खेळण्या नसे पर्याय

दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस
प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस.. १

खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा
खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा…२

खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते
तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते…३

विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा
बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या अमूल्य वेळा….४

— डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1390 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…