नवीन लेखन...

चहा महात्म्य

सकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो. वाफाळलेला चहा घेतल्यावर थोडी तरतरी येते. श्रीमंत व्यक्तीचा चहा आणि गरीबाचा चहा यात फरक असू शकतो पण एक आहे चहा घेतल्यावर एक सकारात्मक मूड बनतो. आजकाल खूप साऱ्या प्रकारचे चहा टपरीवर मिळतात. गुळाचा चहा सुद्धा मिळतो. रस्त्यात एखादी ओळखीची व्यक्ती भेटली की, नुसत्या कोऱ्या गप्पा मारण्यात मजा येत नाही. टपरीवर चहा घेता घेता गप्पा मारण्यात एक वेगळीच मौज आहे.

कुणाच्या घरी गेलं की, चहापाणी देऊन आदरतिथ्य केलं जातं. काही काही लोक नुसतं पाणी देऊन बोळवण करतात. थंडीने अंग थरथर कापत आहे आणि समोरची व्यक्ती फ्रिजमधलं थंड पाणी घेऊन येते हा मान म्हणावा की अपमान म्हणावा? मनात येतं दोन शिव्या हासडून द्याव्या! चहा नसता तर आदरतिथ्य करणं जरा कठीणच गेलं असतं नाही कां? नाश्ता, कांदा पोहे बनवणं थोडं खर्चिक बाब आहे. प्रत्येकवेळी आणि प्रत्येकासाठी नाश्ता आदी बनवला जात नाही. माणूस पाहून सगळं काम चालतं!

कधी कधी संपूर्ण मार्केट बंद असतं. सगळ्या चहा टपऱ्या ओस पडलेल्या असतात. अशावेळी मन चहासाठी अधिकच चुळबुळ करू लागतं. एखाद्यामित्राकडे जाऊन चहाची तल्लफ भागवावी म्हणून जावं तर त्याच्या घराला भलं मोठं कुलूप लावलेलं दिसतं. हिरमोड होतो राव मनाचा! एखादेवेळी प्रमाणाबाहेर चहा ढोसायला मिळतो. नको नको म्हणत असतांना लोक चहा पाजतात. कधी चहा पाज म्हटलं तर पाजायला कुणी तयार होत नाही. कधी कधी इच्छा नसतांनाही चहा पिणं होतं. रूमवर करमत नाही, बोअर होतंय अशावेळी टपरीवर गेलं की थोडं बरं वाटतं. बोअरनेस कमी होतो.

चहा पिण्याची लज्जत थंडीत आणि पावसाळ्यात असते. पावसात चिंब भिजून आल्यावर समोर गरमागरम चहा आला की खूप हायसं वाटतं. सोबत गरमागरम भजे असले तर अजून चांगलं! उन्हाळ्यात थंड पेय घेण्याकडे लोकांचा कल असतो पण तरीही चहा टपरीवरची गर्दी कमी होत नाही हॆ विशेष! मी नोकरीत असतांना दोनदा चहा यायचा. एक अकरा वाजता आणि दुसरा दोनच्या सुमारास यायचा. आज नोकरीत नसलोतरी तिच जुनी सवय आहे. जेवण झालं की लगेच चहा घ्यावासा वाटतो.

बरेचजण चहा पिणं वाईट आहे म्हणतात. मला तसं वाटत नाही. कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर घेतली की बाधणारच! औषध आजाराला बरं करतं पण प्रमाणाबाहेर घेतलं तर नुकसान पण होतं. जगात अशी एकही वस्तू असित्वात नाही जी पुर्ण निर्दोष असेल. माणूस काय किंवा पदार्थ काय त्याच्यात चांगले वाईट दोन्ही गुण असतात. कुणाचा कसा नि किती वापर करून घ्यायचा हॆ ज्याने त्याने ठरवावे.

श्रीनिवास गेडाम

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..