नवीन लेखन...

फर्ग्युसन कॉलेज

शिक्षणाचे माहेरघर ही पुण्याची ओळख सार्थ करणारे व पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजचा वाढदिवस.
२ जानेवारी १८८५ रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज ची सुरवात झाली.

शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८२ ला आलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना वामन शिवराम आपटे यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन करून नव्या खाजगी आर्टस् कॉलेजची निकड विशद केली होती. न्यू इंग्लिश स्कूलचे, त्यासाठी संस्थापकांनी केलेल्या धडपडीचे कौतुक हंटर आयोगाने केले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘जेम्स फर्ग्युसन’ या तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने या प्रस्तावाला अनुमोदन दिले व बक्षीसासाठी रु. एक हजार दोनशे पन्नासची मदत देण्यापासून शक्य ते इतर सहकार्यही केले. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. २४ ऑक्टोबर १८८४ रोजी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना झाली.

संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न,महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले व २ जानेवारी १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले.

फर्ग्युसन कॉलेज त्या वेळी पुणे शहरात शनिवार पेठेतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यात होते. नंतर आत्ताच्या जागेत आले.

फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्चिमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. टिळकांनी येथे गणित व संस्कृतचे अध्यापन केले. वामन शिवराज आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते.

पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.

फर्ग्युसनचे माजी प्राचार्य डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. त्यावर फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात ‘फर्ग्युसनची वाटचाल’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. . विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, पी.व्ही नरसिंह राव असे अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. फर्ग्युसन कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.

महात्मा गांधी यांनी १९१९ मध्ये ज्या सभागृहातून देशाला स्वदेशीची हाक दिली, त्या ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज मधील एन.एम. वाडिया अॅ म्फी थिएटरला इतिहास आहे.

लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आदींनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटरला २०१२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. १९१२ मध्ये सर जिजीभॉय यांनी दिलेल्या पंचवीस हजार व प्रिन्स आगाखान यांच्या पाच हजारांच्या देणगीतून थिएटरची उभारणी झाली होती. पुण्यातील धनिकांनीही आर्थिक मदत दिली होती. या निमित्ताने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार ठरलेल्या या वास्तूला सरकारने ‘हेरिटेज ए’चा दर्जा दिला आहे. रवींद्रनाथ टागोर, पं. नेहरू, सी.व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस, मदनमोहन मालवीय यांनी येथे विचार मांडले होते.

फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटर मध्ये १९२७ मध्ये देशातली पहिली भारतीय महिला परिषद झाली. सरोजिनी नायडू, यशवंतराव चव्हाणांची भाषणे येथे झाली. केरळचे तेव्हाचे मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांचे ‘स्वातंत्र्य’वर व्याख्यान येथे झाले. कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, भालबा केळकर, भास्कर चंदावरकर, रोहिणी भाटे, वसंतराव देशपांडे यांचे कार्यक्रम येथे झाले. पुण्यातील प्रसिध्द पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची सुरुवात फर्ग्युसन कॉलेजच्या अॅयम्फी थिएटर येथुनच झाली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..