नवीन लेखन...

स्वप्न दोष

भंग पावले पाहीजे    स्वप्न माझे रातचे तोडणे स्वप्न श्रृंखला   नसे मानवी हातचे  ।। शिथिल गात्र बनती   जाता निद्रेच्या आधीन उघडले जाते मग       विचारांचे दालन  ।। किती काळ भरारी घेई   निश्चीत नसे कांही विचार चक्र थांबता     स्वप्न दोष तो जाई   ।। रात किड्यानो जागवा    स्वप्नावस्थे मधूनी कुकुट कोकीळा येई      मदतीसाठी धावूनी   ।। वाऱ्याची थंड झुळुक    पुलकीत देहा […]

दुर्गुण

आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात. […]

मनाची श्रीमंती

माझ्यामते मुबलक पैसा कमविला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे नाही. खरं तर फक्त पैसा कमविला की तो “पैसेवाला” नक्कीच होतो, मात्र “श्रीमंत” होतोच असं नाही. कारण प्रत्येक “श्रीमंत” हा पैसेवाला असतोच परंतु प्रत्येक “पैसेवाला” हा श्रीमंत असतोच असे नाही. […]

खोटंच का विकलं जातं?

खोटंच का विकलं जातं, हातोहात? अन खऱ्यालाच का गुंडाळलं जातं बासनात? किती द्याव्यात परीक्षा खऱ्याने खऱ्यापणाच्या? आणि किती उडवाव्यात चिंध्या असत्याने सत्यपणाच्या? खोटंच का विराजमान होतंय आत्मसन्मानाची गळचेपी करून फाटक्या तुटक्या सिंहासनावर? खऱ्यालाच का सोसावे लागतात हाल दारोदार? बाजार खोट्याचाच बहरलेला दिसतोय विक्षिप्तपणे सर्वत्र अन खऱ्यालाच घरघर लागलेली दिसतेय गळलित गलीतगात्र. खोट्याची सत्ता लौकिक तर खऱ्याची […]

यडा.. पणा

सातारा स्टँडवर सरवांची वर्दळ सुरू असल्यानं स्टँड बहरल व्हती,कॉलेज ची गावठी पोरं उगाचच उनाडक्या करीत इकडून तिकडं फिरत व्हतं..त्यासनी असं वाटत व्हतं जणू सगळ्या जगाची अक्कल त्यासनी आलीय…एक एका गावची एस टी येत व्हती तसं पोरा अन पोरींचा घोळका लगबगीनं गाडीकड धाव घेत एकमेकांसनी म्होर ढकलत जात व्हता. […]

गाण्याच्या कहाण्या – ‘पिया ऐसो जीयामे समाय गयो’

हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता. […]

वेदना

‘वेदना ” वेदनेशी असलेल नाथ कधीच तोडायच नसत,ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आणि पर्यायाने दुसर्याच्या दुःखाशी वेदनेन बघायला शिकवते |. वेदना जगण्याचा भुत ,भविष्य ,विसरून वर्तमानासी एकरूप व्हायला शिकवते .स्वताच्या वेदना ,दुःख याच्यापलिकड़े असलेल्या तीव्र आणि भयानक सामाजिक वेद्नेशी नात जोडायला शिकवते ,जगन कधीच पूर्ण होत नसत ,जगण्याच्या मैदानात वेदनेच नाण अखंडपने खनानत असत क्षणभंगुर सुखाच्या शक्येतेचा […]

दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया. अलीकडच्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन वस्तुंची खरेदी करणे, वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरायला जाणे, मौज मजा करणे, मित्रांसोबत पार्टी करणे, भरमसाठ महागाचे फटाके फोडणे इतकाच मर्यादित अर्थ आजच्या तरुणाईला माहीत आहे. हे तरुणाईच्या वेगळ्या प्रकारच्या उत्साहावरुन आणि वर्तनावरुन जाणवते. […]

सासरी जाणाऱ्या मुलीस

थांबव गंगा यमुना मुली   आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला    मग ह्या कोठूनी आल्या ?   // हांसत गेले जीवन तुझे     फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें   आशिर्वाद देतो शिरीं   // समजतील दुःखी तुजला    नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने      फूलवित रहा भाव   // जाणून घे स्वभाव सर्वांचे     रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे     तुझ्याच नव्या घरी   […]

लाघवी मारू बिहाग

माडीवर सारंगीचे सूर जुळत, तबलजी तबल्यावर हात साफ करायच्या प्रयत्नात आहे, खोलीतील दिवे हळूहळू मंद होत आहेत, आलेले रसिक मनगटावरील गजऱ्याचा सुगंध घेत आणि तोंडातील तांबुल सेवनाचा आनंद घेत आहेत. बाजूलाच पडलेला हुक्का आपल्याजवळ ओढून, एखादा रसिक, त्यातील सुगंधी तंबाकूचा स्वाद घेण्यात मश्गुल झाला आहे. तसे बघितले तर संध्याकाळ कधीचीच उलटलेली आहे परंतु नेहमीच्या मैफिलीतील मानिंद […]

1 16 17 18 19 20 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..