नवीन लेखन...

गहाण मिशी

खंडु पाटील मंजे गावातली नामी आसामी व्हती.आजुबाजुच्या दहा पंधरा खेड्यायतं गड्याचा रूतबा व्हता.गावातुन गडी निस्ता चालला तरी गावातल्या बायाबापड्या तटतट उठुन घरात पळायच्या.आलुतेदार बलुतेदार त्याच्या दाराम्होरून जातांनी पायतान हातात घेउन पुढ जातं.आसा गड्याचा रूबाब व्हता.लहानपणापसुन आखाड्यात कुस्त्या खेळुन पाटलानं शरीर कमावलं व्हतं.भल्याभल्या पैलवानांना त्यानं आखड्यातं पाणी पाजलं व्हतं.पंचक्रोशीत लय दिलदार माणुस मनुन प्रसिद्ध व्हता.त्याच्या दारालं आलेला दिन दुबळा कव्हाच रिता गेला नाही.पाटील जसा आडदांड व्हता तसाचं मानी, शब्दाचा पक्का,अभिमानी आन ईज्जतीलं जपणारा व्हता.

आमचा आजा सांगायचा.आसाचं गावात एकदा एक रोह्यल्या पहिलवान आलता.दुसर्‍या मुलखातुन येवुन त्यो रोह्यल्या याजबट्ट्याचा धंदा करायचा.आमच्या गावातबी त्या रोह्यल्यानं याजानं पैकं वाटलेले व्हते.आता सोयाबीनच्या सुगीवर त्यो रोह्यल्या वसुलीलं आलता.पावसानं साथ न देल्यानं त्यासाली कुणबीक पिकली नवती.रोह्यल्याच्या दहशतीखाली लोकं रानावनायत जाऊन लपून बसले व्हते.ईकडं घरोघर जाऊन रोह्यल्या बायका पोरायलं धमकाऊ लागला.सगळं गावं नामर्द हाय मनुन खिदळत थयथयाट करायचा.एका दिशी गावातल्या चावडीवरच्या आखाड्यावर उभा राहुन गावकर्‍यायल काही बाही मनु लागला.त्यानं मोठ्यानं आरूळी ठोकली ,“ऐ नामर्दोकी औलादो,पैका फेडणा नही होता तो काय को लेते हो.अगर तुम पैका फेड नही सकते तो अपनीमां,बहेन,बिवी मेरे हवाले करो..दो दिन मे पैसा नही दिया तो घर में से मै तुम लोगोकी औरते उठा के ले जाऊंगा”.सगळं गावं रोह्यल्याच्या ह्या आरूळीनं हादरलं.ईकडं उडतं उडतं खंडु पाटलाच्या कानावर ही खबर गेली.पाटील रागान लालबुंद झाला.त्यानं करकर दात खात मुठी आवळल्या.आन आपला गडी हैबतीलं बलवुन त्याच्या हातानं रोह्यल्यालं मैदानातं एक एक कुस्तीच्या डावाचा निरोप पाठवला.

