नवीन लेखन...

कोण दिसे हा पाण्यामध्ये

कोण दिसे हा पाण्यामध्ये,असावा माझाच भाईबंद, चोच बांकदार, रूप देखणे, मनाने दिसतोय स्वच्छंद, गुबगुबीत पांढरी पाठ, कोरीव वर काळ्या रेघा, नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका , सुळकन जो वर येईल, मटकावेन आधी त्याला,–!!! कळणारही नाही याला, कधी गिळले मी माशाला,-? डोळे तीक्ष्णमाझे, नजरही अगदी करडी, पाण्यातील या पक्ष्याची, मात्र भासे मज बेगडी,–!!!! हिमगौरी कर्वे.

जादूचा सिद्धांत

Quantum Theory मध्ये Particles चे निर्जीव असून सुद्धा सजीवासारखे `Behaviour असते. Quantum Theory मध्ये Quantum mechanism आणि Quantum Entanglement अशा दोन concept आहेत. […]

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग २

आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्‍यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्‍यायानें सगळीकडे आम्हांस ते त्‍यांच्‍या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्‍त्रास्‍त्रनिर्मिती करणार्‍या परदेशी कंपन्‍या चालाव्‍यात म्‍हणून अविकसित देशांना शस्‍त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक  ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्‍या हानिकारक उत्‍पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्‍यांना पुरवलें जातें. […]

आपली लोकशाही कुठे चाललीय?

आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची संसदीय लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. किंबहूना विरोधी पक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्ता हा विषयच असा आहे की, ती मिळाल्यावर स्खलन होण्याची शक्यता जास्त असते, मग सत्तेवर कुणीही असो. […]

मराठी भाषा दिन, एक मंथन

ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो. […]

सर सलामत तो पगडी पचास

हेल्मेट वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे धोक्याचे प्रमाण कमी होते. पण त्यासाठी सरकारानेच ‘प्रबोधन’ करायला पाहिजे असे म्हणणे हि मोठी शोकांतिका आहे. पुणेसारख्या शहरांमध्ये धर्माच्या नावाखाली हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविण्यात आले. त्यांना एवढंच म्हणावे लागेल, “सर सलामत तो पगडी पचास”. […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

खेळण्या नसे पर्याय

दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस.. १ खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा…२ खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते…३ विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या […]

थियरी ऑफ रिलेटिव्हिटी – time travel शक्य

हा सिद्धांत आइन्सटाइनने मांडलेला असून या मधे speed आणि time यांचे relation सांगित ले आहे. दोन्ही  एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात . अर्थात ‘speed’ वाढला तर ‘Time’ Slow होतो . TIME हा Relative आहे तो सर्वांसाठी सारखाच नसून, वेगवेगळा आहे. या मधे आणखी दोन concept आहेत- Motion आणि  time Dilation . […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ५

तेव्‍हां आपण स्‍वतःवर, आपल्‍या संस्‍कृतीवर आणि पर्यायानें आपल्‍या मातृभाषेवर विश्वास ठेवूं या. आपण अभिमानानं म्‍हणूं या आणि कृतीनेंही दाखवून देऊं या, की –
हिचे पुत्र आम्‍ही, हिचे पांग फेडूं | वसे आमुच्‍या मात्र हृद्मंदिरी || जगन्‍मान्‍यता हीस अर्पू प्रतापे | हिला बसवू वैभवाच्‍या शिरीं ।। […]

1 2 3 4 5 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..