आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १४

Modern American Agriculture and Animal Farming - Part-14

अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील मनुष्यबळावर व पशुबळावर आधारलेल्या अमेरिकन शेतीचे विसाव्या शतकात झपाट्याने यांत्रिकीकरण होत गेले. शास्त्रीय संशोधनाची भक्कम बैठक, तंत्रविज्ञानातील प्रगती, रासायनिक खते, आधुनिक जंतुनाशके, सुधारित बियाणे, रोगराईचा समर्थपणे मुकाबला करू शकणार्‍या पिकांच्या नवीन प्रजाती, या सर्वांमुळे कृषी उत्पादनात नेत्रदीपक वाढ झाली. पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात देखील शास्त्रीय प्रगती व यांत्रिकीकरणामुळे फार्म्सना कारखान्यांचे रूप आले. कृषी तसेच पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात फार्म्सचे आकारमान मोठे होत जाणे हा कल (trend) सुरू होऊन गेला. कमी मनुष्यबळाच्या जोरावर, कमी कष्टात, प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन, हा जणू नवीन मूलमंत्र होऊन गेला. प्रगतीचे शिखर गाठले गेले आणि ‘आता याच्यापुढे काय’ असा प्रश्न भेडसावू लागला. शेती व पशुसंवर्धनाच्या औद्योगीकरणाचे दुष्परिणाम जाणवायला लागले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातली ही परिस्थिती भविष्यात कोणते रूप धारण करते हे आत्ताच सांगणे अवघड आहे. पुढचा मार्ग हा, खनिज तेलावरचे परावलंबीत्व कमी करण्याचा प्रयत्न, पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी वाढत असलेली जागरुकता, नैसर्गिकरित्या उत्पादन केलेल्या अन्नाकडे होत चाललेला ग्राहकांचा कल, वाढत्या जागतिक लोकसंख्येला पुरवठा करण्यासाठी अन्न उत्पादन वाढवण्याचे आव्हान, अशी विविध ध्येय धोरणे संभाळण्याची तारेवरची कसरत असणार आहे यात शंका नाही. येत्या दशकातील सरकारी धोरणे व जागतिक बाजारपेठेचे स्वरूप अमेरिकन कृषी/पशुसंवर्धनाला जी दिशा देईल त्याचे दूरगामी परिणाम झाल्याशिवाय रहाणार नाहीत एवढे मात्र खरे !

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....