्णी 1 Article
मी संरक्षण व सामारीक शास्त्र या विषयाचा विद्यार्थी आहे. मला इतिहास, जागतिक राजकारण, समाजकारण या विषयांची आवड आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…