नवीन लेखन...

अभिनेता सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा विनोदी अभिनेता. त्याचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबई येथे झाला. सिद्धार्थ जाधवने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून प्रकाशझोतात आला. ‘हुप्प हुय्या’ मधील ‘हणम्या’, ‘दे धक्का’ मधील ‘धनाजी’, ‘लालबाग परळ’ मधला ‘स्पीडब्रेकर’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मधला ‘उस्मान पारकर’ आणि अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले आहे. मराठी चित्रपटांबरोबरच सिद्धार्थने काही हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलंय. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातही काम केले आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा तिनही माध्यमात सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..