अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.
नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात. […]
आश्विन शुक्ल प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय […]
भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही. […]
एकुण, ओंकारेश्वर ते भालोद पर्यंतचा भाग पौराणीक इतिहासाच्या दृष्टिनी संपन्न आहे. येथील आध्यात्मिक गांभीर्य बहुदा येथील नर्मदेच्या गांभिर्यामुळेच असावे. तेच गांभीर्य पैलतिरावर पण गरूडेश्वर, नेमावर, नारेश्वर ह्या भागांत पण प्रकर्षांने जाणवते. जप, तप, साधना करण्यासाठीची शांतता, नर्मदेचे अवखळ, वेगवान, नटखट रूप असताना आढळत नाही. जसजशी ती शांत, विस्तिर्ण होत जाते, तसतसे तिच्या सानिध्यातले आध्यत्मिक महत्व वाढत जाते. असे पण असु शकते की प्रत्येक स्थानाची एक “स्थान देवता“, वास्तु देवता असते तसे त्यांच स्थानांचे वास्तुच्या दृष्टिने महत्व असणार. […]
आमची परिक्रमा जशी झाली तशी – केल्याने देशाचे पर्यटन, सभेत संचार । शास्त्र न कळुजा, चातुर्य येतसे फार ॥ या उक्ती प्रमांणे ज्ञानार्जनासाठी व दैनंदिन कार्यातुन विरंगुंळा म्हणुन आपण प्रवास/सहलीला जातो. जास्त कालावधी करता शक्य असेल तर आपण लांबच्या ठिकाणी पर्यटनाला जातो. पर्यटनाव्यतिरीक्त लांब पल्याचा पायी खडतर प्रवास, भावनेपोटी विठुरायाच्या दर्शनाला, ज्ञानदेव व तुकारामाच्या पालख्या घेऊन दर आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरला करतातच. ही झाली धार्मिक बाब . गेल्या काही वर्षांत […]
भगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो. […]