धावत पळत हैबती पाटलाच्या वाड्यावर आला.रोह्यल्यानं परत सांगावा धाडला व्हता.“कुस्ती तं खेळायलं तयार हे,पण जे हारलं त्यानं मिशी कापुन,सगळी जायदात सोडुन गाव सोडुन जायचं अशी अट घातली हाय”.खंडु पाटलानं रोह्यल्याचं आव्हान स्वीकारलं.पाहता पाहता कुस्तीचा दिस उजडला.संगळं गाव चावडीवरच्या आखाड्यावर जमलं व्हतं.जे ते खंडु पाटलाच्या जितण्याची आशा करू लागले.बर्‍याच जन्हायनंतं देवायलं साकडंबीक घातलं व्हतं.लंगोट खवुन खंडु पाटीलं आखाड्यातं उतरला.त्याच्यापुढं अक्राळविक्राळ राकेसासारका धिप्पाड रोह्यल्या दातं ईचकतं नाचत खिजवत व्हता.पाटलापक्शा फुटा दिडफुटान उच्ची आसल्यानं पाटीलं त्याच्यापुढ ठेंगु वाटत व्हता.ढोल ताशे वाजायलं लागले.शिंगाड्यानं शिंग फुकले.कुस्तीलं सुरूवात झाली.कुस्ती चांगलीच रंगली.एव्हाणा रोह्यल्यालं पाटलाच्या ताकतीचा आंदाज आलताचं.आता त्यो चेकाळल्यावाणी करू लागला.ईकडं पाटलालबी रोह्यल्यानं या आंधी गावकर्‍यायलं बोललेले एकेक शब्द आठवु लागले.त्याच्या डोस्क्यात निस्ता जाळ पेटला व्हता.डाव साधुन पाटलानं त्या रोह्यल्यालं कंबरतं डाव देऊन दोन्ही हातानं डोस्क्यावर उचललं.मैदानाच्या चारी बाजुनं मिरवत त्यालं जोरात खाली आदळलं.लगोलग पाय पकडुन त्यालं जनावरागत गरगर फिरवत मैदानाबाहीर फेकलं.सगळं गांव मैदानात घुसलं.पाटलालं डोस्क्यावरं घेऊन नाचु लागलं.ईकडं रोह्यल्याची कंबर मोडली व्हती.ते केविलवाणी आवाजात ईव्हळु लागलं.पाटलालं त्याची दया आली.पाटील जवळ जाऊन त्या रोह्यल्यालं मनला कि,“ब्वा आपली ताकत आन पैश्याचा वापर गरीबायवर अत्याचार करायसाटी न करता तेह्यच्या भल्यासाठी केला तं ईश्वर त्यालं काहीच कमी पडु देत नाही. जरी ठरल्याप्रमाणं कुस्ती हरल्यानं सगळ्या गावावरचं कर्ज तुलं माफ करावं लागत आसलं तरीपण आम्ही काय इतकेबी बेमान नाही.सगळ्या गावावरचं कर्ज म्या एकरकमी देऊन टाकतो पण परतं या गावात याच्यानंतर पाऊल ठुयाचं नाही.” रोह्यल्यालं लाजुन मेल्यासारखं झालं.पाटलानं सगळ्या गावचं कर्ज एकरकमी फेडलं व्हतं.या घटनेनंतर पाटलाचा पंचक्रोशीत दरारा आन आदब आंजुकच वाढला व्हता.

आजा पुढं सांगत व्हता.एकदा पाटील पंढरील विठुरायाच्या दर्शनासाठी गेला व्हता.तिथं चंद्रभागतं आंघुळ करतानी तिथं ठक आले.पाटीलं नदीत पव्हायलेला पाहुन ते पाटलाच्या जिनसा घेउन पळु लागले.पाटलानं ते पाह्यलं आन तसचं नदितुन बाहीर येऊन वल्लचं धोतर खोसुन त्यानं त्या ठकायचा पाठलाग करून पकडलं.ते पाचं दहा व्हते.पाटील एकटाच पडला.तेह्यनं सगळ्यायनं पाटलावर हल्ला चढवला.पाटील रागानं चवताळला व्हता.त्यानं ठकायच्या म्होरक्याच्या मुस्काडात एक टोला हानला तशी त्याची बत्तीशी बाहीर आलती.ठग हतबल व्हवुन पळाले.पाटलानं ती बत्तीशी उचलली आन विजयी तोर्‍यातं तो मुक्कामाच्या ठिकाणी आला.जवळचे पैकं तं चोरी झालते.

