नवीन लेखन...

डोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीत तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती, तीन समझोता करार आणि एक सहकार्य पत्रावर शिक्कामोर्तब झाल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे .

भारतात आजवर अनेक देशांचे प्रमुख येऊन गेलेत. अनेक प्रतिनिधी मंडळांचे दौरे झालेत. पण ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम सगळ्यांसाठी लक्षवेधी ठरला आहे. अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी ट्रम्प यांच्या दौर्याला होती .अमेरिकेतील भारतीय मतदार तेथिल निवडणुकीच्या मोठी भूमिका बजावतात. अनेक वर्षे चांगले नेतृत्व न मिळाल्यामुळे भारतिय आपा आपल्या धर्म ,जाती, जमाती व राज्याचे प्रतिनिधित्व करायचे.संख्या कमी असल्यामुळे त्यांचे फ़ारसे महत्व नव्हते.पण भारतिय बनल्यापासुन त्यांची संख्या ४० लाख झाल्यामुळे, आज हे सगळे ‘भारतिय म्ह्णुन अमेरिकेत एक मोठा द्बाव गट बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आज जगातिल एकुलती एक महाशक्ती असलेल्या देशाचे प्रमुख आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसीय दौऱ्यात पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जेअर्ड सहभागी झाले. या दौऱ्यात त्यांनी भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली.

नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम

अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विमानतळ ते स्टेडियम या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो लोकांनी तसेच मोटेरा स्टेडियमच्या आत असलेल्या लाखांवर लोकांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. या भेटीमुळे ट्रम्प हे दुसर्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर भारताला त्याचा खूप फायदा मिळू शकतो. अमेरिकेत थोडेथोडके नाही तर 40 लाख भारतीय आहेत. या अनिवासी भारतीयांच्या मदतीने भारताचे हितसंबंध ट्रम्प यांच्या कार्यकाळात जपले जाऊ शकतात.

पाकिस्तान जंग जंग पछाडत असताना ट्रम्प आतापर्यंत एकदाही पाकिस्तानच्या दौर्यावर गेले नाही, तर भारतात आले. यातून भारताचा खरा मित्र व्हाईट हाऊसमध्ये बसला असल्याचे आपले विधान ट्रम्प यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. मोदी हे अतिशय ‘हार्ड निगोशिएटर’ असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. हा एकप्रकारे मोदी यांचा केलेला गौरव आहे.

आपल्या या भारत दौऱ्यात कोणताही मोठा व्यापार करार होणार नाही, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथून निघतानाच सूचित केले होते. निवडणुकीच्या वर्षांत तेथील अध्यक्ष कोणतेही धोरणात्मक निर्णय घेत नाही.

अमेरिकेन देश प्रमुखांची भारतभेट दीर्घकालीन संबंधांसाठी उपयुक्त होती. कारण भारतासाठी अमेरिका हा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील विश्वसनीय भागीदार आहे आणि त्याची साथ सोडून देणे शहाणपणाचे नाही. त्यामुळे या भेटीचे मूल्यमापन ‘आज काय हाती लागले’ पद्धतीने करणे शहाणपणाचे नाही. या भारतभेटीदरम्यान अमली पदार्थविषयक कृतिगटाच्या स्थापनेचाही समावेश आहे.

तंत्रज्ञान आणी ऊर्जा करार

२४ एमएच ६० रोमिओ हेलिकॉप्टर व सहा अपाचे हेलिकॉप्टर यांचा खरेदी व्यवहार ही भारत सरकारसाठी ट्रम्प यांच्या या भेटीची एक मोठी उपलब्धी आहे. अमेरिका हा संरक्षणक्षेत्रासाठीचा एक मोठा पुरवठादार देश म्हणून गेल्या काही वर्षांत समोर आलेला आहे. गेल्या दशकात अमेरिकेने वीस अब्ज डॉलरची संरक्षणविषयक सामुग्री भारताला पुरवली. प्रस्तुत तीन अब्ज डॉलर मूल्याच्या साधनसामुग्रीद्वारे दोन्ही देशांतील हे नाते अधिक बळकट बनले आहे . भारत आणि अमेरिका संरक्षणक्षेत्रामध्ये एकमेकांच्या अधिक जवळ आलेले आहेत. उभय देशांच्या तिन्ही सेनादलांनी गतवर्षी ‘टायगर ट्रायम्फ’ ही संयुक्त लष्करी कवायत केली होती. अत्याधुनिक युद्धसामुग्रीचा निर्माता असलेल्या अमेरिकेला भारताच्या संरक्षणविषयक गरजांची पुरेपूर जाण आहे.

