आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १२

Modern American Agriculture and Animal Farming - Part-12

अमेरिकन शेती खात्याच्या (United States Department of Agriculture) २००७ सालच्या सर्वेक्षणाकडे नजर टाकली तर अमेरिकन शेती व्यवसाय व पशुसंवर्धनाच्या संदर्भात बरीच उद्बोधक माहिती मिळू शकते. २००७ साली अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्म्स होते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन संदर्भात फार्म्स ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापराय़ची आहे. प्रत्यक्ष कृषी उत्पादन तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत सर्व व्यवसायांना त्यात समाविष्ट करायचे आहे.

त्यांच्या मालकांच्या जीवनपद्धतीमधे ’फार्मिंग’ला काय स्थान आहे यावरून हे फार्म्स वेगवेगळ्या प्रकारात मोडतात. यातील दोन सर्वात मोठ्या प्रकारात मोडणारे फार्म्स म्हणजे उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्म्स (३६%) आणि निवृत्ती फार्म्स (२१%).

उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्मस्‌ – यांचे वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि मुख्य मालक शेती शिवाय इतर काही तरी नोकरी /व्यवसाय उत्पन्नाचे साधन म्हणून दाखवतो.

निवृत्ती फार्मस्‌ – यांचे देखील वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि शेतीला निवृत्ती नंतरचा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असतो.

अनेक कुटुंबांमधे शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या चालत आलेला असतो. यातले बरेच फार्म्स आकारमानाने प्रचंड मोठे असतात. अशा या ‘मोठ्या खानदानी फार्म्स’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी फार्म्स’चे वार्षिक उत्पन्न अनुक्रमे २५०,००० ते ५००,००० डॉलर्स आणि ५ लाख डॉलर्सपेक्षा अधिक असते.

वर उल्लेखल्या प्रमाणे पशुसंवर्धन तसेच शेतीच्या फार्म्सची घटत जाणारी संख्या, वाढत जाणारे आकारमान आणि थोड्याच परंतु सामर्थ्यवान फार्म्सच्या हातात होत चाललेले उत्पादनाचे आणि एकंदरीतच व्यवसायाचे केंद्रीकरण हा कल (trend) २००७ च्या सर्वेक्षणामधे पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. उदाहरणार्थ, २००२ साली १४४,००० फार्म्स मिळून सुमारे ३/४ अमेरिकन शेती मालाची (किंमतीच्या स्वरूपात) निर्मिती करत होते, तर २००७ साली केवळ १२५,००० फार्म्स मिळून तेव्हढ्याच उत्पादनाची निर्मिती करत होते. वर उल्लेखलेल्या ‘मोठ्या खानदानी’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी’ फार्म्सची संख्या, एकूण फार्म्सच्या संख्येच्या केवळ ९% आहे; परंतु एकूण शेती उत्पन्नाच्या (किंमतीच्या स्वरूपात) जवळ जवळ २/३ (६६% हून अधिक) उत्पादन हे फार्मस्‌ करतात. वेगवेगळ्या राज्यांच्या पातळीवर जाऊन दाखले द्यायचे झाले तर मिसुरी या राज्यातले केवळ ७% शेतकरी त्या राज्यातले ३/४ शेतीमालाचे उत्पादन करतात. कान्सास राज्यामधे २/३ शेती उत्पादन हे ३% हून कमी फार्म्सवर होतं. यावरून या प्रचंड मोठ्या फार्म्सच्या उत्पादन क्षमतेची कल्पना यावी.

डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....