नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

तुमचा पक्ष कोणता?

निवडणूकांना आता फक्त वर्ष राहीलंय. मतदारांना फितवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तरी डोकं शांत ठेवा. तुमच्या जीवावर पोळी भाजायचा सर्वांचा कावा लक्षात घेऊन, या निवडणूकीत तुमचा पक्ष कोणता असं कुणी विचारलं, तर ‘देश आणि देशहित’ हाच आमचा पक्ष असं ठणकावून सांगायला कचरू नका.. […]

लग्न; समस्या की समोसा?

‘मनगट आणि बुद्धीच्या जोरावर जगातल्या सर्व समस्यांवर मार्ग काढता येतो’, या अर्थाचं एक विवेकानंदांचं वाक्य आहे. मी काही ते वाचलेलं नाही. विवेकानंदांचं नसलं, तरी जागतल्या बऱ्याच विचारवंत, तत्ववेत्त्यांनी अशाच अर्थाचं काही न काही, कधी ना कधी सांगीतलेलं आहे. […]

जो पेजेला देतो, तो शेजेला घेतोच.. अर्थात आपली लोकशाही

जो शेजेला घेतो, तो शेजवर जे करेल ते निमुटपणे सहन करायचं असतं हे ओघानंच येतं. आपण आपल्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या शेजेवर चढवले गेलो आहोत आणि वेळीच जागे झालो नाही, तर अनैसर्गिक बलात्कार अटळ आहे.. […]

प्रदूषण २१: मय दानवाचा बदला

मय दानवाने पर्वतांचे हृदय फोडले, जमीन खोदून काढली नानाविध खनिजे – लोखंड, कोळसा इत्यादी. सिमेंट कांक्रीटची गुगनचुंबी इमारते उभी राहिली. मय दानवाने पाताळातून काढले हलाहल विष. धावती त्या विषावर त्यावर नानाविध वाहने ओकीत विषाक्त धूर. अन्न, पाणी आणि वायूत हि पसरविले दानवाने हलाहल विष. […]

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – ३

माणूस आयुष्यभर कमाईसाठी मरत असतो.यासाठी आयुष्यभर शरीराचे हाल करून पैसा कमवितो…नि म्हातारपणी तो मिळविलेला पैसा शरीराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करतो…शेवटी गोळाबेरीज करताना हाती उरतं एक मोठ्ठ शून्य… […]

आपण आणि आपले जगणे

या सृष्टीच्या व्युत्पत्तीपासून विश्वाच्या निर्मितीचे गूढ उलगडताना मानवाचे स्वत:च्या लौकिक..परमार्थिक प्रगतीसोबत या अवकाशगंगेतील तमाम घटकांचे अस्तित्व उजळून टाकण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. आदिम काळापासून माणसाचे स्वत:च्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मार्ग शोधणे चालू होते. आणि जसजसे ते मार्ग सापडत गेले तसतसे माणसाच्या जगण्याला नवनवीन कंगोरे प्राप्त होत गेले. […]

सोशल मीडियाचा काळा ‘फेस’!

सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. […]

टेक्नॉलॉजीय तस्मै नम: ; अर्थात जी.पी.एस.मुळे हरवलेला संवाद

व्हाट्सॲप, ट्विटर, फेसबूक यामुळे दुरदूरची माणसं जोडली गेली हे खरं असलं तरी जवळच्या माणसांमधला संवाद तुटला. शेजारी असलेल्या माणसांशी सरळ बोलून संवाद साधण्यापेक्षा दूरवर असलेल्या कुठल्यातरी (बऱ्याचदा अनोळखी) माणसाशी टायपील संवाद साधण्याच्या प्रयत्नात आपण सारेच असतो. हल्ली यात तरुण, प्रौढ किंना वय झालेले असा भेद नसतो. घरोघरी हेच दृष्य दिसतं. कुटूंबातील सर्व वयाचे सदस्य आपापल्या मोबाईलमधे डोकं घालून आणि कानात इअरफोनचे बोळे खुपसून तिसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीशी संवाद साधत बसलेले दिसणं आता आम बात है.. […]

पाणी प्रदूषण : मी आणि तुम्ही काय करू करतो ?

आजकाल मी हिरवे निशाण पाहूनच पाण्यासोबत वापरणारे सर्व पदार्थ घेतो. हे छोटे-छोटे उपाय करून आपण किती तरी कोटी पाणी रोज जास्त प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतो. या शिवाय रोग-राई पासून हि स्वत:ला वाचवू शकतो. याचाच अर्थ एक तीर दोन निशाणे. […]

आयुष्याची प्रश्नपत्रिका…

आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही […]

1 85 86 87 88 89 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..