खालिस्तानी दहशतवाद पुन्हा पुनरजिवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअर येथे खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध केला होता.भारताने हा प्रस्तावित मोर्चा होऊ नये अशी मागणीही इंग्लंडकडे केली होती. मात्र इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली .हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका पोहोचेल, असे फुटिरतावाद्यांनी केलेले कृत्य आहे अशा शब्दंमध्ये भारताने म्हटले आहे.

काश्मिरातील हिंसाचाराला पायबंद घालण्यात लष्कराला यश मिळू लागल्याने पाकिस्तान विचलीत झाला आहे. त्यांनी विविध नव्या आघाड्या उघडण्याचे काम आरंभले आहे. पाक हेरखात्याने बांगलादेशातील आपले हस्तकही आसाम बंगालमध्ये क्रियाशील केलेले आहेत.  त्यापैकी खलीस्तान सार्वमताची मागणी व वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी आहे. म्हणून तर ट्राफ़ाल्गार चौकातील निदर्शनाच्या प्रसंगी मुठभर शीख व अधिक संख्येने विविध पाकिस्तानी आणि काश्मिरी फ़ुटीरवादी राजकारण्यांनी पुढे येऊन पाठींबा दिलेला आहे. हे सगळे गट पाकिस्तानी हेरसंस्थेच्या आश्रयाने व पैशानेच चाललात, हे उघड गुपीत आहे. परंतु जितका झटपट भडका आसाम बंगालमधील निर्वासित घुसखोर बांगलादेशींमध्ये उडवता येईल, तितका खलीस्तानची आग लावता येणार नाही, हे पाकलाही पक्के ठाउक आहे. म्हणूनच त्यांनी खलीस्तानसाठी २०२० सालचे उद्दीष्ट ठेवले आहे.

पाकिस्तानी मुळाचे लंडनचे महापौर सादिक खान यांनी प्रो खालिस्तान सम्मेलनाला/ मेळाव्याला/ (रॅलीला) ट्रॅफ़ेलगार उपनगरात भरवण्याची परवानगी दिली. मात्र त्याच दिवशी भारताच्या बाजूने असलेल्या सम्मेलनाला/मेळाव्याला मात्र परवानगी नाकारली. कारण त्यांनी ही परवानगी वेळेवर मागितली नव्हती.खालिस्तानसाठी मेळावा”लंडन डिक्लेरेशन” नावाने ओळखला जातो आणि अमेरिकेत स्थित ‘सीख फॉर जस्टिस’ या संस्थेने तो आयोजित केला होता. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की 2020 मध्ये जगभर सार्वमत घेतले जावे आणी भारतातील पंजाबला स्वातंत्र्य मिळावे.या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे. भारतातील शीखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल असे या संघटनेने म्हटले आहे.भारत व जगातील वीस शहरांत सार्वमत घ्यावे आणि 50 लाख मतांचा त्याला पाठिंबा मिळवावा अशी धडपड सुरु आहे.नंतर त्याचा निकाल युनोत पाठवण्यात येणार आहे.

महापौर सादिक खान  महत्त्वाचे आहेत की भारत ब्रिटन संबंध?

लंडनस्थित भारतियांनी प्रो खालिस्तान सम्मेलना विरुद्ध “आम्ही भारतीय” म्हणून एक संस्था सहा महिन्यापूर्वी उभारली. त्यांनी ठरवले की 15 ऑगस्टच्या निमित्ताने ते भारताचा स्वातंत्र्यदिन लंडनमध्ये साजरा करतील. मात्र या बैठकीला लंडनचे महापौर पाकिस्तानी मूळचे सादिक खान यांनी परवानगी दिली नाही.त्यांच्या या कारवाईला भारत विरोधी मानले जावे.

आपल्या दोन्ही देशांच्या संबंधांचा विचार करुन इंग्लंडने अशी प्रकरणे हाताळावीत. याआधीच भारताने इंग्लंडकडे पत्राद्वारे आणि दोन बैठकांमध्ये हा मुद्दा उपस्थित करुन निदर्शनांना परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. लंडनला निरोप देण्याची गरज आहे की जर तुम्ही एका पाकिस्तानी मूळ नागरिकांमुळे जर भारतविरोधी तत्त्वांना समर्थन देणार असाल तर आम्हाला मान्य नाही. यामुळे भारत आणि ब्रिटन यांचे संबंध खराब होऊ शकतात. लक्षात ठेवा की आम्ही पण ब्रिटन विरोधी कारवायांना भारतात प्रसिद्धी देऊ शकतो. हे आपल्याला आवडेल का? फैसला करा की तुम्हाला लंडनचे महापौर सादिक खान  महत्त्वाचे आहेत की भारत ब्रिटन संबंध?

पाकिस्तानी अधिकारी युरोपातील खलिस्तानवादी आंदोलनाचा सूत्रधार

स्वतंत्र खालिस्तानच्या मागणीसाठी कॅनडा आणि युरोपात सुरू असलेल्या रेफरेंडम २०२० या मोहिमेचा सूत्रधार एक पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानी सैन्यातील चौधरी साहब अर्थात लेफ्टनंट कर्नल शाहिद मोहम्मद मलही हा अधिकारी युरोपात नव्याने सुरू झालेल्या खलिस्तानवाद्यांच्या भारतविरोधी आंदोलनाचा सूत्रधार आहे.चौधरीच्या पर्सनल कॉम्प्युटरमधून अनेक दस्तऐवज आढळून आले आहेत. ज्यामध्ये रेफरेंडम २०२० चळवळीचा विस्तृत आराखडा सापडला आहे. या मोहिमेच्या मागे अमेरिकेतील ‘सीख फॉर जस्टिस’ ही संस्था मुखवटा आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय या मागणीची मुख्य सूत्रधार आहे. आयएसआय पाकिस्तानसह जगातील इतर काही ठिकाणच्या मुखवटा संघटनांसोबत काम करीत आहे.

