नवीन लेखन...

सावित्रीच्या आजच्या लेकी..

स्वत:ला मोठ्या अभिमानाने ‘सावित्रिच्या लेकी’ म्हणवून घेणाऱ्या आजच्या आधुनिक स्त्रिया शिक्षणाने फक्त साक्षर झाल्या, सुशिक्षित व्हायचं मात्र विसरल्या, असं म्हटलं तर चुकू नये. मला वाटतं सावित्रीच्या कार्याचा अर्थ स्त्रियांना केवळ साक्षर करणं एवढाच नव्हता, तर त्यांना त्यांचा त्या त्या काळातील अधिकार मिळवून द्यायचा, असाही होता. हे जर आजच्या स्त्रियांना समजत नसेल, तर मग आजच्या स्त्रियांना स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असं मी समजतो. […]

चाबहार बंदर एक सक्षम पर्याय 

भारताला अफगाणिस्तानपर्यंत जाण्यासाठी पाकिस्तान नेहमीच आडकाठी आणत असे. यावर तोडगा काढण्यासाठी भारताने इराणमार्गे अफगाणिस्तानात मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. भारताने यासाठी इराणच्या चाबहार बंदरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आणि इराण ते अफगाणिस्तानपर्यंत रस्तेमार्गाचीही निर्मिती केली. परिणामी इराणच्या चाबहार बंदरातून भारताला थेट अफगाणिस्तानात जाण्याचा व अफगाणिस्तानला रस्तेमार्गाने थेट समुद्रापर्यंत येण्याचा पर्याय खुला झाला व पाकिस्तानला त्याची जागाही दाखवून देता आली. […]

फणस (लघु कथा)

डोंगरे डॉक्टरांचे म्हणणे लोकांना किती पटले कोणाक ठाऊक.कारण गाव तसे अंधश्रद्धाळू. भुता खेतांचे अस्तित्व मानणारी बहुतेक माणसे. महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली,  त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी त्यानंतर जयरामचे भूत नंतर अनेकांना त्या रस्त्यावर वडाच्या झाडा जवळ सगळ्यांना दिसू लागले. […]

केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक

नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवणारी केळी आपण नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. म्हणूनच आपल्याकडे पूर्वापार उपवासाला केळी खाण्याची पद्धत आहे. प्रसादाला पण केळ्याचा मान असतो. कुठल्याही मंगलकार्यात आपण केळ्याचे खांब दरवाजाला बांधायची पद्धत आहे. असे हे बहुगुणी केळं आपल्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट करणं, आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरते. […]

संगीतोपचार

२० व्या शतकातील प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ व संगीताचे गाढे अभ्यासक, जगदीशचंद्र बोस यांनी सजीवांचा संगीताला मिळणारा प्रतिसाद सप्रमाण सिद्ध केला व त्यापूर्वीच्या वैदिक काळातील अभिजात संगीताच्या मन व शरीर यांच्यावरील संगीतोपचाराचे महत्त्वच अधोरेखित केले. यातूनच संगीतोपचार ही, मूळ औषध व उपचार पद्धतीला पूरक अशी उपचार पद्धती म्हणून विकसित झाली आहे. […]

तू नसता

तू नसता मी सैरभैर तू असता स्थिर होतो ! — श्रीकांत पेटकर  कौशल.

अनेक विश्व आणि आयाम

या जगामध्ये अनेक universes आहेत. Multi Universe संबंधित Dr Stuart Clark यांनी ‘Unknown Universe’ या पुस्तका मध्ये संगीत लेले आहे. वेगवेगळ्या Universe मध्ये वेगवेगळे जीवन असू शकते अथवा सारखेच जीवन सुधा म्हणजेच समांतर ब्रम्हांड  असू शकते (Parallel Universe ) ही स्वतंत्र concept पुढे दिलेली आहे. […]

माझा चड्डीयार : भाग ५

तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू. […]

बाळकृष्ण

रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ// काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं    //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी   //२// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं […]

डॉ. विल्‍फ्रेड बिगलो

दुसर्‍या महायुद्धाच्‍या काळात डॉ. ड्वाईट हार्केन यांनी हृदयावर शस्‍त्रक्रिया करण्‍याची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीने केलेल्‍या शस्‍त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्‍यात येत असे. मग त्‍या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्‍हॉल्‍व्‍ह) थोडीशी मोठी करण्‍यात येई. हळूहळू हृदयशल्‍यचिकित्‍सकांना यात प्राविण्‍य मिळाले व अशा शस्‍त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्‍या. ही झाली ‘क्‍लोज्‍ड हार्ट’ अथवा आंधळी […]

1 3 4 5 6 7 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..