नवीन लेखन...

सोनेरी तसवीर !

तोच तो भाग्यवान    कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तस्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या  पाऊलखुणा दाखवीत होता. […]

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

‘येणें वरें ‘नितीनो’ । सुखिया झाला ।।’

आपण बऱ्याचदा ठरवतो एक आणि होतं वेगळंच. आता बघा ना, अगदी काल-परवाच, म्हणजे ३१ डिसेंबरला मी ‘जरा विसावतो या वळणावर’ हा लेख लिहून नविन वर्षात मी फार लेखन करणार नाही असं मनोगत व्यक्त केलं होतं. माझ्या लिखाणात आणखी सकसता, सजगता आणि चौफेर दृष्टी येण्यासाठी, मला आणखी भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असल्याचं मला गेले काही महिने जाणवतंय […]

किराणा घराण्याचे गायक पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर

किराणा घराण्याचे गायक पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर जन्म २ जानेवारी १९३७ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील ” दिवेआगर येथे झाला. अच्युत अभ्यंकर यांनी आकाशवाणी येथे अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच पं. अभ्यंकर यांनी देश–विदेशांत असंख्य मैफिली सादर केल्या. आपले गुरु पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन पं. […]

फर्ग्युसन कॉलेज

शिक्षणाचे माहेरघर ही पुण्याची ओळख सार्थ करणारे व पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजचा वाढदिवस. २ जानेवारी १८८५ रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज ची सुरवात झाली. शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८२ ला आलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना वामन शिवराम आपटे यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन करून नव्या खाजगी आर्टस् […]

मुक्ता ताटी

नको चिंता नको क्रोध मोह माया नको लोभ सारे काही दुर सारा ताटी काढा ज्ञानेश्वरा अपराध हा जनाचा साही आता मुखी ऋचा विश्व कोपे पेटे वन्ही बंधू राया व्हावे पाणी उणे-दुणे खुपे बोल संत बोधा आहे मोल पुर्ण ब्रम्ह आहे घर नको कुढू जगा तार ब्रम्हा सम विश्व सारे जनलोक थोर की रे आवरावे क्रोधाग्नीस जाणारच […]

मला भावलेला युरोप – भाग ५

युरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही. सिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, […]

जुनं घर…..

अबोलतेच्या आठवणींनी, भरलं होतं जुनं घर….. गाई गुऱ्हांच्या आस्तित्वात, फुललं होतं द्वार….. चतुर बंधूंच्या नात्याला, कष्टाची होती धार….. माणुसकीच्या- जुन्या काळात, इथं सुख होती दूर…… काळ्या मातीतल्या धान्यांन, भरलं होतं जुनं घर…… कष्ट होतं भरपूर, पण- “गरीबी होती फार”….. दोन बंधूच्या वाटणीनं, बदललं पारं द्वार आजोबा व वडिलांच्या माझ्या-कष्टाची, आठवण येतं आहे फार….. नाही राहिलं माझं, […]

नको वाटतं – असं जगणं

नको वाटतं जगात, असं साधेपणाने जगणं….. फक्त – गरिग म्हणून, जुन्या कपड्यात फिरणं….. नको वाटतं समाजात, एकत्र मिळून राहणं….. नोकरी नाही म्हणून, सतत तचं बोलुन घेणं….. आयुष्य भर दुसऱ्याच्याच, इशाऱ्यावर – – नाचणं….. नको वाटतं ‘नको वाटतं’, असं  फटकळ जगणं….. — गजानन साताप्पा मोहिते 

प्रख्यात अभिनेत्री शकिला

प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी झाला. सीआयडी, आरपार, रेशमी रुमाल, श्रीमान सत्यवादी अशा एकाहून एक सरस कृष्णधवल हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचे “बाबूजी धीरे चलना’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे व त्यांच्या भूमिकाही चित्रपट रसिकांच्या मर्मबंधातली ठेव होती. गुरुदत्त यांच्या आरपार व सीआयडी या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. शक्ती […]

1 17 18 19 20 21 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..