नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

साबण आणि डिटर्जंट यांतील फरक

डिटर्जंट आणि साबण ( तेल वापरून बनवलेले) यांमध्ये रासायनिकदृष्ट्या काहीच साम्य नाही. डिटर्जंटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे? डिटर्जंट म्हणजेच कार्बनीद्रव्य (पेट्रो-रसायने) असलेले संश्लेषित पदार्थ. साबणाच्या रेणूप्रमाणे डिटर्जंटच्या रेणूच्या कार्बनी मूलकाच्या एका टोकाचा भाग ‘जलरोधी’ तर दुसऱ्या टोकाकडील भाग ‘जलप्रेमी’ असतो. अशाप्रकारचे रेणू पाण्याचा पृष्ठीय ताण करतात. कमी त्यामुळेच डिटर्जंटमध्ये साबणाचे गुणधर्म येतात. साबणाशी तुलना करता डिटर्जंट हे अधिक कार्यक्षम आहेत. यामागे काय कारण असेल? […]

डीएनएचे उपयोग

डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते. म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू. […]

आरएनए म्हणजे काय?

प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा डीएनएवर रेखलेला असतो. डीएनए पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनाच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो तो म्हणजे आरएनए, रायबोन्युक्लिक ॲसिड. याची रचना काहीशी डीएनएसारखीच असते. […]

शुष्क बर्फ

बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे ५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ. […]

तूप आणि त्यातील घटक

शुद्ध तूप हा प्राणीजन्य पदार्थ आहे. यात वनस्पती तूपचा समावेश होत नाही. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेला शुद्ध तूप हा टिकाऊ पदार्थ आहे. बाजारातून आणलेल्या शुद्ध तुपाला घरच्या तुपासारखा वास नसतो. सायीसकट कोमट दुधास विरजण लावून त्याचे दही झाल्यावर ते घुसळून वर तरंगत असलेले लोणी बाजूला काढून ते कढवितात म्हणजे उष्णता देतात. योग्य उष्णता मिळाल्यानंतर लोण्यातील पाण्याचा अंश बाष्परूपात निघून जातो, वर बुडबुड्याच्या स्वरूपात दुधातील काही पदार्थ वर येतात. […]

मिलार्ड अभिक्रिया

मांस-मटण भाजताना त्याचा रंग का बदलतो? बरं त्याचा जो रंग बदललेला असेल, तोच रंग कायम राहत नाही. जसजसं ते भाजत जावं, त्याप्रमाणे त्याच्या छटाही बदलत जातात. असं का बरं व्हावं? […]

विड्याचा लाल रंग

विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विड्यामुळं लाल झालेलं तोंड. […]

शिजवलेल्या पालेभाजीचा रंग

पानांना हिरवा रंग येतो ते हरितद्रव्यामुळं रितद्रव्य वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं.वनस्पतींत पेशीआवरणाच्या भोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. शीभित्तिकेमुळेच पेशीला आधार आणि आकार या मिळत असतो. पेशीभोवती हवेचा थरही असतो. रितद्रव्याच्या मध्यभागी मॅग्नेशिअमचा अणू असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्य तेथे तोलून धरलं जातं. मॅग्नेशिअमचा अणू तेथून गेला, तर हरितद्रव्य कोलमडून पडतं. […]

रेणुगंधांचा शोध

माणूस आपल्या नाकाद्वारे विविध गंध ओळखतो, वेगवेगळ्या गंधांतला फरक सांगू शकतो. एखाद्या रसायनाचा गंध ओळखणं म्हणजे, त्या रसायनाच्या रेणूंची आपल्या घ्राणेंद्रियांशी झालेली क्रिया असते. मात्र एखाद्या रसायनाचा वास नक्की कसा आहे, हे त्या रसायनाच्या रेणूच्या रचनेवरून निश्चितपणे सांगणं, शक्य असतंच असं नाही. रसायनाच्या रेणूच्या रचनेतील, अणूंच्या काही ठरावीक गटांवरून त्या रसायनाच्या वासाचा अंदाज बांधता येत असला, तरी त्याला मर्यादा आहेत. अनेकवेळा जवळपास सारखी रेण्वीय रचना असणाऱ्या दोन रसायनांचा वास वेगळा असू शकतो. […]

पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?

पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी. […]

1 5 6 7 8 9 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..