नवीन लेखन...

हवेतील नायट्रोजन ऑक्साइड

मुंबईच्या हवेत कोणकोणते त्रासदायक घटक आहेत याची जंत्री करणे मोठे जटिल काम आहे. १९९६ साली जपानमधील नागोया गावी एक परिषद झाली. तेथे अमेरिकेच्या हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने मुंबईच्या हवेत असलेल्या नायट्रोजन ऑक्साइडच्या जास्तीच्या प्रमाणाबद्दलचा निबंध वाचला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे हे जास्तीचे प्रमाण असण्यात मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो.

खरे म्हणजे नायट्रोजन डाय ऑक्साइड हा सर्वव्यापी आहे. कारण खनिज आणि जैविक इंधने जाळली तर त्यांच्या ज्वलनातून हा वायू बाहेर पडतो. या वायूच्या प्रादुर्भावामुळे ज्या अनेक गोष्टी घडतात त्यातली एक म्हणजे रासायनिक स्मॉग. स्मॉग हा शब्द स्मोक आणि फॉग याच्या संमिश्रातून तयार झाला आहे. मराठीत याला धुरके म्हणतात. या धुरक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना दम्याचा त्रास होतो, असा आयआयटी पवईच्या पर्यावरण विभागातीला प्रा. रश्मी पाटील यांचा निष्कर्ष आहे. हार्वर्ड स्कूलच्या अभ्यासात प्रा. रश्मी पाटील सहभागी होत्या. नायट्रोजन ऑक्साइड अथवा त्याची इतर रसायनांबरोबरची संयुगे ही माणसाला घातकच आहेत.

केरोसिनचा स्टोव्ह, लाकडे जाळणारी चूल, सिमेंटचा कारखाना, वाहनांच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर आणि धूम्रपान यामुळे नायट्रोजन ऑक्साइड तयार होतो आणि तो हवेत मिसळतो.

हार्वर्ड अभ्यास मंडळाने तेरा देशांतल्या, सत्तर ठिकाणी ४९१ व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांची प्रत्येकी दोन दोन दिवस पाहणी केली. यातील फिनलंड येथील पाहणीत एक कोटी भागात फक्त साडेपाच भाग नायट्रोजन डायऑक्साइडचे भाग आढळून आले. या उलट दक्षिण कोरियात सेऊलला सर्वात जास्त म्हणजे एक कोटी भागात ४३ भाग, जपानमधील टोकुशीमा येथे ४१.९ भाग आणि मुंबईला ४०.८ भाग असे प्रमाण आढळले.

यामुळे डोकेदुखी, घसा धरणे, खोकला, छातीत जड वाटणे, असे विकार उद्भवतात. फुप्फुसाचे विकार उद्भवतात. मुला-मुलींची वाढ नीट होत नाही. एल.पी.जी. अथवा वीज वापरली, स्वयंपाकघरात हवा खेळती ठेवली तर नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण खूप कमी आढळते.

अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..