नवीन लेखन...

श्री मीनाक्षी पंचरत्नम् – ४

श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् । वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥ श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते. भयहरां – भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती […]

श्री मीनाक्षी पंचरत्नम् – ३

श्रीविद्यां शिववामभागनिलयां ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं श्रीमत्सभानायकीम् । श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं श्रीमज्जगन्मोहिनीं मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ३॥ श्रीविद्यां- आई जगदंबेच्या तात्त्विक स्वरूपाचे निरूपण करणाऱ्या शास्त्राला श्रीविद्या असे म्हणतात. शिववामभागनिलयां- भगवान शंकरांच्या अर्ध्या डाव्या भागामध्ये निवास करणारी. स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचा विचार करताना शास्त्रात पुरुषाचे उजवे तर स्त्रीचे डावे अंग पवित्र स्वरूपात वर्णन केले आहे. पुरुष सामान्यतः बुद्धिप्रधान असतो […]

सहजीवन

.. आजही टेरेसवर येणारी दोन कबुतरे माझ्या तळहातावरील तांदूळ निर्धास्तपणे खात असतात. पण आधी बोटांच्या पेरांवर चोच मारून धोका नसल्याची खात्री न चुकता करतात. सहनिवासात (Society) राहणार्‍यांशी सलोखा ठेवताना या पाहुण्यांचा सहवासही किती प्रेरणादायी असतो नाही का? सहजीवन म्हणजे आणखी काय असते? […]

विज्या

विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा […]

सटाणा युवक महोत्सव (नशायात्रा – भाग २९)

बिटको कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे कॉलेजच्या समूहगीताचा समूह प्रमुख पदवीधर होऊन नाशिक शहरात एन.बी .टी लॉ कॉलेजला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला आणि मग अनुभवी म्हणून आपोआप समूह प्रमुखाचे पद माझ्याकडे आले . मी अतिआत्मविश्वासाच्या जोरावर यावेळी स्वतच गाणे लिहायचे, त्याला चाल देखील स्वतःच लावायची असे ठरवले होते , […]

मी आणि WhatsApp

मला WhatsApp वापरायला लागून वर्ष झाले तरी …   मी ‘लाइक’ केला नाही, मी ‘ईमोजी’ निवडली नाही, मी एकही साधा मेसेज ‘फॉर्वर्ड’ केला नाही ||1|| मी उपदेश केला नाही, मी सुवचन धाडले नाही, मी आजवर विनोदी चुटका रवाना केला नाही ||2|| मी ‘दैनिक शुभेच्छा’ चालवले नाही, मी भविष्य कथिले नाही, मी ‘नेट’वरची रंगीत फुले पाठविण्यात रंगलो […]

श्री मीनाक्षी पंचरत्नम् -२

मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां – पूर्णेन्दुवक्त्र प्रभां शिञ्जन्नूपुरकिंकिणिमणिधरां पद्मप्रभाभासुराम् । सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ २॥ आई जगदंबेच्या लोकविलक्षण सौंदर्याचे तथा तिच्या दिव्य तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करतांना, आचार्य श्री प्रथम दोन चरणात आईने धारण केलेल्या अलंकारांचे आणि त्यांनी फुललेल्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां- मोत्यांचे हार लटकत असल्यामुळे अधीकच शोभून दिसणाऱ्या मुकुटाने सुशोभित असणारी. […]

तू नसता….

“तू नसता” कावरे बावरे होते मन येते…तुजपाशी ।। कधीकुठे कधीकुठे तुझ्यासवे वावरते । बोलतुझे शब्द मुके काळजात साठवते । तू नसता ना दिसता कोण धरे हृदयाशी ।।ध्रु।। अंधारी अजूनही मन माझे घाबरते । अंगाई नसतांना नीज मला ना येते । प्रेमाचा हात तुझा पाठीवर या नाही । काळाचा घाव कसा जीव बिचारा साही । तू नसता […]

फक्त आजचा दिवस ! ( बेवड्याची डायरी – भाग २८ वा )

स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करण्याच्या आपल्या अट्टाहासामुळेच आपले प्रचंड नुकसान झालेय हे लक्षात घेतले तरच तिसरी पायरी आचरणात आणण्याची मानसिक तयारी होते असे सांगत सरांनी तिसऱ्या पायरीचे यशस्वीपणे आचरण करण्यासाठी ‘ फक्त आजचा दिवस ‘ हे तत्वज्ञान खूप मदत करू शकते हे सांगितले […]

सब घोडे बारा टक्के

उतलो नाही मातलो नाही कर्तव्याला चुकलो नाही । तरीही लढणं अटळ आहे अटळ आहेत धक्के। नियतीच्या खेळात सब घोडे बारा टक्के।।ध्रु।। नियतीची एकच चाल दुनिया सगळी बेहाल जमिनीवर आले सितारे बंदी झाले देव-देव्हारे कोण राहील कोण जाईल कुणा न ठाऊक पक्के । नियतीच्या खेळात सब घोडे बारा टक्के ।।१।। नियतीला हवेत जसे पडतील फासे तसे तसे […]

1 4 5 6 7 8 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..