नवीन लेखन...

त्रिमोतींची ओटी

एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर. […]

अनुभवात ईश्वरी दर्शन !

प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला  वा दिसला,  ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही.  परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे. आणि तो केवळ अनुभव जरी मिळाला तरी त्यात संपूर्ण समाधान व सार्थक असेल. ही भावना हेच ईश्वरी अनुभूतीचे दर्शन ठरविणारे असेल. […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ४

आमीलिताक्षमधिगम्य मुदामुकुन्द-मानन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम्। आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयनाङ्गनाया:।।४।। आनंदकंद म्हणजे आनंदाचा जणू भरगच्च संग्रह. मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे, भगवान श्रीहरी. त्यांना मुदा म्हणजे आपल्याच आनंदात, आमीलिताक्षमधिगम्य डोळे मिटून शांत पहुडलेले पाहून, अनिमेषमनङ्गतन्त्रम्- अनिमिष अर्थात पापणी देखील न ललवता. अनंग म्हणजे भगवान मदन. त्यांचे तंत्र म्हणजे प्रेम. सगळ्याचा एकत्रित विचार करता आनंदकंद भगवान श्रीहरी आपल्याच आनंदात नेत्र मिटून बसलेले […]

किती रंग या जीवनी पहावे

किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे, दुःख जिवापाड सोसावे,–!! ठरवलेले नेहमी चुकते, विपरीत काही घडते, अगणित अपेक्षांचे ओझे, इवल्या हृदयाने पेलावे,-? जे विधायक, ते दूर राहते, नकारात्मक ते सारे घडते, आपल्याच जिवाचा बळी रोज नव्याने पहावे लागते,-!! मदतीचा हात करता पुढे, आरोपांना पेंव फुटते , आंधळ्या निर्जन आयुष्याला , रानावनीची […]

पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल

समाज कितीही समाज पुरुष प्रधान असेल पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल. संसार स्त्री प्रधान आहे, पुरुष प्रधान वगैरे अफवा आणि अंधविश्वास आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका..!! […]

पडछाया !

चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला पडू लागले पावूल माझे मंद मंद आता श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी […]

प्रेमवेडा

एखाद्यावर भरभरून प्रेम करणाऱ्याला प्रेमाच्या बदल्यात कधी कधी प्रेमच मिळतं नाही. मग त्याची मानसिकता प्रेम करणाऱ्यांच्या आणि प्रेमाच्याही अगदी विरोधी बनते. आणि त्याचा प्रेमावरून विश्वास उडतो. मग तो एकेवेळी प्रेमात वेडा झालेला प्रेमीक प्रेमाचा विरोध करतो आहे असं आपल्याला भासतं. […]

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !

मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते…   ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा …. […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ३

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि । ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध- मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥ आई महालक्ष्मीच्या त्या नेत्र कटाक्षाचा अद्भुत महिमा सांगताना आचार्यश्री म्हणतात, विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम्- विश्व अर्थात जग. अमर अर्थात देवता. इंद्र अर्थात सर्वश्रेष्ठ, राजा. त्याचे पद म्हणजे अधिकार. अर्थात या जगाचाच नव्हे तर देवांचाही राजा असलेल्या इंद्राच्या पदाचा अधिकार. आई जगदंबेच्या नेत्र कटाक्षाने असे देवराज इंद्राचे पद देखील […]

कृष्ण….

नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव.. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण, पण एकदा समजला जी जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा. […]

1 6 7 8 9 10 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..