नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

संरक्षित भिंत

चीनच्या भिंतीला चीनच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तरेकडून होणाऱ्या भटक्या टोळ्यांचं आक्रमण रोखण्यासाठी बांधलेल्या या पूर्व-पश्चिम भिंतीची एकूण लांबी एकवीस हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे. अनेक राजवटींच्या काळात केलं गेलेलं या भिंतीचं बांधकाम, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सुरू होऊन ते इ.स.नंतरच्या सतराव्या शतकापर्यंत चालू होतं. […]

चष्म्याचा इतिहास

चष्मा ही आजच्या युगातील अनेकांची एक अत्यंत गरजेची वस्तू ठरली आहे. फक्त प्रौढांच्याच नव्हे, तर अनेक तरुणांच्याही ! दृष्टिदोषावर मात करणाऱ्या या अतिशय उपयुक्त साधनालाही स्वतःचा इतिहास आहे. या इतिहासातल्या विविध टप्प्यांचा आढावा घेणारा हा लेख… […]

बंदराला करतो ये-जा

बंदर म्हणजे जहाज उद्योगाचा कणा. योग्य बंदर उपलब्ध नसेल, तर जहाज वाहतुकीची उद्दिष्टे सफल होणार नाहीत जहाज वाहतुकीसाठी बांधली गेलेली बंदरे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. जहाजातील मालाच्या प्रकारानुसार बंदरात त्या-त्या प्रकारच्या सोयी असाव्या लागतात. या सोयींनी बंदरांच्या स्वरूपात वैविध्य आले आहे. बंदरांच्या वैविध्याचा हा आलेख… […]

आठवणी अब्दुल कलामांच्या

दिनांक २७ जुलैला संध्याकाळी, टीव्हीवर आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या निधनाची दु:खद बातमी ऐकली आणि मन विषण्ण झाले. त्यांची आणि माझी मैत्री गेल्या ५२ वर्षांची! माझ्या मनात, डॉ. कलामांच्या अनेक आठवणी दाटून आल्या. […]

कृत्रिम बुद्धिमत्ता: काल, आज आणि उद्या

१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास, प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख… […]

आधुनिक लाक्षागृहे

अभय गुजर गगनचुंबी इमारतींतील ‘अग्नी सुरक्षा’ ही नेहमीच चिंतेची बाब असते. नुकत्याच लागलेल्या ‘लोटस बिझनेस पार्क’मधील आगीच्या तांडवात ही बाब प्रकर्षाने ऐरणीवर आली आहे. अग्निशमन यंत्रणांच्या नियमांच्या अंमलबजावणीतील पळवाटा शोधण्याच्या वृत्तीमुळे अशा इमारतींत वावरणाऱ्या माणसांना धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने या ‘आधुनिक लाक्षागृहां’चा घेतलेला हा जळजळीत लेखाजोखा… […]

महाकपीचा शेवट

कपी हा वानरवर्गीय प्राण्यांचा एक गट आहे. या प्राण्यांची शारीरिक रचना इतर वानरवर्गीय प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते. त्यांच्यातला सहजपणे लक्षात येणारा फरक म्हणजे कपींना शेपूट नसतं. आजच्या गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरांगउटान, तसंच मानव, या सर्वांचा या गटात समावेश होतो. […]

सक्रिय एन्सेलॅडस

शनी या ग्रहाचे आजपर्यंत जवळपास दीडशे चंद्र शोधले गेले आहेत. या दीडशे चंद्रांपैकी एन्सेलॅडस हा चंद्र आकाराने सहाव्या क्रमाकांचा ठरतो. सुमारे ३३ तासांत शनीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणारा, पाचशे किलोमीटर व्यासाचा हा चंद्र विल्यम हर्शलनं १७८९ साली शोधला. […]

खगोल शास्त्र – राहू आणि केतूचे

लहानपणी मी समुद्र मंथनाची पौराणिक कथा वाचली होती. या कथे मध्ये जेव्हा समुद्रातून अमृताची प्राप्ती होते तेव्हा राक्षसांना अमृत प्राप्ती होऊ नये म्हणून भगवान विष्णू मोहिनीचे रूप धारण करून अमृत वाटप करण्याचे ठरवतात. हे वाटप करत असताना मोहिनी रुपात भगवान विष्णू प्रत्यक्षात देवांना खरे अमृत तर राक्षसांना अमृताच्या नावाने फक्त जल देत असतात. […]

पहिलं हिमायन

पृथ्वीवर आतापर्यंत अनेकवेळा हिमयुगं येऊन गेली आहेत. या हिमयुगांतलाच, पृथ्वी मोठ्या प्रमाणात बर्फाच्छादित असण्याचा काळ म्हणजे हिमायनाचा काळ. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, सर्वांत जुनं हिमायन हे सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी होऊन गेलं आहे. […]

1 3 4 5 6 7 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..