नवीन लेखन...

अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी

१९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती. मात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली. १९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला. […]

संरक्षण अर्थसंकल्प २०१८ : गरज मोठी, तरतूद छोटी!

या वर्षीचे संरक्षण बजेट हे ७.८१ टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजे मागच्या वर्षी असलेले २९५५११ कोटींहून २७४११४ कोटी एवढे वाढलेले आहे. मात्र हे अतिशय कमी आहे. यामुळे आधुनिकीकरणाला चालना मिळेल ही आशा रसातळाला मिळालेली आहे. १९६२ पासून आपण जर संरक्षण बजेटचा अभ्यास केला तर ही वाढ सर्वांत कमी वाढ आहे. […]

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

‘प्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हढी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते… ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे. […]

आजचा आरोग्य विचार – भाग दहा

१०. झोपण्यापूर्वी पुनः एकदा दंतधावन करावे, असे फक्त आजचेच विज्ञान सांगते असे नाही तर भारतीय संस्कृती सुद्धा सांगते. रात्री झोपताना कोणत्याही घरगुती अथवा कंपनीमेड दंतमंजनाने दात जरूर घासावेत. खळखळून चुळा भराव्यात आणि… परत काहीही तोंडात न टाकता झोपावे. ?? दंतमंजन कोणतेही असो, ते चवीला गोड अजिबात नको, तोंडाला फेस आणणारे नको, आणि रंगाला पांढरे नको. थोडे […]

कंकोळ

ह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ते गुळगुळीत व तांबूस रंगाचे व ६-८ मिमी व्यासाचे असते.त्याला वर एक छोटा देठ असतो व ते सुगंधी असून तोंडात धरले असता गार वाटते. ह्याचे उपयुक्त अंग आहे फळ व तेल.कंकोळ चवीला तिखट,कडू असते व हे […]

लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

पन्नास वर्षे एकत्र नांदलो आयुष्यातील मार्गप्रवाही कसा काळ निघुनी गेला केव्हांच समजले नाही  ।।१।। काळ विसरलो,  वेळ न विसरे क्षणाक्षणाच्या प्रसंगाची सुखदुःखानी भरलेल्या अनेक अशा घटनांची ।।२।। सैल झाला जीवन गुंता कधीतो गेला आवळूनी उकलणार नाही कधीच तो जाणीव आली मनी  ।।३।। हेच असेल विधी लिखित जिंकणे वा हारणे आयुष्याचा मार्ग खडतर समजुनी त्याला घेणे  ।।४।। […]

खोटे नाणे

कसे आले कुणास ठाऊक    खोटे नाणे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी    खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी    कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी     निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी     तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया    अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी     त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी     यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श […]

कर्ममुक्ती

न राही तुमचे ते कर्म, ज्यात प्रभू इच्छा अंतीम….१, प्रत्येक घटनेचे अंग, त्यात मुख्य ईश्वरी भाग….२ तुमच्या मार्फतच होई त्याचा इशारा कोण पाही….३, सर्व समजे मीच केले अहंकाराने मन भरले….४, षडरिपू असे साधन खेळविता यावे म्हणून…५, राग,लोभ, मोह मायादी ठेवती वाटते आनंदी….६, परि याच्याच शक्तीने प्रभू खेळ चाले युक्तीने….७, षडरिपू सारे टाळून मुक्ती मिळेल खेळातून…..८ डॉ. […]

कठोर शिक्षा – भाग १

“अरे…..! तू नानू नां रे ?” कोणीतरी पाठीमागून हांक मारली आणि नानूच्या  पाठीवर थाप मारली. सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू)  प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात  (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता.  त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते […]

आजचा आरोग्य विचार – भाग नऊ

भारतातील सर्वसामान्य लोक जसे जगताहेत, त्यांची जीवनशैली कशी होती, याचे निरोगी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राजे महाराजे, त्यांचे मंत्री, राजकारणी किंवा आजचे मंत्री यांच्या छानछौकीबद्दल आपण बोलतच नाही. ही सर्व मंडळी गाद्यागिरद्या वापरणारीच असतील कदाचित पण अति नको हे मात्र खरं. ९. झोपण्यापूर्वी हात पाय धुवुन झोपावे. पण हात पाय ओले ठेवून अजिबात […]

1 6 7 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..