नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

सैन्यदलातील मिग विमानाचे अपघात जास्त का?

वरवर पाहता मिग विमानांचे अपघात जास्त वाटले तरी दर दहा हजार तासांच्या उड्डाणांच्या हिशेबात जगातील अनेक प्रगत वायुदलातील अपघातांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. म्हणजे भारतातील व्यावसायिक वैमानिकच काय पण शिकाऊ वैमानिकही इतर देशांच्या तुलनेत अधिक कसबी आहेत. पण तरीही अपघात हा अपघातच आणि तो वाईटच. म्हणून तो पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी आणि त्यातून काही शिकायला हवे. […]

हेलिकॉफ्टर सरळ वर कसे जाते?

हेलिकॉप्टर एकदम वर उडते. याला कारण डोक्यावर गरगर फिरणारा पंखा. त्याच्या पात्यांची स्थिती बदलून हेलिकॉप्टर वर जायला रेटा मिळतो. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी वाहन-क्षमता मात्र कमी होते. […]

गरज ई-साक्षरतेची

भारत देश विकासात्मक प्रक्रियेत अग्रेसर होत असून जगातील अर्थव्यवस्थेत तो आपले स्थान भरभक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटलायझेशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दि. १ जुलै २०१५ पासून भारतात ख-या अर्थाने डिजिटलायझेशनला सुरुवात झाली असे म्हणता येईल. डिजिटल इंडिया असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले. […]

भारताच्या हवाई इतिहासातील महत्वाचे टप्पे

भारताच्या हवाई इतिहासात तीन टप्पे महत्वाचे आहेत. त्यातला पहिला टप्पा हा ब्रिटिश विमानांचा व तो सुद्धा पिस्टन इंजिनांच्या विमानाचा! दुसरा टप्पा हा जास्त वाहतुकीची क्षमता असणारा व मध्यम आणि कमी पल्ल्याच्या विमानांचा आणि तिसरा टप्पा हा जेट विमानांचा. […]

धुक्यात विमानप्रवास कसा होतो?

भारताच्या काही भागात हिवाळ्यात सकाळी काही वेळा पावसाळी हवामान असेल तर पूर्ण दिवस धुके असते. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. धुके जेवढे दाट तेवढे लांबचे कमी कमी दिसते. काही वेळा धुके एवढे दाट असते की अगदी एखाद-दुसऱ्या मीटर लांबीवरचेही काही दिसत नाही. अशा वेळी गाडी चालवणेच काय पायी चालणेही अवघड होऊन बसते, मग अशा वेळी विमानोड्डाणाची काय कथा? […]

सापाचे कान!

साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे. […]

सुखकर हवाई प्रवास

जून-जुलै महिन्यापासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांच्या आई-बाबांची तिकडे जाण्यासाठी तयारी सुरू होते. काहींचा हा प्रवास पहिलाच असल्यामुळे मानसिक ताण असतो. या प्रवासाची मानसिक व शारीरिक तयारी करावी लागते. हवाई प्रवास मुख्यत्वे कित्येक तासांचा प्रवास एका बंदिस्त जागेत करावा लागतो. […]

वैमानिकांचे प्रशिक्षण महागडे तरी महत्त्वाचे…

सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, एवढा भरमसाठ पगार घेऊन हे वैमानिक लोक संप का करतात? मुळात यांना एवढा पगार का देतात? त्यांच्या प्रशिक्षणावर एवढा खर्च का करावा लागतो? या सर्वांचे उत्तर एकच. ते म्हणजे त्यांचे उत्तरदायित्व. […]

जगातली पहिली दिनदर्शिका

दिनदर्शिकेचा इतिहास इनिहा, मानवाने शेतकरी म्हणून जीवनास सुरूवात केली तेव्हापासून अस्तित्त्वात आला. त्यापूर्वी त्याला ऋतू आणि त्यांचा काळ आणि क्रम याबद्दल फारसे ज्ञान नव्हते. हिवाळ्यानंतर हवामानात ऊब येऊन झाडांना पाने-फुले येऊ लागतात हे देखील त्याला फार उशीरा कळले. […]

‘लीप’ सेकंदाची दुरुस्ती

लीप सेकंदाची दुरुस्ती काही लीप वर्षाप्रमाणे नियमित नसते. ती दुरुस्ती सुचवण्याचे अधिकार ब्यूरो इंटरनॅशनल टेम्स (बिट) यांना आहेत. त्यांना इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस यांची मदत होते. त्यांच्या सूचना जगातील 50 अत्यंत अचूक अशा आण्वीय पहचाळ बाळगणा या प्रयोगशाळांकडे पाठवण्यात येतात. विशिष्ट अणू-रेणूच्या आंदोलनावरील कार्यपद्धती असलेली घडचाळे अचूक असतात. (प्रतिदिन ती घड्याळे एक अब्जांश सेकंदाची चूक करू शकतात.) […]

1 24 25 26 27 28 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..