गेल्या दोन वर्षांत पंजाबमध्ये झालेल्या हिंदू नेत्यांच्या हत्यांमध्येही या चौधरीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.आयएसआयने युरोपात सुरू असलेल्या रेफरेंडम २०२०ला ‘ऑपरेशन एक्स्प्रेस’ असे नाव देण्यात आले आहे.६ जून २०२०मध्ये हे रेफरेंडम २०२० सुरू करण्यात येणार आहे.याच दिवशी पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या मोहिमेला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत.खलिस्तानवाद्यांना पाकिस्तानातील अनेक संस्थांकडून आर्थिक मदत मिळत आहे.

८०-९० च्या दशकातील खलिस्तानची चळवळ भारतातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा धगधगत ठेवला आहे. यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या परस्परसंबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.

दहशतवात पुन्हा पुनरजिवित करण्याचा प्रयत्न

अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील सर्वच राष्ट्रांनी दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उलचण्यास प्रारंभ केला, त्यानंतर या खलिस्तानवाद्यांनी आपला पवित्रा बदलून स्वतंत्र राज्याची उघड मागणी करण्याचे बाजूला ठेवले. त्याऐवजी ते शीखांवर होणारा अन्याय आणि अल्पसंख्यकांचे अधिकार याबद्दल बोलू लागले. त्यात पंजाबातील  बेरोजगारी आणि ड्रग माफियांचा उदय या समस्यांनी गेली दहा वर्षे थैमान घातले आहे. याचा फ़ायदा घेउन पाकिस्तान पंजाब मध्ये दहशतवात पुन्हा पुनरजिवित करण्याचा प्रयत्न करत आहे

काश्मीर फुटीरतावाद्यांचा खलिस्तानला पाठिंबा

पंजाब हे काश्मीरच्या शेजारचे राज्य आहे, आणि स्वतंत्र काश्मीरला सक्रिय पाठिंबा देणारा खलिद आवान हा पकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ला शस्त्रपुरवठा केल्याचा आरोप सिद्ध होऊन अमेरिकेतील तुरुंगात 14 वर्षांची सजा भोगत आहे.

पंजाब स्वतंत्र झाल्यास स्वतंत्र काश्मीर निर्माण करणे सोपे जाईल अशी अटकळ बांधून काश्मीर फुटीरतावादी खलिस्तानला पाठिंबा देत आहेत. ज्यावेळेस खालिस्तान दहशतवाद  चळवळ भारतात सुरु झाली, त्यावेळी एक प्रमुख नेते व समर्थक कट्टवादी जगजीतसिंह हे कॅनडात राहात होते व अनिवासी भारतिय होते. कॅनडामध्ये एका भारतीय मंत्र्याचा खून कऱण्यात आला आणि आपले एक विमानही पाडले होते. अशा प्रकारचे प्रयत्न अनेक देशात होत आहेत.

खालिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले यांचे उद्दातीकरण पंजाबमधील काही संस्थांकडुन करण्यात येत आहेत. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी त्याकरता पोस्टर लावली गेली. या कागदपत्रांमध्ये पंजाब पोलिसांना आवाहन करण्यात आले होते की त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नये. या पत्रकातून त्यांना बंड करण्यास सांगत होते. खालिस्तानवाद्यांचे साहित्य, फोटो गुरुद्वाराबाहेर विक्रीला ठेवण्यात येते,मात्र अशा प्रकारे त्यांचा फोटो दरबार साहिबमध्ये लावण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदाच होतो आहे. त्यांचे उद्दात्तीकरण करुन आणि खालिस्तानविषयी तरुणांना भडकवून खालिस्तानी दहशतवाद पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय शिख हे देशप्रेमी आहे. पण काही वाट चुकलेल्या शिखांच्या संघटना अमेरिका, युरोप आणि कॅनडा मध्ये तयार होत आहेत.

भारतविरोधाचा बीमोड कसा करावा?

खोटी माहिती सर्वदूर पसरवून शिखांवर भारतात अन्याय होत असल्याची बातमी पसरवली जाते. या सर्वच घटनांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कॅनडात होणार्या भारतविरोधी खालिस्तानी कारवायांवर लक्ष ठेवून त्याला विरोध झाला व्हायला हवा.दुसर्या देशामध्ये भारतविरोधी कारवाया करणार्यांविरोधात कारवाई अनेक स्तरांवर करावी लागेल. इस्राईलचे गुप्तहेर खाते देशाच्या शत्रुंना इतर देशांत जाऊन पकडते तसे आपण करु शकतो का? मुत्सद्देगिरीच्या जोरावर अशा देशांना भारतविरोधी कारवायांवर लक्ष ठेवून त्या त्या देशातील कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल.  आमच्यावर अन्याय होतो म्हणुन जो दुष्प्रचार केला जातो त्याविरोधात त्या देशातील स्थानिक माध्यमांतून लिहून हा विरोध मोडून काढण्याची गरज आहे.  खालिस्तान समर्थकांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. भारतविरोधी कारवाया या परदेशी भुमीवर होत असताना त्यावर लक्ष ठेवून त्यावर हल्ला व प्रतिहल्ला करणे गरजेचे आहे. भारत सरकार परदेशातिल भारतविरोधी कारवाया थांबवण्याचा प्रयत्न करेल का?.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 242 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…