नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

करन्सी काऊंटिंग मशीन

बँकेत नोटा मोजण्यासाठी आता कॉशयरची भूमिका तुलनेने कमी झाली आहे, त्याच्या मदतीला करन्सी काऊंटिंग मशीन आले आहे. या मशिनमध्ये नोटा टाकल्या की, तुम्हाला त्या किती नोटा आहेत हे कळते. […]

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम

पूर्वीच्या काळी अरब लोक आकाशातील ग्रहताऱ्यांवरून दिशा ओळखायचे व त्यामुळे ते बरोबर योग्य त्या ठिकाणीच पोहोचत असत. आता तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की, गुगल अर्थवर सगळे काही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसते आहे. पृथ्वीवरील कुठल्याही देशातल्या रस्त्यावरून चाललेल्या मोटारीची नंबर प्लेट उपग्रहाला दिसत असते. […]

संगणकाचे पूर्वज

आज जवळजवळ सर्वच क्षेत्रांत संगणकाचा वापर होतो आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सतत संगणकाचा वापर करतो आहे. त्या निमित्ताने, संगणकाची सोप्या भाषेत ओळख करून देणारी ही लेखमाला ‘पत्रिके’त वर्षभर प्रकाशित केली जाणार आहे. या अंकापासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील हा पहिला लेख अर्थातच संगणकाच्या ‘पूर्वजां’ बद्दलचा… […]

मेटल डिटेक्टर

मेटल डिटेक्टर ज्याला धातुशोधक यंत्र असे म्हटले जाते. त्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून होत आहे. अजूनही हे साधन कालबाह्य ठरलेले नाही उलट त्याचे महत्त्व आजच्या दहशतवादी कारवायांच्या जगात वाढतच चालले आहे. मेटल डिटेक्टरचा उपयोग अर्थातच धातूचा शोध घेण्यासाठी केला जातो. […]

झेरॉक्स मशिन

पूर्वीच्या काळी कार्बन पेपरला फार महत्त्व होते. दोन कोऱ्या कागदांच्या मधे हा कार्बन घालून वरच्या कागदावर लिहिले, की तोच मजकूर खालच्या कागदावर उमटत असे. त्यालाच आपण कार्बन कॉपी म्हणायचो, पण आता ही कार्बन कॉपी पूर्णपणे नामशेष झाली आहे, कारण झेरॉक्स प्रतींमुळे आपण लिहिलेल्या किंवा कुठल्याही मजकुराच्या कितीही झेरॉक्स आपण काढू शकतो. त्यांना फोटो कॉपी असेही म्हणतात. तर हे सगळे शक्य झाले ते झेरॉक्स मशिनमुळे. […]

भारताचे यशस्वी अंतराळ उड्डाण….

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भरीव यशात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यांतला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. या ऐतिहासिक उड्डाणास पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा विशेष लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. चांद्रयान ३ च्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत. […]

इलेक्ट्रिक जनरेटर

भारनियमनाच्या काळात कुठलेही कार्यालय किंवा खादे गृहसंकुलही वीज खंडित झाल्यानंतरही प्रकाशित राहू शकते, ते इलेक्ट्रिक जनरेटरमुळे इलेक्ट्रिक जनरेटरचा आता तर आवाजही येत नाही त्यामुळे त्याला सायलंट पॉवर असेही म्हटले जाते. लेक्ट्रिक जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत केले जाते. […]

भूकंपाचं भाकीत

तीव्र भूकंप ही प्रचंड हाहाकार उडवणारी नैसर्गिक घटना आहे. तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. भूकंपाच्या काही तास अगोदरच जर या भूकंपाचं भाकीत करता आलं, तर लोकांना योग्य ती सूचना देऊन, ही जीवितहानी कमी करणं शक्य होईल. परंतु भूकंपाचं भाकीत करता येईल, अशी खात्रीशीर भूकंपपूर्व ‘लक्षणं’ संशोधकांना सापडलेली नाहीत. त्यामुळे भूकंपाच्या पुरेसा वेळ अगोदर, भूकंपाचं भाकीत वर्तवणं अजून तरी शक्य झालेलं नाही. […]

स्मोक डिटेक्टर

अनेकदा विद्युत उपकरणे किंवा सिगरेट यामुळे घरात आग लागून प्राणहानी व वित्तहानी होण्याचा धोका असतो. जिथे धूर आहे तिथे आग आहे असे म्हटले जाते, त्यामुळे धूर शोधणे ही आग रोखण्यातील एक महत्त्वाची पायरी मानली जाते. अमेरिकेतील मूळ रहिवासी हे धुराच्या मदतीने संदेश पाठवित असत, पण आता आपल्याला धुरातून धोक्याचा संदेश मिळू शकतो. धूम्रशोधकाचा शोध १८९० मध्ये […]

कोलंबिया अवकाशयानाच्या अपघाताच्या निमित्ताने

3 फेब्रुवारी 2003 ला अमेरिकेतील नासा संस्थेने अवकाश मोहिमेवर पाठविलेल्या कोलंबिया अवकाशयानाचा परतीच्या प्रवासात स्फोट झाला आणि मूळ भारतीय असलेल्या कल्पना चावलासह सात अंतराळवीर यात मृत्युमुखी पडले. या अपघातासंदर्भात प्रसिद्ध होणारी माहिती व अनेक तांत्रिक चुका विसंगतीसहं वाचकांपर्यंत पोहचवली ग?ली. त्यासंदर्भात 2003 मध्ये केलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या मराठी विज्ञान परिषद येथे झालेल्या भाषणाचा गोषवारा. […]

1 20 21 22 23 24 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..