नवीन लेखन...

एक रुबाबदार अभिनेता – विनोद खन्ना

हिन्दी चित्रपट सृष्टीत देखणे अभिनेते बरेच आहेत पण रुबाबदार अभिनेते फार कमी आहेत. त्यापैकी विनोद खन्ना एक.

विनोद खन्नाचा जन्म अखंड भारतातील पेशावर येथे ६ ऑक्टोबर १९४६ रोजी  झाला. त्याचे वडील कृशनचंद खन्ना यांचा टेक्स्टाइलचा व्यापार होता. फाळणी नंतर खन्ना कुटुंब मुंबईला आले.  विनोद खन्नाचे शालेय शिक्षण पहिल्यांदा सेंट मेरी स्कूल येथे तर पुढील शिक्षण दिल्ली येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथे झाले. पुढे खन्ना कुटुंब पुन्हा मुंबईला आले.तिथून त्याला देवळाली येथे बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवण्यात आले.सुरवातीला तो खूप लाजाळू होता. पण मित्रांच्या आग्रहाखातर तो नाटकात काम करू लागला. त्याचवेळेस त्याने देव आनंदाचा सोलवा साल आणि दिलीपकुमारचा मोघले आजम  बघितला.नंतर तो मुंबईला येऊन सिडन्याम कॉलेजात दाखल झाला. त्याला क्रिकेटची सुद्धा आवड होती. तो प्रसिद्ध क्रिकेटर बुधी  कुंदरन व  सोलकर यांच्या बरोबर खेळला होता. तो नेहमी चौथ्या क्रमांकावर खेळत असे. त्याला विश्वनाथ सारखे व्हावे असे वाटे. पण लवकरच त्याच्या लक्षात आले,की आपण उत्तम क्रिकेटर होऊ शकत नाही.

त्याच्या देखणेपणा मुळे त्याच्या भोवती मुलींचा घोळका असे. त्या सांगत तू चित्रपटात काम कर. त्याच सुमारास सुनील दत्त चित्रपट करत होता. त्याने विनोद खन्नाला मन का मित चित्रपटासाठी  विचारले तेव्हा त्याने “हो” म्हटले. पण घरी कळल्यावर त्याच्यात व वडीलात प्रचंड भांडण झाले. त्यांनी विनोद खन्नावर बंदूक उगारली.शेवटी आई मध्ये पडली व ठरले की दोन वर्ष काम करायच व काही नाही जमले तर धंद्यात लक्ष घालायचे. मन का मित खास चालला नाही पण विनोद खन्नाला चांगली प्रसिद्धी मिळाली.त्यानंतर त्याने खूप खलनायकचे रोल केले.

त्याच सुमारास गुलजार आपल्या पहिल्या मेरे अपने  चित्रपटासाठी एका वैफल्यग्रस्त तरुणांच्या भूमिकेसाठी शोध घेत होते. त्याच वेळी त्यांची नजर विनोद खन्नावर गेली. त्यांनी त्याला ती भूमिका दिली. त्याच्या या कामाला मिनाकुमारीने सुद्धा दाद  दिली. गुलजार बरोबर त्याने अचानक केला. पुढे मीरा केला. तेव्हा विनोद खन्नाला मिराचा रोल इतका आवडला की तो म्हणाला मला मिराचा रोल करता आला असता तर किती बरे झाले असते.

राजेश खन्ना बरोबर काम करत असताना राज खोसलाची नजर विनोद खन्नावर गेली आणि त्यांनी मेरा गाव मेरा देश मध्ये  जबर सिंग साठी  विनोदखन्ना ला निवडले . समोर ही मॅन धर्मेंद्र असताना तो रुबाबदार पणामुळे जास्त भाव खाऊन गेला.

१९७१ साली त्याने मैत्रीण गीतांजली बरोबर लग्न केले.मुकदर का सिकंदर सिनेमात अमिताभ बच्चनला विनोद खन्नाच्या दिशेने ग्लास फेकायचा होता. पण फायनल टेकच्या वेळेस ग्लास खरंच विनोद खन्नाला लागला आणि सहा टाके पडले अमिताभ त्याची त्याबद्दल  सारखी माफी मागत होता.त्याने अमिताभ बरोबर खूप चित्रपट केले. विनोद खन्नाला एका वर्षात चार निकटवरतीयांचे मृत्यू पहावे लागले.आईच्या मृत्यूच्या वेळी लोक त्याला बघायला स्मशानात जमले.त्याच्यावर अनेक कमेंट करू लागले वाटले की लोक इथेही  स्टार म्हणूनच बघायला आले आहेत . त्याने  तो खूप व्यतिथ झाला. त्याचे मन विषण्ण झाले.

त्याच सुमारास तो ओशो यांच्या संपर्कात आला. त्यांच्या तत्वज्ञाने तो भारावून गेला.आणि त्याने चित्रपट सृष्टि सोडण्याचा निर्णय घेतला.तो सोमवार ते शुक्रवार शूटिंग करीत असे व शनिवार रविवार ओशोच्या पुण्यातील आश्रमात जात असे. तो आश्रमात आपले स्टारडम सोडून सामान्य भक्त म्हणून वावरत असे.आश्रमाची सगळी कामे तो सामान्य भक्तांसारखी करत असे.

१९८० च्या सुमारास त्याने फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे सोडायचे जाहीर केले.हाती असलेले  चित्रपट पूर्ण केले  आणि तो ओशोच्या अमेरिकेतील आश्रमात दाखल झाला. याचा परिणाम साहजिकच त्याच्या वैवाहिक जीवनावर झाला. त्याच्या बायकोने घटस्फोट घेतला.१९८७ ला तो ओशोचा आश्रम सोडून पुन्हा भारतात आला.

त्याच सुमारास त्याची ओळख कविता  दफ्तरीशी झाली व त्यानी लग्न केले. .महेश भट विनोदला घेऊन जुर्म चित्रपट करत होता त्याच वेळी दोघांचे वाजले. व त्यांची दोस्ती तुटली १९९७ मध्ये अक्षय खन्ना साठी  हिमालय पुत्र बनवला.

१९९७ ला तो गुरुदासपूर येथून खासदार म्हणून निवडून आला.व वाजपेयी सरकारात पर्यटन मंत्री झाला. पुढे परदेश मंत्रालयाचा राज्यमंत्री झाला.२००४ व २०१४ सुद्धा खासदार बनला. अटलजी त्याचा आदर्श होते. हेमा मालिनी ला घेऊन अटलजी कडे गेला व तिला राजकारणात आणले.पुढे त्यानी टी व्ही सिरियल मध्ये  स्मृति इराणी सोबत काम केले. २७ एप्रिल २०१७ ला त्याचे कॅन्सर मुळे निधन झाले.मृत्यू नंतर त्याला दादा साहेब फाळके अवॉर्ड मिळाले.त्याने एकूण १३७ चित्रपटात काम केले.

 

त्याचे गाजलेले चित्रपट—

मेरे अपने
सच्याझुटा
हाथ की सफाई
मेरा गाव मेरा देश
अचानक
अमर अकबर अँथनी
पर्वरिश
इन्कार
कुर्बानी
दयावान
मुकदर का सिकंदर
बरनिंग ट्रेन

— रवींद्र शरद वाळिंबे

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 84 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..