नवीन लेखन...

संगीतोपचार

प्रत्येक सजीवात संगीत हे स्पंदनांच्या रुपात असते. श्वासाला निश्चित अशी लय असते. ध्वनी लहरींची विशिष्ट कंपने (स्वर किंवा श्रुती ) आपल्या शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतात. विशिष्ट स्वर आणि लय यांच्या मिलाफातून निर्माण होणारे भारतीय अभिजात संगीतामधील वेगवेगळे राग व त्यांचे भाव किंवा रस हे मानवी मनाच्या व शरीराच्या स्थितींवर निश्चितपणे परिणाम घडवू शकतात असे निर्विवाद संशोधनाद्वारे आता  सिद्ध झाले आहे.

२० व्या शतकातील प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ व संगीताचे गाढे अभ्यासक, जगदीशचंद्र बोस यांनी सजीवांचा संगीताला मिळणारा प्रतिसाद सप्रमाण सिद्ध केला व त्यापूर्वीच्या वैदिक काळातील अभिजात संगीताच्या मन व शरीर यांच्यावरील संगीतोपचाराचे महत्त्वच अधोरेखित केले. यातूनच संगीतोपचार ही, मूळ औषध व उपचार पद्धतीला पूरक अशी उपचार पद्धती म्हणून विकसित झाली आहे.

आजकालच्या धकाधकीच्या व संघर्षमय जीवनशैलीमुळे हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब तसेच वाढत्या प्रदूषणामुळे होणारे इतर रोग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. या शारीरिक व्याधींबरोबरच जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव व बरेचदा अपयशातून येणारे नैराश्य या सर्व मानसिक अनारोग्यावर देखील संगीतोपचार फार यशस्वीरित्या काम करतात. कॅन्सर, कंपवात, अशा दुर्धर रोगांवर तसेच स्व-मग्नता (Autism) सारख्या रोगावर देखील हे उपचार अत्यंत प्रभावीपणे काम करतात.

या उपचाराचे अगदी तानसेनाच्या काळापासून ते दुसर्‍या महायुद्धाच्या काळात पं. ओंकारनाथ ठाकूर यांनी इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी याचा निद्रानाशाचा उपचार राग दरबारी कानडा गाऊन केला असे पूर्वापार दाखले उपलब्ध आहेत. मालकंस, चंद्रकंस, यमन, बागेश्री, दुर्गा, हिंडोल असे काही राग हे उदाहरणादाखल सांगता येतील.  भारतीय अभिजात संगीतकारांनी समयचक्र, ऋतू, निसर्गातील पंचतत्वे यांचा रागसंगीत व रागांचे भाव आणि रस यांचा अचूक मेळ घालून सुखी, शांत, समाधानी व वेदनारहित अशा जीवन शैलीचा अमूल्य ठेवा जोपासला आहे व तो आजच्या काळात संगीतोपचार या रुपात रोग निवारणात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

— डॉ. मानसी गोरे 

Avatar
About डॉ. मानसी गोरे 4 Articles
पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. 22 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून पर्यावरणीय अर्थशास्त्र हा संशोधनाचा विषय होता. त्यातही कार्बन ट्रेडिंग यावर विशेष भर होता. सकाळ, लोकसत्ता इ. मधेही लेख लिहिते. संगीत, स्त्रीवादी विषय, सामाजिक व वैचारिक लेखन, पुस्तक परीक्षणे यात विशेष रुची आहे. अर्थशास्त्राशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत व ते प्रकाशित झाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..