नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

माणुसकीचे विकृतीकरण

हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि.. […]

हातात हात…

‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम’ सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घ्यायला फार पूर्वीपासून सांगितले जाते. हातांचे दर्शन घेतल्यानंतर वरील श्लोक म्हटला पाहिजे. त्याचा अर्थ सोपा आहे, साधा आहे. श्लोक म्हणतानाच तो लक्षातही येतो. जसे आपल्या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि ईश्वराचा वास आहे. त्यामुळे हातांचे दर्शन सकाळी उठल्यावर पहिल्यांदा घेतले पाहिजे. […]

‘नॅक’चे शिवधनुष्य

जाहिरातीच्या युगात प्रमाणीकरण आवश्यक आहे. महाविद्यालयांनाही त्यामुळे संजीवनीच मिळणार आहे, पण त्यासाठी नॅककडे विधायक दृष्टिकोनातून बघायला हवे. नॅक ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे मान्य करावे लागेल, अन्यथा सारी शैक्षणिक प्रक्रिया गोंधळाची होऊन जाईल. […]

आदर्श शिक्षा पद्धतीचे आवश्यक घटक

समाजाच्या रक्षणाकरता शिक्षा देणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला निश्चितपणे त्याची आदर्श शिक्षापद्धती पाहिजे. आता भारताचा नवीन दृष्टिकोन ‘गुन्हेगारास कडक शिक्षा न देता सुधारणे’ हे धोरण आहे. […]

अंधश्रध्दा निर्मूलन : प्रश्न, आक्षेप, मर्यादा व अपेक्षा

आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी? हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करुन अंधश्रध्दा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे पण अवडंबर नको. […]

आपण सारे एक झालो…

पंचतत्व. अग्नि, वायू, पाणी, पृथ्वी, तेज ही तत्व मिळून पंचतत्व तयार होतं. मानवी शरीर देखील याच तत्वांनी बनलेलं. शरीर याच पंचतत्वाच विलीन होऊन जातं. शरीर विलीन होतं म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रुपात पुन्हा मागे उरतं. कशात तरी समावून जातं. काही तरी बनून जातं. याचाच अर्थ असाच ना की आपण सारे एकमेकांपासुन तयार झालेलो आहोत. […]

आधुनिक नवीन शिक्षाशास्त्र

केलेल्या अपराधाच्या गांभिर्याप्रमाणे शिक्षा त्याच प्रमाणात व्हावी हा आधुनिक विचार आहे. गुन्हेगाराचे पुनर्वसन करण्याकरता त्याचे सुधारीकरण जास्त महत्वाचे आहे. त्याला समाजातून दूर करणे योग्य नाही. आधुनिक विचारांचा पाठपुरावा शिक्षाशास्त्रज्ञ श्रीयुत बेकारिया, गॅरोफेलो फेरी, तारडे, बेंथाम यांनी केला. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा न देता त्याला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक तयार करणे या विचारांचा प्रचार केला. […]

शिक्षेच्या वेगवेगळ्या पद्धती

समाज कल्याणाकरता प्रत्येक देशामध्ये आरोपीला शिक्षा दिली आहे. परंतु बदलत्या परिस्थितीत शिक्षा शास्त्रज्ञांचे विचार पण सुधारित झाले आहेत. प्राचीन काळातील शिक्षा आधुनिक नवीन विचाराचा परिणाम होऊनदेखील मुख्यत: पुढील प्रकारच्या शिक्षा मान्य झाल्या आहेत. […]

शिक्षा पद्धती – एक दृष्टीक्षेप

आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील? […]

रेल्वे अपघात : दोषी कोण

आपल्या देशात आज अशी पिढी निर्माण झाली आहे, जी कुठल्याही कायद्याचे व नियमांचे पालन करत नाही. या पिढीला स्वत:च्या जीवाची सुद्धा चिंता नाही. परिणाम एकच, अश्या दुर्घटना होत राहतील. राजनेता एका-दुसर्यावर खापर फोडत राहतील. कुणाला तरी दोषी ठरवून, त्याच्यावर कार्रवाई होईल.  मुख्य कारण दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही. […]

1 84 85 86 87 88 140
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..