औषध क्षेत्राच्या जगात अमेरिकेच्या औषध नियंत्रण यंत्रणेने मंजूर केलेले औषध सर्व देशांत विकले जाते. त्या यंत्रणेने एखाद्या औषधास नाही म्हटले तर ते जगात विकले जात नाही. त्यामुळे औषध उत्पादने करार आपल्या करता महत्त्वाचा आहे.भारत औषध निर्माण करणारा मोठा देश आहे.

ट्रम्प यांच्या निवेदनात दूरसंचार क्षेत्रातील ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे. त्या क्षेत्रात आपण चीनच्या हुआवै कंपनीचे तंत्रज्ञान वापरू नये असा अमेरिकेचा आग्रह आहे. अमेरिकेने हेरगिरीच्या कारणावरून हुआवै कंपनीच्या तंत्रज्ञानावर निर्बंध आणले असून आपल्याप्रमाणे अन्य देशांनीही या कंपनीस दूर राखावे असा अमेरिकेचा आग्रह आहे. हे तंत्रज्ञान भारतात स्वीकारण्यासाठी आपणास अमेरिकेची मदत लागु शकते.अवकाश संशोधन क्षेत्रात अमेरिकेची नासा आणि आपली इस्रो या दोन यंत्रणांत संशोधन सहकार्य सुरू आहे.

इराणवरील निर्बंध, व्हेनेझुएलाकडून होणार्‍या कच्चे तेल खरेदीविरोधातील दबाव यामुळे अमेरिकेकडुन आपण तेल व वायूची खरेदी करत आहे. भारताच्या ऊर्जा संसाधनांच्या प्रचंड मागणीवर डोळा ठेवून अमेरिकेने या क्षेत्रामध्ये सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे.

एक दूरगामी मुद्दा आहे एग्झॉन-मोबील आणि भारताची इंडियन ऑइल या कंपन्यांत झालेला सामंजस्य करार. आपल्या ऊर्जा-गरजा लक्षात घेता तो महत्त्वाचा आहे. हा करार नैसर्गिक वायूसाठी आहे. अमेरिका आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर ऊर्जा घटकांची निर्यात करू लागला असून आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. अमेरिकेच्याच दबावामुळे आपण इराणकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध आले. एग्झॉन ही खनिज ऊर्जा क्षेत्रातील सर्वात बलाढय़ कंपनी भारतासाठी इंधनवायू मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करून देणार आहेत जे भारताची ऊर्जा गरजेमुळे महत्वाचे आहे.

पाकिस्तानचा इस्लामी दहशतवाद

इस्लामी दहशतवादाचा उल्लेख ट्रम्पनी केला. पण आपणास आवडेल तितके त्यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले नाही. दोन्ही देश लोकशाहीप्रधान आहेत, तसेच दोन्ही देशांना दहशतवादाचा सारखाच फटका बसला आहे. त्यामुळेच दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी एकत्रित लढाई लढण्याचा निर्धारही ट्रम्प यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांनी फक्त दहशतवाद एवढा शब्द वापरला नाही तर जाणीवपूर्वक इस्लामिक दहशतवाद असा शब्द वापरला आणि असा दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानने कारवाई करण्याची सूचना केली.

पुढची वाटचाल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठ महिन्यांत पाचव्यांदा भेटले. ट्रम्प भारतात येण्याआधी व्हाईट हाऊसमधून निघालेल्या निवेदनात पाकिस्तानला पुन्हा सज्जड इशारा देण्यात आला होता. भारताशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर आधी दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवा आणि त्या संघटनांना आवरा, असा इशारा अमेरिकेने दिला. हा इशारा भारत सतत घेत असणाऱ्या दहशतवादविरोधी भूमिकेचे बळ वाढविणारा आहे. तो चीनलाही सूचक इशारा आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आम्ही भारताची साथ देऊ, हे चीनला सुनावणे आहे. भारत, अमेरिका यांनी मैत्रिसंबंध वाढवून चीनच्या विस्तारवादाला वेसण घालणे, ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यामुळे, ‘करोनाग्रस्त’ चीनचा मुद्दा मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत विचार झाला. या ट्रम्प भेटीनेही या संबंधांमधले पुढचे पाऊल पडेल, यात शंका नाही.या दौऱ्यात होणाऱ्या करारांतून दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सामरिक संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास आहे. दिवसेंदिवस भारत आणि अमेरिकेमधला विश्वास वाढत आहे. व्यापार, संरक्षण, संशोधन, सांस्कृतिक संबंध अशा सगळ्याच क्षेत्रात भारत अमेरिकेचे संबंध वाढत असून, मोठी उद्दिष्टे ठेवून ती प्राप्त करणे हे भारताचे लक्ष्य आहे. डोनाल्ड ट्रम्प हे विलक्षण नेते असून भारताचे मित्र आहेत, त्यांच्या भारत भेटीचा भविष्यात फायदा होईल. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीमुळे भारत-अमेरिका संबंधात वाढ भारताला फ़ायदेशिर ठरेल.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..