आत्ता काय करावं या चिंतेत पाटील पडला व्हता.त्यालं काहीच कळतं नवतं.त्यालं तिथं कोणतरी सल्ला देला कि जवळच शावाकरायची पेढी हे.ते शावकार काहीतरी जिनसा गहान ठुऊन घेतात आन पैकं व्याजावर देतात मनुनं.पाटील त्या पेढीवर गेला.त्याच्याजवळं तं गहान ठुयालं कायबी नवतं.त्यो येर्‍हीच त्या पेढीवाल्यायच्या पेढ्यायपुढुनं चकरा मारू लागला. तेवढ्यात एक उंच पुरा,कमरलं कुबड आलेला दाढीवाला म्हातारा त्याच्याकडे चालत येत असतांना पाटलालं दिसला. जवळ येतानी तो म्हाताऱा पाटलाकडं गुढरीत्या पहात व्हता. गोंधळून गेलेल्या पाटलालं त्या म्हाताऱ्यानं आदाब करतं क्यों भाई,क्या हुवा.किसको ढुंढ रहे क्या” मनुन ईचारलं. कोणतरी विचारल्यामुळे पाटलाला थोडं बरं वाटलं. पाटलानं त्या माणसाला आपली हकीकत सांगितली. मग थोडा लांब सुस्कारा सोडत तो माणूस पाटलालं मनला,“मियां,चलो मेरे साथ. देखता हुं क्या हो सकता है क्या? पाटील गुमान त्याच्या मागे चालत चालत एका पेढीत गेला.त्या माणसाने एक चोपडी काढून त्यात पाटलाचं नाव,गाव,सर्व खतवून घेतलं.अन पाटलाकडं चष्म्यातून तिरकसपणे पहात मनला कि,“ मियां,कितने पेसे मंगता है तेरकु,और तुम गहाण क्या ठेव सकते हो.”असं पाटलाला विचारलं. पाटलाजवळ गहाण ठुयालं कायबी नवतं.काय गहाण ठुवावं या ईचारात पाटील पडला. त्यांनं लय ईचार करून आपल्या मिशीचा एक केस उपटला आणि त्या सावकारापुढे ठेवला.अन मनला ,“आजपसुन बरोबर मह्यण्याकभरानं म्या पैकं आणुनं देतो अनं मव्हा मिशीचा केस मी वापस नेईलं.तव्हरोक संबाळुन ठुवा.मही ईज्जत हात त्यो.त्या शावकारानबी त्यो केस एका सोन्याच्या डब्बीत ठुवून देला.पाटलालं हवे ते पैसे देले.पैसे घेऊन पाटील गावी गेला.

महिन्याभराने पाटील पुन्हा पंढरपूरला आला अन त्या शावकाराच्या पेढीत गेला.त्याने शावकारालं व्याजासकट पैसे देले.शावकारानं तिजोरीतून एक सोन्याची डबी काढून त्यात जपुन ठेवलेला पाटलाच्या मिशीचा केस पाटलालं वापस देला आणि अलगद आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढून हसत हसत मनला की,“पाटील पहचाना क्या… !” चेहरा वळखीचा वाटत व्हता पण ध्यानात येत नव्हतं.मंग हसत हसत तो म्हातारा शावकार म्हणला की,“पाटील मै तुमसे ब्याज नै ले सकता.तुमने मेकु भोत बडी शिख दि है.मैं पैले व्याज बट्टा का धंदा करता था. लोगो को पैसा देना,धमकाना,और जबरन वसूलना ये मेरी आदत सी हो गई थी.लेकीन एक बार आपके गाव मे आने के बाद,आपसे मेरा सामना हो गया.और यहींसे मेरी जिंदगी बदल गई.मुझे उस दिन जिंदगी की असली राह मिल गई और मकसद भी ! मैने अपना व्याजसे पैसा वाटणे का धंदा बंद किया और यहा आके पेढी डाली.अब मै जरूरतमंदो को मदत करता हु.उस पे थोडा बहुत ब्याज लेता हु.लेकिन तुम्हारी वजहसे मै जिंदगी मे बहुत शिका, इसलिये मै तुमसे कुचबी ब्याज नही ले सकता.वो तुम लोगो में उसको गुरूदक्षिणा क्या कुच ऐसा बोलते ना वो समझो.” असं म्हणताच पाटलालं लख्खकन जुने दिवस आठवले.पाटलानं आत्ता कुठं त्या शावकारालं वळखलं व्हतं.पुढं तो रोहिल्या मनाला,“पाटील मैने तुमको पहिलेच पैचाना था.मै तभीच तुमको वळख बता के पैसे दे सकता था.लेकिन मैं देखना चाहता था की,जमाने के साथ पाटील कितना बदल गया है.लेकीन सच बोलु तो ना तो पाटील बदला,ना उसका मुकद्दर,और ना ही ईमानं. पाटलानंबी आता रोह्यल्यालं वळखलं व्हतं.दोघांची नजरानजर झाली.न राहवुन दोघांनबी गळा भेट घेतली. रोहिल्या पाटलाला घेऊन घरी गेला.पुढं दोन दिस त्यानं पाटलालं ठुवून घेऊन खुप सरबराई केली.दोन दिलदार दुष्मन आता दिलदार मित्र झाले व्हते.

@ गोडाती बबनराव काळे
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..