नवीन लेखन...

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी, फसवी सर्वाला काय डब्यामध्ये, कळेना कुणाला…३ झाकण उघडा, दुःख दिसे आंत लपून बसले, प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच, दुःख हाती येई भासलेले सुख, नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव, आंत बाहेरी आगळा । भिन्न भिन्न ते दर्शन घडते, यास्तव कांहीं वेळा ।।१।। एकच घटना परी विपरीत वागणे । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो, याच कारणे ।।२।। देहा लागते ऐहिक सुख, वस्तूमध्ये जे दडले । अंतर्मन परि सांगत असते, सोडून दे ते सगळे ।।३३।। शोषण क्रियेत आनंद असतो, ही देहाची धारणा । त्यागमधला आनंद […]

मुके भाव

आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं….१ भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची…२ भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले…..३ आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला….४ भाषेमधली शक्ती […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ७

पूर्वी गायीचं दूध हातानं काढावं लागायचं. आता बहुतेक ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यांनी मिल्किंग पार्लर्समधे गायीचं दूध काढलं जातं. त्यामुळे पूर्वी छोट्या कौटुंबिक फार्म्सवर आई, वडील, मुलं मिळून ३०-४० गायींचं दूध काढता काढता थकून जायची. आता मोठमोठ्या डेअरी फार्म्सवर मिल्किंग पार्लरमधे हजारो गायींचं दूध दिवस रात्र काढलं जातं. बहुतेक डेअरी फार्म्सवर लॅटीन अमेरिकन मजूर हे दूध काढण्याचं काम […]

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।। आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे ।।२।। लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।। विकृत ती मनाची वृत्ती स्वच्छंदीपणात ती असते […]

विश्व पसारा

विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच घटक ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत ।। […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ६

अमेरिकन डेअरी व्यवसायात झालेले दोन प्रमुख बदल म्हणजे: – गायींची वाढलेली दुग्ध उत्पादन क्षमता; ज्यायोगे कमी गायींपासून अधिक दूध उत्पादन शक्य झालं आहे. – डेअरी फार्मस्‌चा वाढत चाललेला आकार आणि त्याचबरोबर त्यांची घटत जाणारी संख्या. २००८ साली अमेरिकन शेती व्यवसायामधे डेअरी उद्योगाचा हिस्सा होता १२%. अमेरिकेतल्या एकूण दुधाळ गायींची संख्या होती ९ दशलक्ष आणि प्रत्येक गायीचे […]

आऊ यांग्लिनची अग्नी परीक्षा !

दैनिक प्रत्यक्षच्या विश्वगंगेच्या तीरावरील सदरात ‘आऊ यांग्लिन’च्या जीवन संघर्षाचा सिद्धार्थ नाईक यांनी उलगडून दाखविलेला क्लेशदायक पण जिद्दी जीवनपट वाचण्यात आला. असे खडतर जीवन अश्या कोळ्या वयात कोणावरही येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. एवढया छोटया मुलामध्ये एवढी समज, एवढे धारिष्ट फक्त तोच एक देऊ शकतो. कारण वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या वडिलांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून झालेला अपघात, त्यात […]

आभामंडळाचे विज्ञान व विठ्ठल मंदिर

मुंबईच्या दोन मित्रांनी पंढरपूरला जाऊन एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला व पंढरपूरला पोहचले. मंदीराजवळ आल्यावर दिसले की तिथे प्रचंड गर्दी, रांगाच्या-रांगा लागल्या होत्या. पहिला मित्र लगेच गर्दीतून कसे आत घूसता येईल त्यावर विचार करायला लागला व त्याप्रमाणे त्याने वाट काढत , स्वत:चे पैशांचे पाकीट सांभाळत, गर्दीतल्या लोकांची बोलणी खात, लोकांच्या हाताचे कोपरे व पायांचे […]

1 2 3 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..