नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

शिवजयंती : माझ्या लहानपणीची आणि आताची आणि आपण सारे..

महाराजांची जयंती कधी साजरी करावी हा वादाचा मुद्दा होताच कामा नये. मला तर वाटतं महाराजांची जयंती रोज साजरी करावी. ती मनातल्या मनात साजरी करावी. अशी रोज साजरी केलेली शिवजयंती उत्सवी नसावी, तर वागणुकीतून असावी. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण आधुनिक काळात वागतोय की नाही, याचं भान ठेवून आपलं दररोजचं वागणं असलं, की मग ही शिवजयंती रोजच्या रोज साजरी होईल..महाराजांच्या नांवाला आणि इभ्रतीला धक्का लागेल असं आपलं वागणं असता कामा नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली, क मग वेगळी शिवजयंती साजरी करण्याची गरजच भासणार नाही.. […]

बुद्धिवाद आणि सिद्धी ( एक निष्पक्ष वैचारिक मंथन )

प्रास्ताविक : विसाव्‍या शतकात विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगति केली आहे. काल ज्‍या गोष्‍टी अशक्‍य वाटत होत्‍या, त्‍या आज अस्तित्‍वात आलेल्‍या आहेत. याचाच अर्थ असा की, आज अशक्‍य वाटणार्‍या गोष्‍टी उद्या शक्‍य वाटूं लागतीलही, आज चमत्‍कार अथवा सिद्धी म्‍हणून गणल्‍या जाणार्‍या गोष्‍टींबद्दल कदाचित् उद्या वैद्यकीय स्‍पष्‍टीकरण सापडूंही शकेल. अनेकदा दोन विरुद्ध बाजूच्या लोकांमध्ये वैचारिक वाद होत असतात. म्हणून, […]

करोना विषाणू थांबवण्यासाठी भारताच्या ऊपाययोजना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता जगभरात होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता भेडसावत आहे. […]

साहित्यिकाची समाजाप्रती जबाबदारी

साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना आणि परंपरा मला वाटत फक्त मराठी भाषेतच असावी. देशातील अन्य कोणत्या भाषांची संमेलन भरत असतात किंवा नाही, याची मला नीटशी माहिती नाही. मराठीत साहित्य संमेलने भरवणे ही परंपरा असल्यानेच कदाचित मराठी जनमानसावर याचा खूप चांगला परिणाम झालेला दिसतो. मराठी माणूस देशातील इतर कोणत्याही प्रांतातल्या माणसापेक्षा जास्त विचारी आहे, संकुचित नाही याच्या मागे असलेल्या अनेक कारणांपैकी नित्य नेमाने भरणारी साहित्य संमेलने हे ही एक कारण असू शकेल अशी माझी खात्री आहे. […]

सेकंड इनिंग

आपण जसे आपल्या पहिल्या ‘ इनिंग ‘ कडे ,- म्हणजे शिक्षण , नौकरी -व्यवसाय , लग्न – या कडे जसे लक्ष देतो तसे आपल्या ‘ सेकंड इनिंग ‘ कडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . सेकंड इनिंग म्हणजे निवृत्ती नंतरचे आयुष्य . या उतरत्या आयुष्याचे नियोजन गरजेचेच असते . ‘वेळ आल्यावर पाहू ‘ ‘ आत्ताच काय घाई आहे ?’ म्हणून टाळून देतो . […]

हॉटेलींग…. एक विचार करण्याचा मुद्दा

हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे. मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे, काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणी मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे. मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो. बसणाऱ्यांच्या […]

डार्विन आणि माकड

सद्या चार्लस् डार्विन आणि त्याचा माकड सगळीकडे धुमाकुळ घालतोय…. अनेकजण जणु काय डार्विनला आपण कोळून प्यालोय, अशा आविर्भावात बोलतायत…(जसं क्रिकेटबद्दल बोलताना प्रत्येकजण एक्सपर्ट कॉमेन्टेटर असल्यासारखा बोलतो, तसं..) खरंतर यापैकी कितीजणांना डार्विन, त्याचं ते जगप्रसिद्ध पुस्तक आणि क्रांतिकारक सिद्धांत याच्याबद्दल किती माहिती आहे, हे त्यांचं त्यांनाच माहित. […]

पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा

संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. […]

व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. […]

टिप्पणी : इच्छामरण – विभाग – २

इच्छामरणाचा ‘प्रश्न’ हा नेहमीच महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे. आतां लवाटे दांपत्यामुळे तो ऐरणीवर आला आहे. तसा तो ऐरणीवर आणल्याबद्दल त्यांचे आभार. […]

1 86 87 88 89 90 132
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..