नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

धुक्यात विमानप्रवास कसा होतो?

भारताच्या काही भागात हिवाळ्यात सकाळी काही वेळा पावसाळी हवामान असेल तर पूर्ण दिवस धुके असते. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. धुके जेवढे दाट तेवढे लांबचे कमी कमी दिसते. काही वेळा धुके एवढे दाट असते की अगदी एखाद-दुसऱ्या मीटर लांबीवरचेही काही दिसत नाही. अशा वेळी गाडी चालवणेच काय पायी चालणेही अवघड होऊन बसते, मग अशा वेळी विमानोड्डाणाची काय कथा? […]

सापाचे कान!

साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे. […]

सुखकर हवाई प्रवास

जून-जुलै महिन्यापासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांच्या आई-बाबांची तिकडे जाण्यासाठी तयारी सुरू होते. काहींचा हा प्रवास पहिलाच असल्यामुळे मानसिक ताण असतो. या प्रवासाची मानसिक व शारीरिक तयारी करावी लागते. हवाई प्रवास मुख्यत्वे कित्येक तासांचा प्रवास एका बंदिस्त जागेत करावा लागतो. […]

वैमानिकांचे प्रशिक्षण महागडे तरी महत्त्वाचे…

सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, एवढा भरमसाठ पगार घेऊन हे वैमानिक लोक संप का करतात? मुळात यांना एवढा पगार का देतात? त्यांच्या प्रशिक्षणावर एवढा खर्च का करावा लागतो? या सर्वांचे उत्तर एकच. ते म्हणजे त्यांचे उत्तरदायित्व. […]

जगातली पहिली दिनदर्शिका

दिनदर्शिकेचा इतिहास इनिहा, मानवाने शेतकरी म्हणून जीवनास सुरूवात केली तेव्हापासून अस्तित्त्वात आला. त्यापूर्वी त्याला ऋतू आणि त्यांचा काळ आणि क्रम याबद्दल फारसे ज्ञान नव्हते. हिवाळ्यानंतर हवामानात ऊब येऊन झाडांना पाने-फुले येऊ लागतात हे देखील त्याला फार उशीरा कळले. […]

‘लीप’ सेकंदाची दुरुस्ती

लीप सेकंदाची दुरुस्ती काही लीप वर्षाप्रमाणे नियमित नसते. ती दुरुस्ती सुचवण्याचे अधिकार ब्यूरो इंटरनॅशनल टेम्स (बिट) यांना आहेत. त्यांना इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस यांची मदत होते. त्यांच्या सूचना जगातील 50 अत्यंत अचूक अशा आण्वीय पहचाळ बाळगणा या प्रयोगशाळांकडे पाठवण्यात येतात. विशिष्ट अणू-रेणूच्या आंदोलनावरील कार्यपद्धती असलेली घडचाळे अचूक असतात. (प्रतिदिन ती घड्याळे एक अब्जांश सेकंदाची चूक करू शकतात.) […]

दशमान कालमापन आणि घड्याळे

कालमापन हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेले आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेले आहे. […]

कथा बोटीच्या ड्रायडॉकिंगची

बोटीचे सारे ‘जीवन’ पाण्यातच असते, आणि ते पाण्यालाच वाहिलेले असते. परंतु, समुद्रात बोटीला कधी अपघात झाला, कधी गंजलेला पत्रा बदलायचा असेल, कधी रंगकामासाठी किंवा बोटीच्या तळाला चिकटलेले जीवाणू काढून तळ, बोटीच्या बाजू स्वच्छ करावयाच्या असतील तर ती बोट ‘ड्रायडॉकिंग’ला पाठवावी लागते. याच प्रचंड जबाबदारीच्या प्रक्रियेची ही कथा… […]

चकाकणारा बाह्यग्रह

आपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. […]

1 22 23 24 25 26 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..